नाणे म्हणजे पैसा होय. तसेच नाण्याला रुपये सुद्धा भारतात म्हणतात. भारतातील वाणिज्य क्षेत्रात नाण्याला चलन असे म्हणतात. तर अर्थशास्त्रामध्ये नाण्याला अर्थ असे म्हणून संपूर्ण कथा जाणून घेण्या घेणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक जीवनात अर्थ शिवाय जीवनाला अर्थ नाही असे आपण नेहमी म्हणतो. प्रत्यक्षात व्यवहारामध्ये व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे सोंगे करता येईल पण पैशाचे सोंग करता येत नाही. मग हा पैसा किंवा नाणे भारतात कसे आले?आपणास माहित आहे काय? भारतीय नाण्याची कथा. आज आपल्याला या लेखातून भारतीय नाण्याची कथा स्पष्ट करून माहिती असावी म्हणून हा लेख लिहिण्यासाठी घेतला आहे.
कथा भारतीय नाण्याची मराठी माहिती |
भारतात नाणे कसे आले?:
इ.स.पूर्व कितीतरी वर्ष अगोदर नाणे हे अस्तित्वात नव्हते. तुमच्या स्वरूपात देवाण-घेवाण होत होती. भारतात अनेक सत्ता राज घराण्याच्या होऊन गेल्या. अनेक राजे महाराजे पासून तर पोर्तुगीज ,हॉलंड ह्या सत्ताही भारतात राज्य करून गेल्या. मुघलांचे ही प्रचंड राज्य भारतावर होते. साम्राज्यातही सुद्धा पैसा म्हणून अनेक प्रकारच्या हिरे मोती सारख्या वस्तू वापरल्या असे म्हणतात. आपणास माहित नाही भारतात नाणे आली कशी?
2) भारतीय नाण्याचा इतिहास:-
आपल्या भारतावर दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत भारत पारतंत्र्यात जखडलेला होता. भारतामध्ये इंग्रजांची सत्ता प्रचंड बळकट झालेली होती. सुरुवातीला ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. इंग्रज भारतात येण्याचा पहिला मुख्य उद्देश होता की औद्योगिक क्रांती झालेली होती. कारखानदारी इंग्लंडमध्ये सुरू होती. भारतातून कच्चामाल इंग्लंडमध्ये घेऊन जाणे व त्या मालाचे पक्क्यामालात रूपांतर करणे. व भारतात व जगातील इतर देशात विकणे. हा मुख्य उद्देश घेऊन आलेले राज्यकर्ते भारतावर राज्य करू लागले. आता या औद्योगिक क्रांतीसाठी कच्चामाल खरेदी करण्यासाठी व पक्क्यामालात रूपांतर करण्यासाठी व्यवहार म्हणून अनेक समस्या समोर येत होत्या. त्यातील एक समस्या म्हणजे नाणे. भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम भारतात नाणे आणली. सुरुवातीला हे नाणे एक रुपया किमतीचे होते. आणि ही नाणी सर्व तयार करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता मध्ये सुरू केले व तेथे नाणे तयार करण्याची टाकसाळ सुरू केली. असे म्हटले जाते. ही भारतीय नाण्याची कथा भारतीयांना वेगळ्याच स्वरूपाची अनुभवास मिळाली. अगोदर नाणे नव्हती. वस्तूच्या स्वरूपात देवाण-घेवाण होती. इंग्रजांनी भारतात आणलेला एक रुपयाचा इतिहास पाहता त्याला भारतीय इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यावेळी भारतामध्ये भारताचे वेगवेगळे तुकडे होते पाचशे संस्थानिक तसेच काही राजे महाराजे सत्ता वेगवेगळ्या प्रांतामध्ये कार्यरत होत्या. प्रत्येक राजे व महाराजे यांचे आपापल्या संस्थानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी होते. तसेच वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नाणे प्रचलित होती. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नाणे असल्यामुळे व्यवहारात अनेक प्रकारच्या अडीअडचणी निर्माण होत होत्या. व नाणे व्यापार करताना ब्रिटिशांना व्यवहारात चलनाची अडचण येत असे. व्यापारामध्ये सुद्धा अडचण येत होती. ही अडचण दूर करण्यासाठी इंग्रजांनी भारतात नाण्याच्या रूपात पैसा अस्तित्वात आणला. पहिला एक रुपया त्यांनी तयार केला. इंग्रजांनी भारतात पहिला एक रुपया हा 19 ऑगस्ट 1757 मध्ये रुपयाच्या स्वरूपात तयार करून व्यवहारात आणला. रुपयाची कथाही इतिहासामध्ये नोंदवली गेली. त्यावेळी पैसा हा कृपया म्हणून मर्यादित स्वरूपात व्यवहारात आला. इंग्रजाचे हे महत्त्वाचे कृत्य अत्यंत चांगले आहे. ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पासून ईस्ट इंडिया कंपनीने हा पैसा वापरण्यास ईस्ट इंडिया कंपनीला परवानगी दिली व भारतात ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम कलकत्ता येथे हे नाणे तयार करून व्यवहारात आणले. त्यावेळचा काळ म्हणजे अतिशय काळ अतिशय अडचणीचा होता. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठावही संपला होता. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे तयार केलेले पहिले रुपयाच्या स्वरूपातील नाणी हे मुघल सत्तेमध्ये व त्यांच्या आधी राज्यांमध्ये किंवा प्रांतामध्ये चालवले.
