पेटंट कायदा मराठी माहिती | Patent Law in Marathi Information

Date:2024-03-02
Blog Image
 
0

Patent Law in Marathi Information मित्रांनो, आज आपण एका नवीन कायद्याबाबत माहिती पाहूया. पेटंट कायदा मराठी माहिती Patent Law in Marathi Information भारतातील अनेक लोकांना अजून पेटंट कायदा म्हणजे काय ? याबाबत फारशी माहिती दिसून येत नाही. पेटंट कायदा कोणत्या बाबीवर आधारित आहे. याबाबत आपणास कुठे माहिती व कशी प्राप्त होईल त्याचप्रमाणे या कायद्याचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे काय?याबाबत सविस्तर माहिती या लेखातून आपण पाहूया.

Patent Law in Marathi Information
Patent Law in Marathi Information

 

 Patent Law in Marathi Information कायद्याची ओळख

 Patent Law in Marathi Informationआजच्या लेखातून पेटंट बाबत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून स्पष्टपणे नमूद करत आहे.

आपल्यापैकी अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की, पेटंट कायदा म्हणजे नेमके काय आहेत? या संदर्भामध्ये ब्लॉगर ने सुप्रसिद्ध वकील भास्करराव सांगळे, मेहकर, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्याशी या कायद्याबाबत संपूर्ण अनेक प्रश्न विचारून कायद्याची माहिती जाणून घेऊन नेमका हा कायदा काय आहेत याबाबत संपूर्ण माहिती प्राप्त केली. त्या माहितीच्या आधारे आपणास या कायद्याबाबत पुढील प्रमाणे माहितीचे स्पष्टीकरण करूया

ओळख पेटंट कायद्याची मराठी माहिती च्या आधारे विश्लेषण. Patent Law in Marathi Information पेटंट कायदा हा जगातील अनेक देशांनी त्यांच्या अस्तित्वात आणला आहे आणि लागूही केला आहे.

पेटंट कायदा जगातील शोध आणि अविष्कार तसेच उत्पादन यांचे हक्क मर्यादित स्वरूपात उत्पादक मालकाला ठराविक कालासाठी हक्क प्रदान करणारा कायदा म्हणजे पेटंट कायदा. ज्या कोणी व्यक्तीने एखादा शोध किंवा नव्याने उत्पादन केलेल्या मालकाच्या अधिकाराला कायद्याने हक्क प्राप्त करून देणारा कायदा आहेत. या कायद्याने सरकार द्वारे त्या उत्पादक कर्त्याला किंवा शोध लावणाऱ्या अविष्काराला ठराविक कालासाठी त्याच्या शोधाचे किंवा उत्पादनाचे विक्रीकरणाचे हक्क फक्त त्याला दिले जातात. यालाच सोप्या भाषेत एकाधिकार पद्धत असेही सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ. कोरोना काळात भारताने तयार केलेली कोविड-19 च्या संदर्भात लस तयार केली. म्हणजेच भारत हा देश लस तयार करण्याबाबत पेटंट ऑनर होय. covid-19 ची लस कोणाला कधी किती आणि कोणत्या देशाला उपलब्ध करून विक्री करण्याचा हक्क फक्त भारत देशालाच लस विक्री करणारा मालक म्हणजे भारत देश होय. भारताने लस तयार केल्यामुळे कायद्याने अधिकार फक्त कोविड-19 ची लस विक्री करण्याचा अधिकार भारतालाच असेल. म्हणजेच भारत देश कोविड-19 लस पेटंट ऑनर होय. कायद्याने ही लस कोणास किती कालावधी साठी विक्री करावयाची हे ज्या कायद्याने निश्चित केले जाते त्याच कायद्याला पेटंट लॉ असे म्हणतात.

अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करायचे असेल तर पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देत आहे. एखाद्या शोधा ' Patent Law in Marathi Information 'बाबत किंवा वस्तूचे उत्पादन आणि अविष्कार कायद्याने ठराविक व्यक्तीस विक्री करण्याचा हक्क त्या उत्पादकाला म्हणजेच पेटंट ऑनरला अधिकार ठराविक कालासाठी कायद्याने प्राप्त झालेला असतो. ज्या व्यक्तीला पेटंट ऑनर चा कायद्याने अधिकार प्राप्त झाला असेल त्याच व्यक्तीने ती वस्तू त्याच्या संमतीशिवाय कोणालाही विक्री करू शकत नाही व विक्री करण्याचा अधिकार नाही. ज्याला तो अधिकार प्रदान केला असेल त्यालाच वस्तू विक्री करता येईल किंवा शोध विकता येईल. पेटंट ऑनरच्या परवानगी शिवाय जर कोणी उत्पादित मालाची विक्री किंवा एखाद्या शोधाची विक्री केल्यास तो व्यक्ती या कायद्याने कायदेशीररित्या जबाबदार असून या कायद्याने त्याला कायदेशीर रित्या शिक्षाही सुद्धा होऊ शकते. सोप्या भाषेत स्पष्ट करावयाचे म्हणजे पेटंट कायदा म्हणजे एकाधिकार पद्धत होय. महाराष्ट्रामध्ये एकेकाळी कापूस खरेदी करण्याचा एकाधिकार फक्त शासनालाच प्राप्त झाला होता. जर महाराष्ट्र शिवाय इतर कोणी कापूस खरेदी केल्यास कायद्यानुसार सरकार त्याला शिक्षा करू शकते. संबंधित प्रकरण पेटंट कायद्याच्या अंतर्गत न्यायालयात चालवली जाते.

Patent Law in Marathi Information पेटंट कायद्याचे प्रमुख उद्दिष्टे

पेटंट कायद्याची उद्दिष्टे पुढील प्रमाणे नमूद करण्यात येत आहे.

१) नवीन वस्तूच्या नवीन उत्पादनाच्या आविष्काराला प्रोसन देणे.

२) नवीन शोधात चालना देणे.

३) एखाद्या विशिष्ट संस्थेस किंवा व्यक्तीस विशेष अधिकार प्रदान करणे.

४) एखाद्या संस्थेस ठराविक मर्यादित कालावधीसाठीच विशेष अधिकार प्रदान करणे. म्हणजेच विशिष्ट कालावधीसाठीच अधिकार प्रदान करण्यास मान्यता देण्याबाबत पुढील आदेशापर्यंत अधिकार प्रदान करणे.

५) उत्पादन विक्रीस मक्तेदारी निर्धारित करणे.

म्हणूनच आपणास अगदी सोप्या भाषेत पेटंट ऍक्ट म्हणजे एखाद्या संस्थेची किंवा व्यक्तींची ठराविक कालासाठी माल विक्री किंवा खरेदी करण्याची निर्धारित केलेली पद्धत म्हणजे पेटंट ऍक्ट होय.

Patent Law in Marathi Informationपेटंट ऍक्ट कायद्याचा इतिहास

 Patent Law in Marathi Information पेटंट ऍक्ट कायदा जागतिक स्तरावर अस्तित्वात आला. जगातील एका संघटनेने पेटंट 1970 मध्ये अस्तित्वात आणल्या गेला. हा कायदा कायदा अस्तित्वात आणणारी एक जागतिक संघटना आहेत. या जागतिक संघटनेचे नाव World Trade Organisation हे आहेत. या संघटनेला संक्षिप्त रूपात( WTO)वटो म्हणतात. या संघटनेमध्ये जगातील अनेक देश समाविष्ट आहेत. आपला भारत देश सुद्धा या संघटनेत समाविष्ट झालेला आहे म्हणजेच सदस्य आहेत. त्यामुळे या संघटनेची भारत सरकारने करार सुद्धा केला आहे. जागतिक स्तरावर या कायद्याच्या अनुषंगाने उपसंस्था ट्रिक्प(TRIPS) ही संस्था करारबद्ध झाली आहेत. ट्रिप्स म्हणजे Trade Related Accept of Intellectual Property Rights होय. जागतिक स्तरावर सर्व अधिकार कायदेशीर रित्या या संस्थेकडे देण्यात आले आहेत. या संघटनेची भारताचा सहभाग international legal agreement या स्वरूपात होता. म्हणजेच भारताने करार केलेला होता. या एग्रीमेंट करारानुसार 2005 मोठी सुधारणा केली. याचाच अर्थ असा होतो की पेटंट ऍक्ट (Patent act) करण्यात आली आहे. पेटंट मध्ये नियमानुसार विशिष्ट कायद्यावर आधारित कलम 3(D) चा समावेश पेटंट ऍक्ट मध्ये करण्यात आला आहे. आपल्या भारत देशाने सुद्धा patents act कायद्याची legal करार केला आहे. या कायद्याने भारत आता लवकरच जगातील स्वस्त औषधाचा एक मोठा पुरवठादार म्हणून करारबद्ध झाला आहेत त्यामुळे जगातील संघटनेची संबंधित सदस्य असणाऱ्या देशासोबत औषधाचा एकमेव पुरवठादार ठरला आहेत. म्हणजेच भारताला औषधाचा पुरवठा करण्याचा अधिकार पेटंट कायद्याने करारबद्ध हक्कदार बनला आहे.

