ऑगस्ट क्रांती दिन मराठीत माहिती | August Kranti Deen 1942 In Marathi information

Date:2024-03-02
Blog Image
0

भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती दिन हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा प्रसंग आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी ही चळवळ सुरू केली. इतिहासातील देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे आंदोलन शेवटचे आंदोलनच आहे. महात्मा गांधीजी यांनी ही चळवळ मुंबई येथून सुरू केली आणि संपूर्ण देशाला आव्हान केले भारतीयांनो जागे व्हा. आता हे शेवटचे आंदोलन आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांना स्पष्टपणे गांधीजी म्हणाले,"करा किंवा मरा"अर्थातच करेंगे या मरेंगे. खऱ्या अर्थाने हे आंदोलन 8 ऑगस्ट 1942 च्या मध्यरात्रीपासून महात्मा गांधीजीने मुंबईतून इंग्रजांना ठणकावून सांगितले "चले जाव". भारत छोडो आंदोलनाचा नारा ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य चळवळीसाठी नारा देऊन आंदोलन उभारले. भारतीयांनो तुम्हाला जर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असेल तर प्राणाचे देण्यास तयार व्हा.

 

ऑगस्ट क्रांती दिन  मराठीत माहिती
ऑगस्ट क्रांती दिन  मराठीत माहिती 

 

स्वातंत्र्य प्राप्त हे शेवटचे आंदोलन असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देश खळबळून जागा झाला. आणि इंग्रजाच्या गुलामगिरीतून देशमुख करण्यासाठी ही 9 ऑगस्ट रोजी ची क्रांती अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानाची गाथा आहे. म्हणून आपण 9 ऑगस्ट 1942ते आंदोलन भारत छोडो आंदोलन म्हणून दरवर्षी 9 ऑगस्ट ला भारतात साजरी करतो. व क्रांतिवीरांना श्रद्धांजली देण्यात येते. स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रज राजवटीला नेताना भूत करणे साठी अनेक क्रांतिकारकाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आजच्या नव्या पिढीला माहीत असावी म्हणून सर्वांनी आपल्या हृदयात क्रांतीची मशाल पेटवून क्रांतिवीरांना अभिवादन केले पाहिजे.

इंग्रजाच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी गांधीजींच्या करेंगे या मरेंगे या नाऱ्याने 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाची ठिणगी पडली. भारतातून सर्व ठिकाणी लोक एकत्र झाले.

 

भारत छोडो आंदोलनाचा इतिहास:-

खरे पाहिले तर या आंदोलनाचा अतिशय गोपनीय आराखडा त्यालाच आपण मसुदा तो मसुदा गुप्त रीतीने "सेवाग्राम"  येथे नऊ जुलै 1942 रोजी गांधीजीच्या निवासस्थानात तयार करण्यात आला व त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समितीतर्फे अंतिम स्वरूप देण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठरावाला वेगळेच नाव दिले. गांधीजी ने तयार केलेल्या या ठरावास काँग्रेसने" वर्धा ठराव" असे नाव दिले. व क्रांतीज्योत हळूहळू स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी चले चले जाव चे आंदोलन भारतीय भारतीय जनता गांधीजीच्या दिलेल्या संदेशाला समजून घेऊन आंदोलन करण्यास सज्ज झाले. भारतातील सर्व जिल्ह्यातून जनता 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे एकत्र येऊन आंदोलनात सज्ज झाली. आंदोलनाची ठिणगी पडली. बुलढाणा व गोंदिया या जिल्ह्यातून अनेक लोक सुद्धा मुंबई येथे हजर झाले आणि या आंदोलनात हुतात्मे झाले. भारत छोडो आंदोलनामध्ये जे भारतीय लोक हुतात्मे झाले त्यांची आठवण जपण्यासाठी आपण हा दिवस नऊ ऑगस्ट दरवर्षी "क्रांती दिन "म्हणून पाळला जातो.

