प्रस्तावना
मित्रांनो! आज आपण गंगापूर जलसिंचन प्रकल्पाबाबत लेख लिहिणार आहोत. महाराष्ट्रातील गंगापूर धरणाची माहिती माहितीवर आधारित लेख सविस्तर माहिती नमूद करणारा हा लेख आहे. शेतीला पाणीपुरवठा करणे त्याचबरोबर वीज निर्मिती करणे अशा अनेक उद्देशाने महाराष्ट्र सरकार निरनिराळे धरणे प्रकल्प बांधकामकरत आहे. अशाच धरणापैकी फार मोठे धरण महाराष्ट्रातील गंगापूर धरण म्हणून प्रसिद्ध आहे. धरणाच्या माहितीवर आधारित लेख लिहिणार आहोत. त्यासंदर्भामध्ये खालील प्रमाणे माहिती आपण मराठीतून जाणून घेणे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद केली आहे.
महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य लाभलेला आहे. अशा या महान महाराष्ट्रामध्ये अनेक नद्या ,डोंगर ,शेती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तसेच या शेतीसाठी लागणारा पाणीसाठा हा सुद्धा काही भागांमध्ये मुबलक आहे, काही भागांमध्ये त्याचा तुटवडा जाणवतो ,महाराष्ट्रामध्ये असे अनेक जलसाठे आहेत त्यालाच आपण धरण असे,म्हणतो .या धरणावर अनेक लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती हा उत्तम पर्याय आहे. या शेतीसाठी लागणारे पाणी धरणातून मिळत असते. अशा धरणा धरणावर अवलंबून असणाऱ्या असणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होत असते. अशा या धरणाची माहिती आपण घेणार आहोत. त्यापैकी आज आपण गंगापूर या धरणाची माहिती आज पाहणार आहोत.
गंगापूर धरणाची मराठी माहिती |
गंगापूर धरणाचे स्थान/विस्तार
गंगापूर हे मातीचे धरण असून नाशिक जिल्ह्यात गंगापूर हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावणारी गोदावरी नदी या नदीवर गंगापूर धरण आहे .या धरणाची उंची 44.20 मीटर आहे तर लांबी 3800 मीटर आहे. यामध्ये 215.8 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पाण्यासाठी क्षमता असून त्यापैकी २०३.८ दशलक्ष घनमीटर पाणी वापरता येते.
गंगापूर धरणाचा इतिहास
गंगापूर धरण बांधायला 1947 रोजी सुरुवात झाली आणि 1965 पर्यंत त्याचे काम चालू होते. हे धरण बांधण्यासाठी तेथील गावातील लोकांना आजूबाजूच्या लोकांना स्थलांतर करावे लागले होते त्यांनी अनेक आपली घरेदारे, जमीन याचा त्याग करून त्यांनी स्थलांतर केले. त्या ठिकाणी जेवढे शक्य असेल अश आपल्या वस्तू घेऊन गेले; परंतु मोठ्या वस्तू त्यांना घेणे शक्य नसल्याने त्या धरणातच राहिल्या आहेत. ज्यावेळेस त्यांनी आपले गाव सोडत असताना मंदिराचे अवशेष ऐतिहासिक पुरानातील वस्तू या घेऊन आजही त्या चांगल्या प्रकारे जपल्या आहेत.
गंगापूर या धरणाचे दरवाजे
गंगापूर या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने या पाण्याचे विसर्ग होणे महत्त्वाचे असते त्यासाठी या गंगापूर धरणावर 9 दरवाजे बसवले आहेतएकूण 9 दरवाजे आहेत. या धरणाची लांबी 3800 मीटर आहे. उंची 44.20 मीटर आहे .
गंगापूर धरणाचे क्षेत्रफळ
गंगापूर धरणात पाणीसाठा क्षेत्रफळ 22.86 वर्ग किमी असून त्याची क्षमता २१५.८ दशलक्ष घनमीटर आहे. हे वापरण्यासाठी या धरणाची क्षमता 203.8 दशलक्ष घनमीटरअसून यावर 2286 हेक्टर शेती पिकवली जाते. या धरणाच्या क्षेत्रात 110 गावे ओलिताखाली आहेत, म्हणजेच 110 गावांना या धरणाचा फायदा होत आहे आणि 2286 हेक्टर जमीन ही ओलिताखाली आहे.
गंगापूर धरणाचे कालवे
धरणाला दोन कालवे आहेत डावा कालवा आणि उजवा कालवा
डावा कालवा
या कालव्याची लांबी 60 किलोमीटर असून याची क्षमता 8.92 घनमीटर अशी आहे.
उजवा कालवा
या धरणाची लांबी 30 किलोमीटर असून याची क्षमता 3. 68 घनमीटर आहे. उजव्या कालव्यातील ओलिताखालील क्षेत्र 23131 हेक्टर आहे तर ओलिताखालील शेत जमीन 16505 हेक्टर अशी आहे
धरणाचे वीज उत्पादन या ठिकाणी वीज उत्पादन सुद्धा केले जाते. या जलप्रपाताची उंची 7 मीटर आहे. यातून जास्तीत जास्त विसर्ग 8.92 क्युमेक्स होत असतो. वीज निर्मिती क्षमता 0.50 मेगा वॅट आहे .या ठिकाणी बसवलेले विद्युत जनित्र हे एकच आहे.
धरणा वर जायचे कसे?
गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील एक पर्यटन धार्मिक स्थळ असलेले धार्मिक ,अतिशय शांत ,निसर्गरम्य परिसर असलेल्या नाशिक जिल्हायाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे.नाशिक शहरापासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर हे धरण आहे .जवळच नाशिक रोड स्टेशन असून या रेल्वे स्टेशन पासून 25 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. तसेच ओझर या ठिकाणी विमानतळ आहे . पुण्यापासून गंगापूर धरण हे सुमारे 225 किलोमीटर अंतर आहे पुण्यापासून नाशिकला म्हणजेच गंगापूर धरणजवळ यायला जवळजवळ पाच तास लागतात. मुंबईपासून हे अंतर सुमारे 175 किलोमीटर आहे त्यासाठी सुमारे चार तास वेळ लागू शकतो.
अहमदनगर या शहरापासून 170 किलोमीटर अंतरावर हे गंगापूर धरण आहे. त्यासाठी लागणारा वेळ चार तास
गंगापूर धरणाचे विशेष
गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मातीचे धरण आहे.
नाशिक मधील गोदावरी नदीवर बांधण्यात बांधले आहे.
गोदावरी नदीवर धरण असल्याने एक पर्यटन स्थळ तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
धरणात पाणीसाठा मुबलक असल्याने आजूबाजूच्या गावांना पिकांसाठी पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
धरणामध्ये बोट क्लब असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
धरणाच्या बाजूला सुंदर अशी बाग असल्याने मनोरंजन करणारे ठिकाण आहे.
धारणापासून जवळच पांडव लेणी आहेत, त्या ठिकाणी 24 लेण्यांची साखळी बघायला मिळते.
सहलीला येणाऱ्या पर्यटकांना अतिशय आनंद देणारे उत्साह वाढवणारे असे वातावरण आहे.
हिंदू तीर्थक्षेत्रांचे अद्वितीय
गंगापूर धरणापासून 24 किलोमीटर अंतरावर मुक्तिधाम हे हिंदू तीर्थक्षेत्रांचे अद्वितीय असे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी दगडाने बांधलेले आहे या संगमरवरी दगडांवर गीतेतील 18 अध्याय पाहिला मिळतात, तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी त्याच्या प्रतिकृती भिंतीवर काढल्या आहेत.नाशिक शहर हे निसर्गरम्य, धार्मिक, शांत असे शहर आहे, त्यामुळे पर्यटक या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात.नाशिक जिल्ह्यात द्राक्षे आणि कांदा जास्त प्रमाणात पिकत आहे हे केवळ गंगापूर धारणामुळेच शेतीला पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे .गंगापूर धरण बांधण्यासाठी इंग्रजांनी पायाभरणी 75 वर्षांपूर्वी केली होती. नाशिक या शहरात असणारी लोकसंख्या आणि शेतीसाठी पाण्याचा स्रोत हा गोदावरी नदीवर असणे गरजेचे होते; याची जाणीव त्यांना झाली असल्याने गंगापूर धरणाची पायाभरणी इंग्रजांनी केली होती. आज नाशिक शहराला पाणीपुरवठा याची सोय धरणामुळे झाली आहे. नाशिक या ठिकाणी गंगापूर धरण आणि गोदावरी नदी असल्याने तीर्थक्षेत्र म्हणून आज भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते.प्रत्येक बारा वर्षांनी या ठिकाणी महाकुंभमेळा भरला जातो या कुंभमेळ्याला अनेक ठिकाणीचे ऋषीमुनी साधूपुरुष आणि सर्वसामान्य भक्तजन या ठिकाणी उपस्थित राहत असल्याने गोदावरीचे स्नान करणे हा एक त्यांच्यासाठी सुवर्णयोग असतो. गंगापूर धरणामुळे शेतीचा आणि शहराला होणारा पाण्याचा स्रोत हा खूप मुबलक असल्याने त्या ठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवत नाही.गंगापूर धरणावर वीजनिर्मिती केली जात आहे. यामुळे गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी आणि शेतीसाठी पाणी पिण्याचा प्रश्न महत्त्वाचा सुटला आहे. या ठिकाणी मनोरंजन, पर्यटन ,भक्त असे अनेक लोक या ठिकाणी भेटीसाठी आतुरलेलेअसतात.महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ख्याती सर्वदूर पसरलेली आहे .हे धरण पूर्ण मातीचे आहे आणि हे धरण गोदावरी नदीवर गंगापूर या ठिकाणी असून नामदेवराव शिंदे कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली हे धरण बांधले गेले आहे .
FAQ
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1)गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या नदी किनारी बांधले आहे ?
गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यात असून हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे
2)नाशिक या ठिकाणी कुंभमेळा किती दिवसाने भरत असतो?
नाशिक या ठिकाणी भरणारा कुंभमेळा हा बारा वर्षाने भरत असतो.
3)वाईन कॅपिटल म्हणून कोणते शहर म्हटले जाते?
वाईन कॅपिटल म्हणून महाराष्ट्रातील नाशिक हे शहर वाईन कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी द्राक्ष अधिक प्रमाणात विकत असल्याने या शहरात वाईन भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहे.
4)जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणते नाव दिले आहे?
जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर हे नाव दिले आहे.
5)जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे.
6)गंगापूर धरण बांधण्यासाठी किती कालावधी लागला?
गंगापूर धरण बांधण्यासाठी सतरा वर्षे लागली .
7)महाराष्ट्रात किती धरणे आहेत?
महाराष्ट्रात सुमारे लहानमोठी 3264 एवढी धरणे आहेत .
8)महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण कोणते आहे ?
महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण उजणी धरण आहे .
9)भारतातील सर्वात मोठे धरण कोणते ?
टीहरी उत्तराखंड.