पेटंट ऍक्ट हा कायदा  " Patent Law in Marathi Information "बहुतेक जागतिक शोधावर आधारित औषधी निर्माण करून विक्री साठी अधिकृत कायदा होय. पेटंट ऍक्ट हा कोणत्याही देशाला करार करताना सुरुवातीला वीस वर्षाचा करावा लागतो. परंतु जगामध्ये अनेक औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्यामुळे औषधांमध्ये थोडाफार बदल करून पेटंट कायद्याचे रिन्यूअल किंवा नूतनीकरण करून घेत असतात. त्यामुळेच औषध निर्मिती कंपन्या औषधाचे ड्रग्स तयार करत आहेत. औषध निर्मित कंपनीने निर्माण केलेले औषधी ever-greening of dark patents अस्तित्वात येत असल्यामुळे करण्यात येणाऱ्या संशोधनामुळे समाजासाठी विक्रीस खुले होत नव्हते. म्हणूनच कलम थ्री डी नुसार कंपन्याच्या कार्यक्षमतेत भरपूर प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता पेटंट  कायद्याचे नूतनीकरण करून देण्यास पेटंट कायद्यामुळे स्पष्टपणे नकार देण्यात येत आहे. ज्या देशाशी किंवा कंपनी पेटंट कायद्याने करारबद्ध मक्तेदारी म्हणजेच एकाधिकार देण्यात आला आहेत. तोच देश फक्त किंवा विशिष्ट कंपनीत सुद्धा त्या औषधाची विक्री करण्याचा अधिकार त्याच देशाला देण्यात येतो. मात्र आता कायद्यात थोडाफार बदल करून संशोधन अभिरुची वाढल्यामुळे कोणताही देश आपल्या देशाच्या सोयीने औषध निर्मिती करत असतो. म्हणून आता सर्वांना संशोधन करण्यासाठी या कायद्याने परवानगी दिली आहेत. संशोधनानुसार चांगल्या प्रतीची व उच्च दर्जाची जेनेरिक मेडिसिन उत्पादन वाढल्यामुळे त्या त्या वस्तूच्या किमती कमी झाल्या आहेत. आणि स्वस्तही मिळत आहे. औषध निर्मिती व पुरवठा स्वस्त दराने उपलब्ध झाल्यामुळे पेटंट कायद्याने आपले स्वरूपही सुद्धा बदलले आहेत. या कायद्यामुळे नवीन नवीन शोध लागून उत्पादन व औषध निर्मिती भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे औषधीच्या ही किमती फारच कमी झालेल्या आहेत असे दिसून येते.

पेटंट कायद्याचे निकष  Patent Law in Marathi Information

पेटंट कायद्यात 1970 मध्ये महत्त्वपूर्ण निकष देण्यात आले आहेत.

१) संशोधन हे उच्च दर्जाची असावी.

२) संशोधन हे नाविन्यपूर्ण असावे.

३) अस्तित्वात असलेल्या वस्तूचा शोध म्हणजे संशोधन नाही.

५) संशोधनाला औद्योगिक उत्पादकता असावी .

