प्रस्तावना
मित्रांनो, आज 'बिंदू नामावली तपासणी मराठी माहिती' 'The Roster Examine Marathi Mahiti' बाबत महत्त्वाच्या आवश्यक बाबी बाबत किंवा सूचनेबाबत सविस्तर माहिती या लेखातून अभ्यास करणार आहोत. शासकीय शासन सेवेत प्रवेश भरती तसेच सरकारी व निमसरकारी प्रवेश भरती करिता आणि विविध सार्वजनिक उपक्रम मधील कर्मचारी भरती बाबत संपूर्ण कर्मचारी भरतीसाठी शासनाने 100 बिंदू नामावली अनिवार्य केली आहे. सर्व स्तरावर प्रवेश भरती आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी बिंदू नामावली शिवाय कोणत्याही प्रकारचे कार्य सरकारला पूर्ण करता येत नाही. संस्था स्तरावर सुद्धा बिंदू नामावली अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भाने मागासवर्गीय अनुशेष पूर्ण करण्यासाठी बिंदू नामावली ची आवश्यकता असल्यामुळे आज आपण आपल्या लेखातून याबाबत सविस्तर माहिती चा अभ्यास बिंदू नामावली तपासणी मराठी माहिती "The Roster Examine Marathi Mahiti"
The roster Examine Marathi Mahiti |
|The roster Examine Marathi Mahiti
बिंदू नामावली तपासणी बाबत सूचना
' The roster Examine Marathi Mahiti ' दरवर्षी सरकारकडून नोकर भरती करताना किंवा मागासवर्गीय अनुशेष पूर्ण करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी बिंदू नामावली तपासण्याबाबत शासनाकडून महत्त्वाच्या सूचना आणि परिपत्रक निर्गमित केले जाते. त्या संदर्भाने आजच्या आपण या लेखातून बिंदू नामावली बाबत मराठीतून सविस्तर माहिती चा अभ्यास करण्यासाठी हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी भरती असो , खाजगी संस्थेतील कर्मचारी भरती असो , सरकारी निमसरकारी तसेच खाजगी संस्था आणि सरकारमान्य सामाजिक उपक्रम विभागात नोकर भरती करण्याबाबत प्रथम प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची 100 बिंदू नामावली आपल्या स्तरावरून तयार करून त्या बिंदू नामावली चे पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही सरकार मान्य विभागाने शंभर बिंदू नामावली आपल्या स्तरावरून तयार करून मागासवर्गीय कक्षा कडून संबंधित बिंदू नामावली ची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मागासवर्गीय कक्षा कडून 100 बिंदू नामावली प्रामाणिक करून घेतल्यानंतर तीन वर्ष पर्यंत पुन्हा तपासण्याचे काम नसते. परंतु केव्हा केव्हा दरवर्षी बिंदू नामावली अद्यावत करून मागासवर्गीय कक्षा कडून प्रतिवर्षी प्रमाणित करून घ्यावी लागते. व त्या बिंदू नामावलीच्या संदर्भाने कर्मचाऱ्यांचे समायोजन किंवा कर्मचारी भरती तसेच अनुशेष रिक्त असेल तर रिक्त जाग्यावर बिंदू नामावली प्रमाणे रिक्त अनुशेष पूर्ण करावा लागतो. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे सरकारला समायोजन करावे लागते.
दरवर्षी बिंदू नामावली अद्यावत बाबत माहिती
मित्रांनो, दरवर्षी संच मान्यतेत बदल झाला. पदाची संख्या वाढली किंवा पदाची संख्या कमी झाली. सेवानिवृत्तीनंतर पदे रिक्त झाल्यास दरम्यानच्या काळात मंजूर पद संकेत वाढ किंवा घट अथवा सेवा प्रवेश नियमात बदल झाल्यास शासनाने विहित नमुन्यात ठरवून दिल्याप्रमाणे 100 बिंदू नामावली नोंदवही विविध विभागाने आपल्या स्तरावर तयार करून मागासवर्गीय कक्षा कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय कर्मचारी भरती तसेच रिक्त पदावरील अनुशेष पूर्ण करता येत नाही. याचाच अर्थ स्पष्ट होतो की. शासकीय व निमशासकीय संस्थेने दरवर्षी अद्यावत बिंदू नामावली तयार करून मागासवर्गीय कक्षा कडून पडताळणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहेत. याशिवाय सरकार नोकर भरती किंवा रिक्त जागा भरती करण्यास परवानगी देत नाही. म्हणून यावर्षी तर संपूर्ण महाराष्ट्रभर बिंदू नामावली पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेशही सुद्धा विविध परिपत्रक निर्गमित करून देण्यात आले आहेत.