भारत छोडो , चले जाव आंदोलन:-

मुंबई येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात सर्व कार्यकर्ते एकत्र झाले सर्व देशातून स्वातंत्र्यासाठी पेटून उठणारे क्रांतिवीर एकत्र झाले. या अधिवेशनामध्ये गांधीजीने गवालिया टॅंक मैदानावरून फार मोठी एक घोषणा केली. भारतीय जनतेच्या अंतकरणातील क्रांतीज्योत पेटवण्यासाठी गांधीने गर्जना केली. छोडो भारत आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र आपल्या भाषणातून दिला आणि भारतीयांना जागे केले. इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हीच वेळ महत्त्वाची आहे आणि आता जर तुम्ही माघारी फिरला तर पुन्हा कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही. तर आंदोलनात सज्ज व्हा .अशी गर्जना मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावरून करून आंदोलनात सुरुवात झाली म्हणून हे आंदोलन ऑगस्ट क्रांती दिन आंदोलन म्हणून ओळखले जाते. आणि भारताच्या इतिहासातील हेच शेवटचे आंदोलन म्हणावे लागेल. कारण या आंदोलनामध्ये इंग्रज सत्तेला देशातून हाकलून लावण्यासाठी प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आंदोलनात उतरली. व इंग्रजांना सुळोकीपोळखी करून सोडले. ब्रिटिशांची सत्ता हाकलून देण्यासाठी प्रत्येकाने जे वाटेल ते प्रयत्न केले परंतु मरणास न घाबरता आंदोलनात सज्ज झाली या मंत्रामुळे व प्रचंड जनसमुदाय एकत्र आलेला पाहून ब्रिटिश सत्ता म्हणजेच इंग्रज हादरून गेले. या आंदोलनात रोखायचे कसे ? हा मुख्य प्रश्न इंग्रजांच्या समोर उभा राहिला. खरे पाहता आठ ऑगस्ट 1942 च्या मध्यरात्रीपासून आंदोलनास सुरुवात झाली संपूर्ण मुंबईत एकच नारा सुरू झाला इंग्रजांवर चले जाव छोडो ,भारत छोडो आणि करेंगे या मरेंगे या तीन नाऱ्यामुळे अख्खी मुंबई गर्जना करत इंग्रज सत्तेला प्रचंड धोका निर्माण केला इंग्रज घाबरून गेले आता करायचे काय? हे आंदोलन थांबवायचे कसे?

वंदे मातरम् गीत गायन:-

हा विचार करून इंग्रजांनी हालचाल सुरू केली? माहित आहे आपणास काय इंग्रजांनी हालचाल सुरू केली. गांधीजींनी फार मोठे हे आंदोलन सुरू केल्यामुळे ते आंदोलन आठ ऑगस्ट 1942 च्या रात्री गोवालिया टॅंक वरून व मैदानावरून वंदे "मातरम" प्रेरणादायी तसेच वंदनीय गीत संपूर्ण कडव्या सहित संगीत कलाकारा स मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी झिंजोटी रागात  तयार केलेले गीत गायन केले. हे गीत गायल्यामुळे पुन्हा समाज अतिशय जागृत होऊन आंदोलनात सज्ज झाला. . इंग्रजांनी या गीत गायनावर बंदी घातली कोणी जर वंदे मातरम हे गीत गात असेल तर त्यांना अटक करून मारण्यात येईल असा इंग्रजांनी इशारा दिला फाशीची सुद्धा शिक्षा दिली जाईल. असेही सुद्धा या गीतावर बंदी घातल्यानंतर पुन्हा जनता खळबळून जागी झाली व स्वतःला बंदी करून घेतले तसेच स्वतःच्या जीवाची परवा न करता संपूर्ण कडव्यास हे गीत गायन फार मोठ्या धाडसाने केले.

