प्रस्तावना
मित्रांनो ,आज आपण भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाच्या घटस्थापना या सणाबाबत सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करणार आहेत. आपल्या भारत देशाच्या संस्कृतीमध्ये संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे वैशिष्ट्य पण वेगवेगळे आहेत.
घटस्थापना सविस्तर मराठी माहिती |
घटस्थापना मुहूर्त
आपण आपल्या देशात भारतीय संस्कृती प्रमाणे विविध सण विविध धर्मामध्ये आनंदाने साजरी करतो. जगातील सर्वात जास्त सण कोणत्या देशात साजरी केले जात असेल तर ते सण भारत देशात साजरे केले जातात. जगातील कोणत्याही देशात एवढे सण साजरे केले जात नाही. पण आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली असून आपल्या संस्कृती प्रमाणे आपण मराठी सणा प्रमाणे आश्विन महिन्यात घटस्थापना हा सण अश्विन महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी पितृ पंधरवाड्यानंतर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना केली जाते. यावर्षी घटस्थापनेचा मुहूर्त इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 15 ऑक्टोंबर रविवारी या दिवशी होत आहे. मराठी कॅलेंडर प्रमाणे घटस्थापनेचा मुहूर्त अश्विन शुद्ध एक या शुभ दिवशी शारदीय नव रात्रारंभ शारदीय देवीची स्थापना तसेच घटस्थापना सकाळी दहा वाजून 23 मिनिटानंतर विशेष म्हणजे नवरात्री समूह सुरुवात पण होते. तसेच देवीची स्थापना पण होते. याच दिवशी मित्रांनो संत मुक्ताबाई जयंती पण आली आहे त्याचबरोबर या दिवशी जागतिक अंध दिवस आहे जगभर साजरा होणार आहेत . याच दिवशी पारशी खुर्द मासारंभ सुरू होत आहे. घटस्थापनेच्या दिवशी सूर्य सकाळी सहा वाजून 28 मिनिटांनी सूर्योदय होणार आहे तसेच सायंकाळी सूर्य अठरा वाजून दहा मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे . चंद्र हा तूळ राशीत आगमन सुद्धा करू शकतो ते नमूद केले आहे. म्हणून घटस्थापना मुहूर्त रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी स्थापना होणार आहे. व याच दिवशी नवरात्र देवी स्थापना हिंदू धर्माच्या चालीरीती प्रमाणे विविध प्रकारची पूजा विविध संपन्न करून घटस्थापना करण्यात येणार आहे संबंधित माहिती आपण या लेखांमधून स्पष्टपणे नमूद च करणार आहोत. अनेक जणांपैकी घटस्थापना आणि नवरात्र सण हे भारतात मोठ्या उत्साहाने या सणाला सुरुवात होणार आहे.
घटस्थापनेच्या दिवशी काय करावे?
घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान विधी संपून अंगावर स्वच्छ कपडे घालावे. शारदीय देवी बसण्याच्या पहिल्या दिवशी मंदिर स्वच्छ करून घेऊन पाणी शिंपडण्या त यावे. नंतर एक नवीन स्वच्छ लाल कपडा घेऊन त्यावर थोडे तांदूळ ठेवावेत. जवज्ञआणि गहू पेरावे. व खालील प्रमाणे घटस्थापना आणि साहित्याची मांडणी करावी.
घटस्थापना आणि घटस्थापना ची साहित्य मांडणी
मित्रांनो ,घटस्थापना साठी लोक हिंदू धर्माप्रमाणे बाजारात जाऊन घटस्थापना चे साहित्य खरेदी करतात व ते साहित्य घटस्थापना साठी आवश्यक आहे . घटस्थापना साठी आवश्यक असणारे साहित्य या लेखात स्पष्टपणे पुढील प्रमाणे नमूद करण्यात येत आहे
जगदंबा देवीचे नामस्मरण करून घट मांडणी करण्यास सुरुवात करावी.
प्रथम परडी घेतली जाते.
त्या परडी मध्ये काळी माती भरली जाते .