प्रत्येक शासकीय व निमशासकीय आणि सार्वजनिक मान्यता प्राप्त उपक्रमाने आपल्या विभागाची बिंदू नामावली जर प्रत्येक वर्षी कार्यात संख्येपेक्षा बदल होत असेल म्हणजेच रिक्त पदांच्या संख्यात बदल झाल्यास आपल्या विभागाचे आरक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी बिंदू नामावली अद्यावत प्रमाणित केलेली असावी. मंजूर पदे कारण पदे आणि रिक्त पदे याबाबत संख्यांमध्ये नेहमी बदल झाल्यास बिंदू नामावली तयार करून मागासवर्गीय कक्षा कडून प्रमाणीत करून घ्यावी लागते. जर एकदा बिंदू नामावली तयार करून तीन वर्षापर्यंत कोणत्याही पदसंख्या मध्ये बदल होत नसेल तर प्रत्येक वर्षी प्रमाणित करण्याची गरज नाही अशा वेळेस तीन वर्षातून एकदा प्रमाणित करणे आवश्यक असते. प्रत्येक विभागामध्ये पद भरती करताना आणि अनुशेष भरताना बिंदू नामावली अद्यावत प्रमाणित केलेली पाहिजे. तेव्हाच पद भरतीला मान्यता देण्यात येते. अन्यथा मान्यता देण्यात येत नाही.पद भरतीसाठी बिंदू नामावली आवश्यक असते.पदसंख्या बदलल्यामुळे आरक्षण अनुशेष पूर्ण करण्यासाठी बिंदू नामावली ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ज्यावेळी कार्यरत संख्या पेक्षा पदसंख्या मध्ये बदल असेल अशावेळी प्रत्येक विभागाने मागासवर्गीय कक्षाकडून अद्यावत बिंदू नामावली नोंदवही प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे
बिंदू नामावली प्रामाणिक करण्यासाठी कागदपत्रे व प्रमाणपत्रे
शासनाने ठराविक नमुन्यात दर्शविल्याप्रमाणे बिंदू नामावली नोंदवही विहित नमुन्यात असणे गरजेचे आहे. पद भरती करताना , रिक्त जागा भरताना किंवा अन्य कारणाने रिक्त जागा निर्माण झाल्यास तसेच अनुशेष पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखाने कर्मचाऱ्याकडून संपूर्ण महत्त्वाचे प्रमाणपत्र साक्षांकित करून बिंदू नामावली अद्यावत करण्यासाठी संपूर्ण प्रमाणपत्राची 100 बिंदू नामावली प्रमाणे अनुक्रमे एक ते शंभर पदे भरताना कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कागदपत्र प्रत्येक बिंदूप्रमाणेच क्रमशः लावून पडताळणी सूची फाईल तयार करणे गरजेचे आहे.