वंदे मातरम् गीत गायन:-

संपूर्ण देशात हे गीत गायन सुरू झाल्यानंतर इंग्रज सरकारने नऊ हजार लोकांना अटक केली ते नऊ हजार लोक स्वतः अटक झाली जीवाची परवा न करता देशाची इज्जत राखत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चेलेजावच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी होऊ लागले.आंदोलनाला नेमकी सुरुवात होता इंग्रजाला त्याची पूर्व सूचना कळाली. इंग्रज घाबरून जाऊन भाषणात गांधीजींनी दिलेले नारे महत्त्वाचे ठरले व आंदोलन पेटले आंदोलन पेटताच 9 ऑगस्ट 1942 च्या पहाटे पाच वाजता मुंबईत इंग्रजांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केली. गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना  ताब्यात घेतले . गांधीला ताब्यात घेतातच प्रत्येक नागरिकाला उद्देशून म्हटले आणि महामंत्र दिला भारतीयांनो मला इंग्रजांनी ताब्यात घेतले म्हणजे आंदोलन थांबणार नाही. यापुढे प्रत्येक जण या आंदोलनाचा नेता आहेत पुढारी आहेत व आंदोलनास व्यापक स्वरूप देऊन फार मोठे आंदोलन करण्यास सांगितले व जन आंदोलन उभे राहिले गांधीजी यांना ताब्यात घेतले व कुटुंब यांना ताब्यात घेतले ही माहिती करताच एक निर्वाणीचा ठराव घेण्यात आला यापुढे आता आंदोलन थांबणार नाहीत या आंदोलनात प्रत्येक नागरिकाला नेता बनावा लागेल. असे महात्मा गांधीजी यांनी सांगितले कोणत्याही पक्षात भेदाभेद न करता सर्वांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि इंग्रज सत्ता कोण म्हणून टाकावी इंग्रजाचे साम्राज्य जुगारून द्यावे यासाठी निकरीचा लढा देण्याचे आवाहन केले. भारतीय जनतेने उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावागावातून शहरापासून तर खेड्यापर्यंत एकच आंदोलन सुरू झाले. ते म्हणजे चले जाव ,करेंगे या मरेंगे. या आंदोलनाचे लोन ग्रामीण भागातही पसरले त्या काळातील तत्कालीन अग्रणी कार्यकर्ते स्वखर्चाने मुंबईला आलेत व आंदोलनात सहभागी झाले. गांधीजी सह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना इंग्रजांनी अटक केली. या ऐतिहासिक ठरलेल्या आंदोलनात "चले जाव" चा नारा महत्त्वाचा ठरला. संपूर्ण इंग्रज सत्ता हादरून गेली.

ब्रिटिशांनी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून पुणे येथे हलवण्यात आले. गांधीजी व त्यांच्या कुटुंबासह काँग्रेस कार्यकर्ते यांना पुणे येथे आणण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवण्यात आली आणि त्या गाडीतून महात्मा गांधी, महादेव भाई देसाई आणि मीराबेन या चार व्यक्तींना गाडीतून खाली उतरून घेण्यात आली व त्यांची रवानगी गुप्त अज्ञात ठिकाणी करण्यात आली. बाकीच्या कार्यकर्त्यांना पुढे नेण्यात आले. कोठे नेण्यात आले हे सांगता येत नाही. त्याही कार्यकर्त्यांना आज्ञास्थळी ठेवण्यात आले.

गांधीजी व काँग्रेस कार्यकर्त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची बातमी इंग्रज सरकारने गुप्तरित्या कोठे ठेवले जरी सांगितले नसले तरी ही बातमी फुटली. इंग्रज सरकारने जरी ही, गुप्तता पाळली असली तरी बातमीचा सोळावा लागलाच. महात्मा गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेस मध्ये ठेवण्यात आले आणि इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्यानंतर त्याची ही माहिती प्राप्त झाली. काही बातमीची गुप्तता समजली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि आझाद या मंडळीला अहमदनगरच्या गोपनीय किल्ल्यात ठेवण्यात आले. ही बातमी संपूर्ण देशभर बघता बघता वाऱ्यासारखी पसरली पुन्हाही आंदोलन पेटले चले जाव भारत छोडो चे नारे इंग्रजांच्या कानी पडू लागले त्यामुळे इंग्रज आणखीच घाबरून जाऊन आणखी काही नेत्यांची इंग्रजांनी दर पकड केली व त्यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