3)नाण्यांची गरज का भासली?
व्यापारामध्ये व दळणवळण व्यवहारांमध्ये असंख्य अडचणी उभ्या राहिल्यात. त्या अडचणी अनेक वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी नाणी असल्यामुळे त्रास होऊ लागला. म्हणून नाणे तयार करण्यासाठी एक कायदा करण्यात आला. नाणे तयार करण्यासाठी जो कायदा तयार करण्यात आला किंवा पारित करण्यात आला त्या कायद्याला युनियन कॉइन ऍक्ट असे म्हणतात. या कायद्यामुळे देशात एकसारखे एकच नाणे प्रतलीत होऊन व्यापार व व्यवहार होऊ लागला. ज्यावेळेस संपूर्ण इंग्रजांनी भारतावर कब्जा प्राप्त केला किंवा संपूर्ण भारत ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाले तेव्हा त्यांनी आपल्या भारत देशात संपूर्ण ठिकाणी एकच प्रकारचे नाणे वापरण्यास सुरुवात केली. इंग्
रजांनी जीन आणि तयार केली त्या नाण्यावर एक सिम्बॉल म्हणून प्रतीक म्हणून इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया यांचा प्रमुख फोटो छापला. कलकत्त्यात पहिल्यांदा नाणी तयार झाले त्यानंतर इंग्रजांनी सुरत मध्ये नाणे तयार करण्याची कंपनी स्थापन केली व त्या कंपनीमार्फत नाणे छापल्या गेली त्याचबरोबर दुसरीही नाणे छापणारी कंपनी इंग्रजांनी भारतात स्थापन केली व्यापाराचे माहेरघर म्हणून बॉम्बे येथे ही कंपनी स्थापन झाली आणि या कंपनीने सुरत व गुजरात मध्ये तयार झालेली नाणी संपूर्ण भारतभर दैनिक व्यवहार व्यापार उद्योगधंदे तसेच दळणवळणासाठी सारख्या प्रमाणात चे एकाच किमतीचे सर्वत्र नाणे भारतात उपलब्ध करण्याचा प्रयत्न करून व्यवहारात आणली व व्यवहारातील अडीअडचणी दूर करण्यात इंग्रजांनी केलेला हा एक प्रयत्न आहेत आणि तो सफल झाला.
4)सुरुवातीच्या नाण्याची स्वरूप:-
भारतामध्ये सुरुवातीला जे काही नाणे अस्तित्वात होते इतिहास काळात त्याची अशी नोंद आहे की ही नाणी संपूर्ण सोन्याची तसेच चांदीची आणि तांब्याची नाणी वापरली जात होती.
सोन्याच्या नाण्याला कॅरोलीना, तांब्याच्या नाण्याला कॉपरून आणि चांदीच्या नाण्याला एंजईलइनआ असे म्हणत होते. भारतामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेले नाणे जवळजवळ 1950 पर्यंत प्रचलित व्यवहारात वापरण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 ते 1950 पर्यंत इंग्रजांची राजवट नसतानाही ही नाणी प्रचलित असल्यामुळे भारतात स्वतःचा नाणी तयार करण्याचा बाबतीत विचार पुढे आला आणि त्यातूनच भारताने स्वतःचे नाणे तयार करण्याचे ठरवले. भारतात नाणे छापण्यासाठी 1962 मध्ये कायदा संसदेत पास होऊन 1962 मध्ये प्रचलित स्वरूपात एक रुपयाचे पहिले नाणे भारताने बाजारात आणले व तेव्हापासून सर्व नाणे व रुपये म्हणजेच पैसे आज पर्यंत भारतात वेळोवेळी अनेक कायदे करून भारतीय रुपये तयार केले आहेत. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या किमतीच्या स्वरूपात एक रुपयाचे दोन हजार रुपयापर्यंत पैसे भारतात व्यवहारात आली आहे.