मागासवर्गीय उमेदवाराची पदभरती करताना किंवा मागासवर्गीय अनुशेष भरताना जात प्रमाणपत्र व प्रमाणपत्राची व्हॅलिडीटी म्हणजेच जात वैद्यता जात पडताळणी कक्षा कडून प्रामाणिक केलेले शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे बिंदू नामावली सोबत साक्षांकित करून मागासवर्गीय कक्षाला सादर करणे आवश्यक आहे. जात व्हॅलिडीटी फक्त मागासवर्गीय कक्षासाठीच आवश्यक आहे. खुल्या वर्गासाठी जात व्हॅलिडीटी सादर करण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र साक्षांकित केलेले खुल्या वर्गासाठी आवश्यक आहे. एखाद्या संस्थेचे एखाद्या पदा बाबत एखादे प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर त्या बाबत न्यायालयीन दावे संस्थेचे सुरू असल्यास त्याबाबतची संपूर्ण न्यायालयातील प्रकरणाबाबत असणारे संपूर्ण दावे आणि त्या दाव्यांचे संपूर्ण कागदपत्र मागासवर्गीय कक्षाला सादर करणे आवश्यक असते. संस्था स्तरावरील कर्मचाऱ्यांची न्यायप्रविष्ट प्रकरणे न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत विलंबित ठेवण्यात येते. न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मागासवर्गीय कक्ष योग्य ती कारवाई करतात व त्यानंतर बिंदू नामावली प्रामाणिक करून देण्यात येते.
बिंदू नामावली ची प्रक्रिया
शासकीय नमुन्यातील बिंदू नामावली नोंदवही प्रथम खरेदी करणे. बिंदू नामावली वर प्रत्येक पानाला पेज क्रमांक देऊन अनुक्रमे क्रमशः या बिंदू नामावली मध्ये पेज क्रमांक एक ते शंभर आहे. असे प्रमाणपत्र बिंदू नामावलीच्या पहिल्याच पानावर प्रमाणित करून ठेवणे आवश्यक आहे. बिंदू नामावली मध्ये कोणतेही पान फाडलेले नसावे. बिंदू नामावली मध्ये कोणतीही खोडतोड नसावी. बिंदू नामावली ला व्हाइटनर लावू नये. नियमानुसार बिंदू नामावली अचूक तयार करण्याची कार्यवाही संस्थाप्रमुखाची असते. बिंदू नामावली चे पहिले पान हे प्रमाणपत्र प्रमाणेच करण्यासाठी वापरावे. शेवटच्या पानावर कार्यालयातील प्रमुखाने बिंदू नामावलीचा संच मान्यतेप्रमाणे मान्य पदे रिक्त पदे अतिरिक्त पदे आणि पदे यांचा गोषवारा बिंदू नामावलीच्या शेवटच्या पानावर तयार करून विभाग प्रमुखाने आपल्या सहीने प्रमाणित करून जावक नोंदवही मध्ये नोंद घ्यावी.त्यानंतर बिंदू नामावली प्रमाणे शंभर बिंदू नोंदवही मध्ये नोंदणी. बिंदू नामावली मध्ये कोणत्या जातीसाठी किती आरक्षण आहे म्हणजेच पदाची टक्केवारी प्रमाणे पदांची नोंद घ्यावी. उदाहरणार्थ अनुसूचित जाती 13 टक्के याप्रमाणे टक्केवारी निर्धारित शासन स्तरावरून देण्यात आलेली आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून टक्केवारीनुसार पद भरती करणे आवश्यक आहे.
पदसंख्या निर्धारित करण्याचे सूत्र हे विभाग प्रमुख ला माहित असणे आवश्यक आहे तरच बिंदू नामावली अचूक तयार केली जाईल. सर्वसामान्य पुढील प्रमाणे सूत्र लक्षात ठेवावे. जातीची टक्केवारी x कार्यरत पदसंख्या÷100=बरोबर निर्धारित पद. या गणिताप्रमाणे जर संख्या पूर्णांकात आली तर पूर्णांक पदे धरण्यात यावी. या सूत्राप्रमाणे जर 1.5 पदाचे उत्तर आले तर एक पद निश्चित धरावे. जर उत्तर 1.51 किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास दोन पदे निश्चित धरावी. अतिशय सोपे आहे.अशाप्रकारे बिंदू नामावली लिहिण्याचे कार्य करावे.
बिंदू नामावली तयार करताना किंवा भरताना दोन बिंदू मध्ये कमीत कमी पाच ते सात ओळीचे अंतर ठेवून क्रमशः बिंदूची नोंद घ्यावी. कारण अनेक वेळेस पद रिक्त झाल्यानंतर त्या बिंदूखाली तोच बिंदू भरण्यास जागा असते.