भारत छोडो मधील आंदोलने:-

देशभर निर्णया ठिकाणी हरताळ घडून आणण्यात आले. मिरवणुका काढून नारेवादी होऊ लागली भारत छोडो आंदोलन अधिक तीव्र झाले आणि ठिकाणी मोर्चे निघाले व इंग्रज सत्तेच्या हुकूमशाहीला व सत्तेला भारत देशातून धुडकावून लावण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक गावागावात लोक एकत्र आले व आपापल्या गावात संपूर्ण भारतात इंग्रज सत्तेविरुद्ध गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आंदोलन तीव्र करून इंग्रज सत्तेचा विरोध केला इंग्रजांना न घाबरता स्वतः लोक अटक करून घेऊ लागले. ठिकठिकाणी वंदे मातरम तसेच करेंगे या मरेंगे या नाऱ्यामुळे अख्खा भारत जागी झाला आता इंग्रजांना कळून चुकले होते की, हे फार मोठे आंदोलन होत आहेत

आणि त्याचा परिणाम इंग्रज सत्तेवर झाल्याशिवाय राहणार नाही याची इंग्रजांना खात्री पटली पण इंग्रज यांनी सहजासहजी भारताला स्वातंत्र्य दिले नाही हे आंदोलन संपूर्णपणे मोडून काढण्यासाठी पूर्ण सत्ता पणाला लावून आंदोलन रोखण्यासाठी इंग्रज प्रयत्न करू लागले. लोक आता इंग्रजांचे आदेश पायदळी तोडू लागले ज्या ज्या ठिकाणी भारत छोडो आंदोलन झाले चले जायचे आंदोलन झाले त्या त्या ठिकाणी इंग्रजांनी पोलिसांच्या साह्याने जमावावर लाठी हल्ले केले. ठिकठिकाणी गोळीबार केला. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय जनतेने भारतात जाळपोळ सुरू केली पोलिसांचे खून करण्यास सुरुवात झाली. जनतेने पोलीस स्टेशन ला आग लावल्या टेलिफोनच्या तारा तोडल्या अनेक ठिकाणी ज्याच्या मनाला येईल त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी हे आंदोलन चिडले

ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले. संपूर्ण भारतीय भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व इंग्रजांची हुकूमशाही तसेच इंग्रजांची राजवट व जुलमी सत्ता उलथून पाडण्यासाठी संपूर्ण देश पेटला. लोक स्वातंत्र्याच्या ध्येयाने आणि गांधीजींनी दिलेल्या नाऱ्यांच्या उद्देशाने जनता झपाटून गेली. ठिकठिकाणी भारतात अनेक घटना घडू लागल्या काही ठिकाणी तर हिंसक जमावाने बॉम्बस्फोटही सुद्धा केले काही ठिकाणी भारतीय जनतेने इमारतीला  आगी लावल्या अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाला जेथे इंग्रजाचे प्रशासन होते ते हटवण्याचाही प्रयत्न झाला. दंगली झाल्या. देशभर गोळीबार झाला.

अनेक ठिकाणी रेल्वेचे अपघात घडून आणले,

जनतेने तर काही ठिकाणी इंग्रजांचा खजिनाही सुद्धा लुटला.

इंग्रज कृत्य:-

इंग्रजांनी अनेकांना विना चौकशी अटक केली त्यामुळे सारा देश गोंधळलेल्या व अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण देश गोंधळलेल्या स्थितीत असताना इंग्रजांनी धरपकड सुरू करून आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला व आंदोलन मोडून काढले.

गांधीजीचे आमरण उपोषण:-

आंदोलन काळात महात्मा गांधीजींनी अटक असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 21 दिवस उपोषण केले.