४) उपचार पद्धती व ऑपरेशन प्रक्रिया म्हणजे पेटंट नाही.

५) संशोधन करण्याची प्रक्रिया आविष्कारमय असावी.

 

Patent Law in Marathi Informationपेटंट कायद्याची नोंदणी प्रक्रिया

सर्वसामान्यपणे औषधी निर्मिती संदर्भात पेटंट कायदा अस्तित्वात आला आहेत. या कायद्याचे रजिस्टर नोंदणी करण्यासाठी भारतात एक कार्यालय आहे. त्या कार्यालयाला इंडियन पेटंट ऑफिस असे नाव दिले आहेत. त्या ऑफिसमध्ये पेटंट कायद्याची नोंदणी केली जाते. पेटींग कायद्याची नोंदणी करण्यासाठी स्वतः संशोधक नोंदणी करू शकतो किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त संयुक्तरीत्या एकत्र येऊन पेटंट कायद्याची नोंदणी अथवा रजिस्ट्रेशन करू शकतात. संशोधक स्वतः जर या कार्यालयात नोंदणी करत असल्यास त्याला (class 3 digital signature) क्लास थ्री  डिजिटल सिग्नेचर ची आवश्यकता असते. संशोधक रजिस्ट्रेशन करण्यासाठी एखाद्या एजंट मार्फत सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो. संशोधकाला पेटंट कायद्याची नोंदणी करायची असल्यास संशोधन सुरू करण्याच्या अगोदर करावी लागते किंवा संशोधकाने संशोधन पूर्ण केल्यानंतर पेटंट कायद्याची नोंदणी करता येते. संशोधकाने जर संशोधन करण्याच्या अगोदर नोंदणी केली असेल तर त्यासाठी अत्यंत एक महत्त्वाची अट आहे. ती अट म्हणजे एक वर्षाच्या किंवा एका वर्षात संशोधन पूर्ण करणे गरजेचे आहे. यातील विशेष बाब म्हणजे संशोधन करण्याच्या अगोदर जर नोंदणी केली तर त्या संशोधकाला आपल्या संशोधनाचा दुरुपयोग फार कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. बहुतेक संशोधनाचा अगोदर नोंदणी मुळे दुरुपयोग होत नाही. म्हणून संशोधन करण्याच्या अगोदरच नोंदणी करणे फायद्याचे असते. नोंदणी करण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. पहिल्या पद्धतीनुसार ऑनलाइन नोंदणी करता येते. दुसरी पद्धत म्हणजे संशोधक ऑफलाइन सुद्धा आपल्या संशोधनाची नोंदणी करू शकतो. आपली नोंदणी झाली किंवा नाही याबाबत माहिती संशोधकाला जनरल पेटंट कार्यालयात जाऊन पाहता येते काही अडचण येत नाही.

पेटंट कायद्याची भारतातील कार्यालय.

पेटंट कायद्याची नोंदणी करण्यासाठी भारतामध्ये प्रमुख चार कार्यालय आहेत. भारतात चेन्नई मुंबई नवी दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी हे कार्यालय आहेत. संशोधक किंवा एखादा व्यापारी ज्या कार्यक्षेत्राच्या आधी कक्षेत येत असेल त्याआधी कक्षेत पेटंट कायद्याची रजिस्टर नोंदणी करावी लागते. वर दर्शविलेल्या चार कार्यांपैकी कोणत्याही आपल्या अधिकार कक्षेत असणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करावी.