अद्यावत प्रमाणित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे बिंदू एक ते शंभर भरताना अतिशय काळजीपूर्वक काम करणे. 100 बिंदू नामावली मध्ये पहिला बिंदू हा अनुसूचित जातीचा असून शेवटचा बिंदू शंभर वा बिंदू आराखीव आहे. बिंदू नामावली तयार करताना प्रत्येक जिल्ह्यावर वेगवेगळे नियम आहेत त्या सर्व नियमांची माहिती अवगत करूनच बिंदू नामावली तयार करा. सर्वसामान्यपणे सरळ सेवा भरती बिंदू नामावली आणि पदोन्नती बिंदू नामावली वेगवेगळ्या असतात याबाबत संपूर्ण माहिती प्राप्त करून घा. बिंदू नामावली बाबत संपूर्ण शासन निर्णयाचा सविस्तर अभ्यास करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन बिंदू नामावली तयार करणे सोयीस्कर असते.बिंदू नामावली तयार केल्यानंतर तपासणीसाठी अचूक असल्याची खात्री करून घ्या. बिंदू नामावली सोबत सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र दर्शक फाईल बिंदू नामावली प्रमाणे तयार करून ती फाईल सुद्धा नोंदवही सोबत पडताळणीस देणे आवश्यक असते.
बिंदू नामावली तपासणी बाबत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडे संपर्क साधून बिंदू नामावली पडताळणीसाठी मागासवर्गीय कक्षाला कोणता वेळ आणि दिनांक योग्य याबाबत ची निर्धारित करून घेणे. याबाबत आपण मागासवर्गीय कक्षाकडे संपर्क साधू शकता. त्यांनी दिलेल्या निर्धारित वेळे त बिंदू नामावली नोंदवही पडताळणीसाठी सादर करून पडताळणी करून घेणे ही मुख्य जबाबदारी कार्यालयाची किंवा संस्थाप्रमुखांची आहे याची नोंद घ्यावी. आता बिंदू नामावली अद्यावत झाल्याशिवाय पुढील पद भरतीची प्रक्रिया आपणास पूर्ण करता येणार नाही याची जाणीव ठेवून 100 बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर प्रमाणित करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. आदिवासी विभागासाठी वेगळी बिंदू नामावली आहेत. तसेच पेशा क्षेत्रासाठी वेगळी बिंदू नामावली आहे. आपण कोणत्या विभागात आहे याची खात्री करून आपली बिंदू नामावली अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संस्थेची आहे.
संस्थाप्रमु्खाने संपूर्ण बिंदू नामावली ची अद्यावत माहिती असणाऱ्या तज्ञ व्यक्तीकडून नियमानुसार काम करून घेणे आवश्यक आहे. बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडे पडताळणीसाठी सादर केल्यानंतर स्वतः बिंदू नामावली तयार करणाऱ्या तज्ञ व्यक्तीने मागासवर्गीय कक्षा स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. बिंदू नामावली मध्ये काही त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याची जबाबदारी संस्थेची असते. बिंदू नामावलीच्या प्रत्येक पानावर नियुक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी दिनांकासह स्वाक्षरी केलेली असावी. संबंधित कार्यालयाने वीत नमुन्यात कार्यालयाची बिंदू नामावली लिहावी त्यानंतर अंतिम मान्यते करता संबंधित कार्यालयास जबाबदार व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने तयार केलेली बिंदू नामावली परिपूर्ण प्रस्तावासह सादर करणे गरजेचे आहे.