काळया मातीवर थोडे पाणी सोडले जाते. त्या काळ्या मातीवर तांब्याच्या धातूचे भांडे ठेवले जाते. भांड्याला सर्व बाजूने हळदीकुंकू लावले जाते. नंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरले जाते. तांब्याच्या भांड्यावर पाणी भरल्यानंतर नागिणीचे नऊ पाने किंवा कुणी आंब्याची ही पाने वापरतात . नागिनी चे किंवा आंब्याचे पान प्राप्त झाले नाही तर शहरातून लोक अशोक वृक्षांची पाने गटासाठी वापरतात.ठेवून त्यावर श्रीफळ ठेवले जाते. त्या तांब्या ला गोलाकार दोरा ही सुद्धा बांधण्यात येतो. आणि भिजवलेल्या काळ्या मातीवर बाजारातून खरेदी केलेले नऊ धान्य थोड्या थोड्या स्वरूपात टाकले जाते. अंदाजे ग्रामीण भागामध्ये त्या काळ्या मातीवर जे नऊ धान्य पेरली जाते किंवा टाकले जाते ते धान्य नऊ प्रकारचे असते. म्हणजे ज्वारी, गहू, करडी ,जवस, हरभरा, मुग, तिळ, मोहरी आणि साळ असे सर्व धान्य एकत्र करून त्या मातीमध्ये पेरण्यात येतात. नंतर घटा स दररोज नवीन फुलांची माळ घटा स घातली जाते .माळ घातली जाते व देवीची आरती घेऊन पूजा करून घट बसवण्यात येतो. अखंड नऊ दिवस दिवा तेवत राहण्यासाठी माता-भगिनी विशेष काळजी घेतात व घटस्थापना संपूर्ण विधी पूर्ण करून पुढील प्रमाणे घटा भोवती असणाऱ्या मातीत ९ धान्य पेरण्या चा प्रकार सुद्धा दृष्टीस येतो. त्यामागील काही श्रद्धा त्यांच्याजवळ असते. सर्वसामान्यपणे शेतकरी वर्गामध्ये हे घटा भोवती धान्य पेरण्याची काम पूर्ण केले जाते.नऊ धान्य मातीत पेरण्याचे काम केल्यानंतर नऊ दिवसानंतर या नऊ धान्य पैकी जे धान्य चांगले पिकले असेल किंवा चांगले उगवण शक्ती झाली असेल त्यावर्षी ते पीक चांगले येईल असा ग्रामीण भागातील लोकांचा समज आहे. . सर्वसामान्यपणे ग्रामीण भागात रब्बी मध्ये किंवा रब्बी हंगामामध्ये पेरण्यात येणारी नऊ धान्य घेतली धान्य उगवून वर आल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी त्या घटावरील उगवणाऱ्या पिकास धन असे म्हणतात. व विजय दशमी या दिवशी या धनाची पूजा केली जाते.आपापल्या श्रद्धा प्रमाणे व परंपरेप्रमाणे काही ठिकाणी वेगळ्या स्वरूपातही सुद्धा घट मांडणी होऊ शकते किंवा केली जाऊ शकते.. घटा च्या सभोवती ऊस किंवा बांबू यांचे गोलाकार कडे ठेवले जातात घट मांडणी संपूर्ण झाल्यानंतर जगदंबेचे स्मरण करून त्यानंतर दिवा लावून कळसा ची पूजा करावी अशी श्रद्धा आहे सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये या सणांमध्ये वरील साहित्य घट आणि घट मांडणी याबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे.
. घटस्थापना पासून तर नऊ दिवस हा संपूर्ण सण गटाला नऊ माळा वेगवेगळ्या फुलांच्या घालून काही ठिकाणी साजरा केला जातो. अनेक सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मंडळे देवीची पण स्थापना करतात. आणि भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या देवीचे मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी प्रचंड उत्साहाने अतिशय आनंद पूर्वक हिंदू धर्माच्या चालीरीती प्रमाणे हा सण साजरा करण्यात येतो. तसे पाहिले तर घटस्थापना ही वर्षातून एकदाच अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी होते व नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी विजय दशमी साजरी करण्यात येते. पण देवीची स्थापना व महत्त्व लक्षात घेता भारतामध्ये मराठी महिन्या प्रमाणे म्हणजेच मराठी कॅलेंडर प्रमाणे नवरात्रीचा सण भक्तांसाठी महत्त्वाचा आहे. देवीचे महत्व व उत्सव आश्विन चैत्र माघ आणि आषाढ या चार महिन्यांमध्ये देवीची स्थापना करून मोठ्या भक्ती भावाने भारतीय परंपरेप्रमाणे देवीची पूजा भक्तगण साजरी करत असतात. आश्विन महिन्यांमध्ये शारदीय देवीचे महत्त्व आहे. तर चैत्र महिन्यामध्ये दुर्गा देवीचे महत्व आहे. मग आणि आषाढ महिन्यात गुप्त नवरात्र म्हणतात. कोणत्याही देवीचा उत्सव म्हटला म्हणजे तो नऊ दिवसाचा समूह किंवा संच असतो म्हणून आपण त्याला नवरात्र उत्सव असे सुद्धा म्हणतो.