संशोधकाने किंवा एखाद्या व्यापारी उत्पादकाने जर पेटंट कार्यालयात रजिस्टर नोंदणी केली असल्यास ती नोंदणी पेटंट कार्यालयामार्फत गुप्त ठेवण्यात येते. ह्या माहितीच्या संदर्भात कोणालाही काहीही स्पष्टपणे याबाबत सांगण्यात येत नाही. झालेली नाव नोंदणी गोपनीय असते. ती नाव नोंदणी कुठेही प्रकाशित केली जात नाही किंवा वैयक्तिक रित्या कोणालाही सांगण्यात येत नाही. पेटंट ऑफिस हे नाव नोंदणी केल्याची गोपनीयता 18 महिने गोपनीय असते. 18 महिन्यापर्यंत कोणालाही सुगावा लागत नाही. त्यानंतर म्हणजे 18 महिन्यानंतर पेटंट ऑफिस मार्फत पेटंट ऑफिस कार्यालयाचे एक मासिक प्रसिद्ध होते. पेटंट ऑफिस मार्फत प्रसिद्ध झालेल्या मासिकात प्रकाशित करण्यात येते ‌. जर संशोधकाची 18 महिन्यानंतर मासिका मध्ये प्रकाशित माहिती झाल्यानंतर संशोधकाला किंवा उत्पादकाला पुढे परीक्षा देण्यासाठी काही कालावधी देण्यात येतो. देण्यात आलेला कालावधी हा 46 महिन्याचा असतो. त्यानंतर संशोधकाला 46 महिन्याच्या आत परीक्षा घेण्यासाठी पेटंट कायदा ऑफिसमध्ये एक विनंती अर्ज सादर करावा लागतो. विनंती अर्ज कार्यालयाने स्वीकारल्यानंतर तुमच्या अर्जाच्या संदर्भाने examination report संशोधकाला कळवण्यात येतो. संशोधकाच्या अर्जाच्या संबंधा त त्या संदर्भाने जर पेटंट कार्यालयाने काही हरकत घेतली असेल तर त्या हरकतीवर संशोधकाला त्यांची बाजू मांडण्याची पूर्णपणे संधी देण्यात येते. हरकतीच्या संदर्भात पूर्णपणे स्वतंत्र रीतीने बाजू मांडू शकता . तुमची बाजू पूर्ण मांडल्यानंतर कार्यालय घेतलेल्या हरकती पूर्णपणे समजावून घेऊन काही तांत्रिक त्रुटी असेल तर ती पूर्ण करून घेतली जाते. त्यानंतर संशोधकाला पेटंट मिळू शकते. उपरोक्त पद्धतीने पेटंट कसे मिळवावे याबाबतची सविस्तर माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.

 Patent Law पेटंट कायद्याचा कार्यकाल

संशोधकाला एकदा का पेटंट मिळाला तर त्यासाठी निश्चित कार्यकाल देण्यात येतो. संशोधकाला वीस वर्षासाठी कार्यकाल निश्चित करून देण्यात येतो. संपूर्ण वीस वर्षाच्या कार्यकाळात संशोधन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच वीस वर्षानंतर जगातील सर्वांसाठी हे संशोधन वापरण्यासाठी परवानगी असते.  कोणताही वस्तू संशोधनात त्यांनी निर्मित केलेली असते. केलेल्या सर्व वस्तू शोध आणि उत्पादन मोकळे केले जातात. येथे कोणत्याही मालकाची परवानगी घेण्याची गरज संशोधकाला नसते. म्हणूनच पेटंट कायद्याला महत्त्वाचे प्रादेशिक अधिकार प्राप्त झालेले असते.

 Marathi Informationनाव नोंदणी बाबत महत्त्वाची बाब

भारतात केलेली नाव नोंदणी इतर देशात चालते का?

जर एखाद्या संशोधकाने भारतात नाव नोंदणी केली असेल तर त्याला भारताच्या प्रदेशातच पेटंट कायद्याचे प्रादेशिक अधिकार प्राप्त झालेले असतात. भारतीय पेटंट कायद्याची नोंदणी भारतीय अधिकाराच्या कार्यक्षेत्रातच त्याला परवानगी देण्यात येते. जर त्याला इतर देशात परवानगी हवी असेल तर त्यासाठी एक वेगळी पद्धत आहेत त्या पद्धतीबाबत आपण माहिती मित्रांनो , पाहूया.