स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता देशासाठी आयुष्यभर अनेक वेळेस अटक करून घेतल्या पण घाबरले नाही आणि इंग्रज सत्तेला तर मुळीच घाबरले नाही म्हणूनच. स्वातंत्र्याचा पहिला गव्हर्नर जनरल माउंट बॅटन म्हणतात गांधीजी म्हणजे एक माणसाचे सैन्य. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे एकटेच सैनिक होय. गांधीजी तुरुंगात अटक असतांना अचानक त्यांच्या प्रकृती खूपच नाजूक आणि हलाखीची झाली त्यामुळे महात्मा गांधीजी यांना इंग्रजांनी 1944 साली सुटका केली. 1942 ते 44 पर्यंत संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी गांधीजी अटक असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. आंदोलन दडपून काढले होते. या आंदोलनात अनेक काँग्रेस नेत्यांना इंग्रजांच्या टीकेच्या समोर जावे लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांवर अनेक टीका होऊ लागल्या. काँग्रेस कार्यकर्त्यावर पहिली टीका मोहम्मद अली जिना यांनी केली. भारतातील डाव्या विचारसरणीचे तसेच मुस्लिम लीग संघटनेच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका केल्या व संपूर्ण टीकेचे लक्ष भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेसवर वाढवण्यात आले. भारत छोडो आंदोलन इंग्रजांनी जरी मोडून काढले .असले तरीही जनतेच्या मनात इंग्रजांबद्दल तीव्र संतोष निर्माण झाला होता. 1942 च्या आंदोलनाने स्वातंत्र्याची बीजेपी जात होती व ब्रिटिशांची सत्ता उसकावून लावण्यासाठी जनता स्वस्थ न बसता भूमिगत होऊन कार्य करत होती. जनता स्वातंत्र्याच्या ध्येयाने भेटली होती. भारत छोडो आंदोलन इंग्रजांनी जरी मोडून काढले असले तरीही भारतीय जनता घाबरून गेली नाही. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवत होते. आता ब्रिटिशांना कळून चुकले होते की या आंदोलनामुळे गांधीजीने फार मोठे आंदोलन उभे करून जनजागृती करून इंग्रज सत्तेला विरोध केला हे मुख्य कारण भारत छोडो आंदोलनातच आहे. इंग्रजांना कळून चुकले होते की देशाला स्वातंत्र्य दिल्याशिवाय आता अत्यंत नाही. पण इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य सहजासहजी दिलेले नाही.

भारत छोडो आंदोलनामुळे देशवासीय व ब्रिटिश यांच्यामध्ये युद्धाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनावर टीका करणारे असतील परिस्थितीमध्ये फक्त एकच विचार करत होते ते म्हणजे इंग्रज सरकारची सत्ता धुडकावून लावणे व भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे.

भारत छोडो आंदोलनाची टिकात्मक बाजू:-

इंग्रज सरकारने भारतात संपूर्णपणे या चिघळलेल्या परिस्थितीत गांधीला तुझा जबाबदार धरले व ठरवले परंतु वेळ अशी होती की 1942 ते 44 दरम्यान जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाचे वारे सुरू होऊन परिस्थिती दुसरे महायुद्ध होण्याच्या वाटावर होते. दुसरे महायुद्ध सुरू झाले व या महाविद्यात ब्रिटिश खचून गेले कमजोर बनले व त्यानंतर अमेरिका एक महासत्ता म्हणून दुसऱ्या महायुद्धा उदय होता अशा घडामोडीमुळे कठीण परिस्थितीतून मार्ग आक्रमक होते. आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास "भारत छोडो" हे आंदोलन महत्त्वाचे ठरले.

काँग्रेसचा ठराव,:-

जुलै मध्ये काँग्रेस ची बैठक झाली व अधिवेशन भरले व या अधिवेशनात काँग्रेस नेत्यांनी एक ठराव मंजूर केला. तो ठराव आंतरराष्ट्रीय घडामोडी वर आधारित होता. दुसरे महायुद्ध सुरू झाले. इंग्रज हतबल झाले. अमेरिकन सत्तेचा उदय झाला. या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर ठेवा ठरावात्मक टिपणी तयार करण्यात आली व काँग्रेसच्या अधिवेशनात हा ठराव पुढे आला.

इंग्लंडची परिस्थिती:-

दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये अनेक बदल झाले. हुजूर पक्षाची सत्ता पराभूत झाली आणि मजूर पक्षाची सत्ता सत्तेवर आली. पक्षाचा पहिला नेता पंतप्रधान म्हणून बॅरिस्टर अॅटली पंतप्रधान झाला. व त्यांनी प्रथम घोषणा केली आम्ही भारताला लवकरात लवकर सोयीस्कर होईल त्या पद्धतीने स्वातंत्र्य देऊ हा ठराव ब्रिटिश पार्लमेंट मध्ये मंजूर करून घेतला.

स्वातंत्र्य देण्यासाठी भारतामध्ये निर्णयास समिती आल्या.

त्रिमंत्री परिषद भारतात इंग्लंड मधून आली.