5)भारतीय रुपयाची नाणी:-
भारतीय नाण्याची सुरुवात 1950 ला सुरुवात झाली असून आज पर्यंत सुरू आहे. दरवर्षी नवनवीन नाणे व्यवहारात आणली जातात. सध्या एक रुपया ते वीस रुपये किमतीचे नाणे अस्तित्वात आहे. नाणे जिथे तयार केले जातात त्याला टाकसाळ असे म्हणतात. भारतात नाणे निर्मिती केंद्र म्हणजे टाकसाळ मुंबई ,हैदराबाद आणि नोएडा येथे आहेत.
1947 ते १९५० पर्यंत खालील नाणे अस्तित्वात होती.
- एक रुपया
- अर्धा रुपया म्हणजे आठ आणे.
- पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे त्याला पावली म्हणतात.
- दोन आणे त्याला चवळी म्हणजे 1/8रुपयाचे नाणे.
- एक आणा.
- अर्धा आणा.
- एक पैसा
त्याचप्रमाणे नवीन पैशाची निर्मिती सुरुवात झाली आणि नवे पैसे मालिका १९५७ ते ६३ मध्ये खालील प्रकारची नाणी अस्तित्वात होती.
एक रुपया
- 50 पैसे
- 25 पैसे
- दहा नवे पैसे
- पाच नवे पैसे
- दोन नवे पैसे
त्यानंतर भारतामध्ये देवनागरी लिपीसह नवीन पैसे अस्तित्वात आणली गेली आणि ती पैसे ज्या कालखंडामध्ये अस्तित्वात आले तो कालखंड म्हणजे 1964 ते १९८० या काळातील पैसे खालील प्रमाणे दर्शविले आहे.
- 50 पैसे
- 25 पैसे
- दहा पैसे
- पाच पैसे
- दोन पैसे
- एक पैसा
त्यानंतर पुढील काळामध्ये काही प्रतिकासह पैसे निर्मितीची मालिका सुरुवात करण्यात आली ती प्रतीक मालिका 2011 मध्ये अस्तित्वात आणली गेली. ती मालिका खालील प्रमाणे दर्शवली आहेत.
- दहा रुपये
- पाच रुपये
- दोन रुपये
- एक रुपया
- 50 पैसे
- 25 पैसे
सारांश:-
संपूर्ण जगामध्ये भारत महासत्ता होत असताना विविध प्रकारची नाणे व्यवहारात येणे व त्याच्या किमती जागतिक पैशाच्या स्वरूपात म्हणजेच डॉलरच्या स्वरूपात निश्चित करून समान मूल्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामध्ये नाणे छापण्याचे काम करते. तर कागदी स्वरूपात पैसे छापण्याचे काम भारतात नासिक येथे फार मोठी कंपनी स्थापन झालेली आहे. नाणे व रुपये स्वरूपात आज भारतात पैसे अस्तित्वात आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या काळात एकदा नाणी बदलण्यात आली तसेच पंतप्रधान मोदी सरकार यांच्या काळातही आता नाणी आणि पैसे छापण्याचे नवीन स्वरूप बदलले आहेत. म्हणून व्यवहारांमध्ये नाण्याची सुरुवात केव्हा व कशी झाली ते आज पर्यंत भारतात वापरण्यात येणारी नाणे पैसा यांची कथा या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात अजूनही सुद्धा ऐतिहासिक स्थळांमध्ये खोदकाम करताना अनेक लोकांना अनेक वेळी बँका त्या काळात नसल्यामुळे त्यांनी पैसे जमिनीत लपवून ठेवलेले नाण्याच्या स्वरूपातील पैसे खोत कामात सापडतात म्हणून ऐतिहासिक स्थळी खोदकाम करण्यास शासकीय मान्यते शिवाय खोदकाम करता येत नाही. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात ते खरे आहे.
FAQ
1 भारतात नाणे व रुपये कोणी आणले?
इंग्रजांनी
2 भारतात एक रुपया इंग्रजांनी पहिल्यांदा केव्हा आणला?
19 ऑगस्ट 1757
3 इंग्रजांनी पहिले नाणे कोणत्या शहरात तयार केले?
कलकत्ता.
4 इंग्रजांनी प्रथम नाणे कोणत्या साम्राज्यात सुरू केले?
मुघल साम्राज्य.
5 ईस्ट इंडिया कंपनीने भारतात नाणे तयार करण्याची कंपनी प्रथम कोणत्या शहरात सुरू केली?
सुरत.
अधिक माहितीसाठी आपण आमचे लेख खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आवश्यक वाचा.