 Patent Law in Marathi Informationभारताबाहेरील देशा त नाव नोंदणीची पद्धत

जागतिक पातळीवर नाव नोंदणी करण्यासाठी 1970 मध्ये एक संस्था स्थापन करण्यात आली. त्या संस्थेचे नाव Patent Corporation Treaty असे आहेत. ही संस्था आंतरराष्ट्रीय स्वरूपाची संस्था आहेत. या संस्थेचे संक्षिप्त नाव PCT आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये जगातील जवळपास सुमारे 150 पेक्षा अधिक देश या संस्थेत सहभागी झाले आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे संशोधनाचे काम या संस्थेच्या मार्फत पूर्ण केले जाते. जर एखाद्या देशातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट कायद्याची नोंदणी करण्यासाठी भारतात अर्ज दाखल केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीच्या त्याला त्याचा अर्ज म्हणजेच त्या संशोधकाला आपला अर्ज PCT या आंतरराष्ट्रीय संस्थेत दाखल करता येत सर्व देशांचे अर्ज दाखल झाल्यानंतर एकाच वेळी सर्व संशोधकाला पॅटर्न साठी अर्ज दाखल करता येतो याचाच अर्थ असा होतो की आलेल्या सर्व संशोधकाची अर्ज एकत्रित करून सर्वांची नाव नोंदणी सिंगल इंटरनॅशनल कायद्यासाठी एकाच वेळी नाव नोंदणी करून घेतली जाते.

 Patent Law in Marathi Informationपेटंट राईट्स चे न्याय निवाडा पद्धत

एखाद्या पेटंट मालकाने पेटंट कायद्याचे नियमाचे रूल्स अँड रेग्युलेशन चे उल्लंगन केल्यास या कायद्याच्या अंतर्गत संदर्भित व्यक्ती च्या बाबत कायदेशीर कारवाई करता येते. पेटंट राईट चे उल्लंघन झाल्यास किंवा कायद्याच्या नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही विशिष्ट कार्य केल्यास कायदा त्याला परवानगी देत नाही. त्याबाबत पेटंट राईट उल्लंगणासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागण्यात येते. संशोधकाने संशोधन करताना गैरवापर केल्यास त्याचे संशोधन तत्काळ त्याक्षणी तेथेच थांबवता येते व केलेल्या गैरवापराबद्दल नुकसान भरपाईची सुद्धा मागता येते आणि करून घेतली जाते. पेटंट कायदा संपूर्णपणे न्यायालयाच्या अंतर्गत प्रादेशिक क्षेत्रात सुरक्षित आहे. या कायद्याच्या अंतर्गत दात मागण्याची ही पद्धत महत्त्वाची आहे. म्हणूनच सर्व गोष्टी पाहता पेटंट अॅक्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अधिकारी युक्त कायदा आहे.

 

सारांश

आज आपण अतिशय महत्त्वाच्या कायद्याबाबत आजच्या लेखात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या लेखातून नेमके पेटंट म्हणजे काय ? पेटंट कायदा कशासाठी आहे? आणि हा कायदा कोठे अस्तित्वात आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे किती कालावधीत करावे याबाबत अनेक व्यक्तींना माहिती काहीच नसते म्हणून पेटंट कायद्याविषयी या लेखात सविस्तर माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये नखशिखांत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास काही शंका असल्यास आपण या लेखा बाबत ब्लॉगरला कॉमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता आपल्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन.

मित्रांनो; आज आपण आपल्या ब्लॉक पोस्ट मधून नवीन कायद्याची पेटंट कायद्याची ओळख करून दिली आपणास याबद्दल आपल्या अभिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा तसेच इतरांनाही सुद्धा या ब्लॉग पोस्ट ची माहिती आवश्यक शेअर करा.

FAQ

1) पेटंट कायदा केव्हा अस्तित्वात आला?

1970.

2) पेटंट कायद्यात केव्हा सुधारणा करण्यात आली?

2005

3) पेटंट कायदा कशावर आधारित आहे?

जागतिक संशोधनाचे व अविष्कारांचे संशोधन निर्मित उत्पादन विक्रीच्या संदर्भावर आधारित आहे.

4) भारतामध्ये पेटंट कायद्याचे किती कार्यालय आहेत?

भारतात चार कार्यालय आहेत.

5) महाराष्ट्रामध्ये पेटंट चे कार्यालय कोठे आहे?

महाराष्ट्रात मुंबई येथे पेटंट कायद्याचे कार्यालय  आहेत.

अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

बिंदू नामावली तपासणी मराठी माहिती