मुंबईच्या क्रांती मैदानावरून जर भारत छोडो आंदोलन झाले नसते तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळाले नसते म्हणूनच असं म्हटले जाते चले जायचे आंदोलन म्हणजे भारताला स्वातंत्र्याच्या मार्गावर आक्रमण करणारे हे आंदोलन ठरले. तसेच मजूर पक्षाची इंग्लंडमध्ये सत्ता आली नसती तर स्वातंत्र्य मिळाले नसते. भारतामध्ये लॉर्ड माऊंट बॅटन गव्हर्नर जनरल म्हणून 24 मार्च 1947 रोजी आले. भारतात आल्यावर निरनिराळ्या पक्ष्यांची गव्हर्नर जनरल ने चर्चा केली व या चर्चेमधून अनेक नेत्याची भेट घेतल्यानंतर भारताची फाळणी करण्याची योजना तयार केली व भारताची फाळणी झाली. फाळणीची योजना गव्हर्नर जनरल ने 3 जून 1947 रोजी प्रसिद्ध केली व ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीगच्या समोर ठेवण्यात आली आणि या योजनेवर दोन्ही नेत्यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि काँग्रेसने म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता देऊन ही फाळणीची योजना 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंट कडे जाऊन तेथे 18 जुलै 2017 रोजी या फाळणीच्या योजनेवर ब्रिटिश पार्लमेंटने ठराव पास केला आणि तो ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला कायद्याच्या तरतुदी प्रमाणे भारत पाकिस्तानची फाळणी होऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला हे महत्त्वाचे आहेत. 

सारांश:-

सारांश रुपाने आपणास असे म्हणता येईल की जर भारत छोडो आंदोलन झाले नसते तर भारताला स्वातंत्र्य मिळाले नसते तसेच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये दुसरे महायुद्ध आणि इंग्लंडवर उडवलेली परिस्थिती अमेरिकन सत्तेचा उदय व इंग्लंड मधील हुजूर पक्षाचा झालेला पराभव व मजूर पक्षाचा विजय आणि मजूर पक्षाच्या पंतप्रधानाने स्वातंत्र्याबाबत ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पहिले शब्दप्रयोग आम्हाला जितक्या लवकर सुकर होईल तितक्या लवकर आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार हे महत्त्वाचे असल्यामुळे गव्हर्नर लॉर्ड  माउंट बॅटन भारतीय स्वातंत्र्याचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून आले आणि स्वातंत्र्य दिले गेले म्हणूनच गव्हर्नर जनरल म्हणतात महात्मा गांधी म्हणजे एक माणसाचं सैनिक की जाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले 14 आगस्ट 1947 किल्ल्यावरून ब्रिटिश चा झेंडा इंड युनियन ज्याक खाली उतरण्यात आला आणि भारताचा तिरंगा ध्वज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर फडकवण्यात आला. म्हणूनच आपल्याला भारत छोडो आंदोलनाच्या पाठीमागची सर्व परिस्थिती अभ्यासावी लागली.भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीचे भारत छोडो आंदोलन महत्त्वाचे ठरले ठरले आहे.

 

FAQ

1.  ऑगस्ट क्रांती दिन कोणत्या दिवशी झाले?

9 ऑगस्ट 1942.

2. भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?

महात्मा गांधी.

3. भारत छोडो आंदोलन कोणत्या प्रथम झाले?

मुंबई.

4. इंग्रजांनी गांधीजींना अटक करून कोणत्या अज्ञात स्थळी ठेवले?

पुण्यातील आगाखान पॅलेस मध्ये

5. इंग्रजांनी नेहरूजी आणि काँग्रेस च्या इतर नेत्यांना अटक करून कोठे ठेवण्यात आले

अहमदनगर

अधिक माहितीसाठी आमचे इतर लेख

 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

 अनुकंपा धोरण शासन निर्णय संपूर्ण माहिती

 
  • थोडे नवीन

    शाळा हस्तांतर करण्याबाबतची कार्यपद्धती व शासन निर्णय |Shala Hastantara Karnyababat Paddti Ani Government Resolutions.

  • जरा जुने

    तणावाचे व्यवस्थापन मराठी माहिती | Stress Management information in marathi