बिंदू नामावली तयार करणाऱ्या व्यक्तीने शासनाचे सर्व शासन निर्णय अवगत करूनच तयार करावी. सर्वसामान्यपणे सामान्य प्रशासन विभागाकडील पत्र क्रमांक बीसीसी-2018/प्र.क.200A/16ब दिनांक 19/04/2018अन्वये दिलेल्या सूचनेप्रमाणे मागासवर्गीय कक्षा कडून रोस्टर पडताळणी झाल्यानंतर दर तीन वर्षानंतर पद संख्यात बदल झाला नसल्यास करावी. पद संकेत बदल झाल्यास किंवा शासन निर्णयात बदल झाल्यास वेळोवेळी शासनाने बदल केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आरक्षण धोरणानुसार सेवा प्रवेश बदल झाल्यास पद भरतीच्या वेळी विहित मुदतीपूर्वी बिंदू नामावली तपासणी करणे आवश्यक आहे किंवा राहील.
बिंदू नामावली आरक्षण 100 बिंदुनामावली
1) अनुसूचित जाती = 13 %
2) अनुसूचित जमाती = 07%
3) विमुक्त जमाती अ = 03%
4) भटक्या जमाती ब = 02.5%
5) भटक्या जमाती क= 03.5%
6) भटक्या जमाती ड= 02%
7) विशेष मागासवर्गीय प्रवर्ग= 02%
8) इ डब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक= 10%
9) इतर मागासवर्गीय प्रवर्ग =19%
10)अराखीव खुला प्रवर्ग ओपन =38%
परिशिष्ट-अ सरळसेवा भरतीकरीता 100 बिंदुनामावली
|
परिशिष्ट-ब प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदु
अ.क्र. |
प्रवर्ग |
आरक्षणाची टककेवारी |
बिंदु क्रमांक |
|
1 |
अनुसूचित जमाती |
13% |
1,12,21,27,37,43,51 ,61,67,73,81,91,97 |
|
2 |
अनुसुचित जमाती |
7% |
2,23,33,53,63,71,93 |
|
3 |
विमुक्त जाती (अ) |
3% |
3,41,83 |
|
4 |
भटक्या जमाती (ब) |
2.5% |
4,47 |
99 (ब/क) |
5 |
भटक्या जमाती (क) |
3.5% |
7,31,57 |
|
6 |
भटक्या जमाती (ड) |
2% |
11,77 |
|
7 |
विशेष मागास वर्ग |
2% |
15,87 |
|
8 |
इतर मागास वर्ग |
19% |
5,9,17,19,25,29,35,39, 45,49,55,59,65,69, 75,79,85,89,95 |
|
9 |
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक |
10% |
8,16,26,38,46,56,68,76,86,98 |
|
10 |
अराखीव |
38% |
6,10,13,14,18,20,22,24,28,30,32,34,36, 40,42,44,48,50,52,54,58,60,62,64,66,70,72, 74,78,80,82,84,88,90,92,94,96,100. |
उदाहरणार्थ
प्रथम शाळेने म्हणजेच शाळा प्रमुख किंवा संस्थेने ठराविक नमुन्यात सरळ सेवेची व पदोन्नतीची बिंदू नामावली तयार करून घ्यावी त्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्रामाणिक करून घ्यावी. शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतरच बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडे पडताळणीसाठी सादर करावी सोबत योग्य प्रमाणपत्रे फाईल आणि निर्धारित बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडे सादर करावी. एखाद्या संस्थेकडे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्या संस्थेने शिक्षणाधिकारी यांच्या मान्यता घेतल्यानंतर त्या संस्थेला शिक्षण उपसंचालक यांची सुद्धा मान्यता घेणे आवश्यक असते. शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी प्रमाणित केल्यानंतरच बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडे पडताळणी करण्यासाठी सादर करणे. बिंदू नामावली च्या शेवटच्या पानावर गोषवारा तयार करावा. गोषवाऱ्याखाली सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि मागासवर्गीय कक्षांचा प्रमाणित केलेला शिक्का मारलेला असणे आवश्यक आहे. यालाच कोणी कोणी ठप्पा मारलेला असावा असे म्हणतात. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी नावे देण्यात आली आहे.बिंदू नामावली तपासणी संबंधी तयार केलेल्या कार्यालयाने प्रथम प्राथमिक तपासणी पूर्ण करावी. त्यानंतर अंतिम तपासणी शासन निर्णयाप्रमाणे संवर्गासह शासन निर्णय नुसार विभाग एक ते नऊ विभागाने आपापल्या विभागाकडून तपासून घेणे आवश्यक आहे.
बिंदू नामावली तपासणीसाठी कागदपत्राची सूची योग्य पद्धतीने जोडलेली असावी.
कागदपत्राची पडताळणी सूचीण टक्केवारी सध्या अस्तित्वात असणारी
चेक लिस्ट
माननीय सहाय्यक आयुक्त यांच्या नावाने बिंदू नामावली तपासणी करून देण्याबाबतचे पत्र
पडताळा सुचित दर्शविल्याप्रमाणे अनुक्रमे 01 ते 27 क्रमांकासह कागदपत्रे सोबत जोडणे.
संपूर्ण नियमानुसार बिंदू नामावली तयार केल्यानंतर बिंदू नामावलीच्या शेवटी पुढील प्रमाणे पत्र बिंदू नामावली शेवटी देण्यात यावी.
हमी प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की,
संबंधित बिंदू नामावली वरील प्रमाणे चेकलिस्ट अनुक्रमांक एक ते 34 मधील दर्शविण्यात आलेली संपूर्ण माहिती मूळ अभिलेखावरून तपासली असता संपूर्ण माहिती तंतोतंत बरोबर आहे. याबाबतची खात्री केली असून त्या संबंधाची सर्व कागदपत्रे बिंदू नामावली सह प्रस्तावासोबत सादर केलेली आहेत आणि याची दुय्यम प्रत ही स्थळ प्रत म्हणून कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. शाळा तपासणीच्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी मागताक्षणी त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित प्रस्तावामध्ये व 100 बिंदू नामावली मध्ये कोणत्याही प्रकारची सादर केलेली माहिती खोटी किंवा चुकीची देण्यात आली नसून संपूर्ण माहिती तंतोतंत बरोबर आहे. याबाबतची माहिती आपणास खोटी किंवा चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला संपूर्णपणे संस्था किंवा संबंधित कार्यालय जबाबदार राहील अशा प्रकारची हमी आपणास देण्यात येते की, बिंदू नामावली ही तंतोतंत बरोबर आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. तसेच या संबंधाने कोणतेही प्रकरण न्याय प्रविष्ट नसल्याबाबत स्पष्ट करत आहेत करिता आपणास हे हमीपत्र बिंदू नामावली सोबत सादर करत आहेत.
दिनांक.
ठिकाण नियुक्ती अधिकाऱ्याची सही
नाव
पदनाम
मोबाईल नंबर
संस्थेचा पत्ता
पत्रव्यवहाराचा पत्ता
FAQ
1) सध्या किती बिंदू नामावली चा वापर केला जातो?
100 बिंदू नामावली.
2) बिंदू नामावली चे किती प्रकार आहेत?
बिंदू नामावली चे दोन प्रकार आहेत
एक सरळ सेवा भरती बिंदू नामावली
दोन पदोन्नती बिंदू नामावली.
3) सर्वसामान्यपणे बिंदू नामावली किती वर्षानंतर तपासावी?
सर्वसामान्यपणे दर तीन वर्षांनी बिंदू नामावली पडताळणी करावी किंवा तपासावी.
4) बिंदू नामावली पडताळणी विभागाचे सांगा?
बिंदू नामावली मागासवर्गीय कक्ष.
5) बिंदू नामावली तपासणीचे स्तर सांगा?
प्रथम स्तर शिक्षण अधिकारी.
द्वितीय स्तर शिक्षण उपसंचालक.
तृतीय स्तर आयुक्त मागासवर्गीय कक्ष
6) दरवर्षी बिंदू नामावली का तपासून घ्यावी.
संच मान्यतेप्रमाणे पद संख्यात बदल झाल्यास बिंदू नामावली दरवर्षी अनुशेष व रिक्त पद आणि कार्यरत बदल होतो त्यावेळेस मागासवर्गीय कक्षा कडून दरवर्षी बिंदू नामावली प्रामाणिक करून घेणे गरजेचे असते.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.