घटस्थापना विशेष महत्त्व
अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी होणाऱ्या घटस्थापना ला विशेष महत्त्वाचे स्थान आहेत. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत या उत्सवात महत्व आहे. हे नऊ दिवस अत्यंत हिंदू धर्मात पवित्र मानले जातात. व नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजा अर्चना पार पाडली जाते. व देवीची पूजा सुद्धा केली जाते. देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी घरा घरातून घटस्थापना होऊन घरी सुद्धा देवीची स्थापना केली जाते आणि मंडळा मार्फत ही सुद्धा देवीची स्थापना केली जाते. या काळामध्ये निरनिराळ्या प्रकारचे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सांस्कृतिक स्वरूपाचे कार्यक्रम होतात. काही लोक देवीचा गोंधळ सुद्धा या नऊ दिवसात घेतल्या जातो. तसेच या काळामध्ये भजने आणि कीर्तन या स्वरूपाचे कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात येते. तर गावाकडील ग्रामीण भागात जागरण ही सुद्धा पारंपारिक रीतीने घेतले जाते. तर शहरामध्ये रास गरबा खेळून रात्री जागवल्या जातात . संपूर्ण नऊ दिवस अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. या काळात काही लोक नऊ दिवस अन्नपाणी ग्रहण न करता उपवास साधना करतात कारण देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास केले जातात.
या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक उपवास करणारे एक गोष्ट चांगली लक्षात असू द्या किंवा लक्षात ठेवा.
नऊ दिवस आपण उपवास करत असताना नऊ देवींची पूजा करत आहे हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
पहिल्या दिवशी आदिशक्ती शैली पुत्री या देवीची पूजा असते. दुसऱ्या दिवशी ब्रह्म चरणी देवीची पूजा असते.
तिसऱ्या दिवशी चंद्रघटा या देवीची पूजा असते.
चौथ्या दिवशी कुष्मांडा या देवीची पूजा असते . पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा असते. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा असते. सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा असते. आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा असते. नव्या दिवशी सिद्धीदात्री या देवीची पूजा असते. वरील नऊ दिवस म्हणजे देवीचे नऊ रुपे होय आणि या नऊ रूपाची पूजा केली जाते. अशी एक कल्पना आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा अर्थ असा होतो की आपल्या भक्ताज्ञवरील संकट दूर करून त्यांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. म्हणून या दिवसात देवी भोवती फेरे घालून देवीला आपल्या नवसाला पावण्याची व आशीर्वादाची मागणी घालण्यात येते. परंपरा बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. काही भक्तगण निरनिराळ्या ठिकाणी देवीचे मंदिरे आहेत त्या ठिकाणी दर्शनात जातात व देवीची ओटी ही सुद्धा भरली जाते. नऊ दिवस नऊ प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात सजावट करून फुलांच्या माळा घालून कदाचित मंडप ही सुद्धा घालून निरनिराळ्या ठिकाणी देवीची स्थापना होते.
शहरी भागामध्ये पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले दांडिया खेळतात. सर्वत्र नऊ दिवस आनंदमय वातावरण निर्माण झालेले असते.
पूजा विधी प्रकार
दररोज स्नान करून नवीन कपडे परिधान करून देवीची पूजा करावी.
दररोज पुष्पहार नवीन फुलांचा घटास घालण्यात यावा.
दररोज प्रथम गणपतीची पूजा करून नंतर गटाची व देवीची पूजा करावी.
दररोज देवी समोर रांगोळी घालण्यात यावी.
दररोज देवीला पानाचा विडा देण्यात यावा व पूजन करण्यात यावी.
दररोज देवीला हळदी कुंकू लावून पूजा करावी.
दररोज देवीचा मंत्र पठण करून जप करावा.
दररोज देवीला दुर्गाला आव्हान करा.
दररोज अगरबत्ती धूप निरंजन लावून घंटा वाजून देवीची पूजा करून देवीला ओवाळणी घालावी.
सर्वत्र घरात पाणी व देवीला पाणी व सुगंधाचा गंध अर्पण करावा.
दररोज मंत्रो पचार करून ध्यान धारणा करावी.
दररोज देवीची आरती करावी.
व दररोज देवीला नैवेद्य अर्पण करावा.
सर्वसामान्यपणे आपणाकडून जे शक्य होईल त्याप्रमाणे पूजा करावी . सर्व आपल्याला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवीला प्रसन्न करून घ्यावे.हिंदू धर्माप्रमाणे शास्त्रामध्ये जसे सांगितले त्याप्रमाणे घटस्थापना करून धार्मिक मान्यतेनुसार कळस हे देवता आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानल्या गेल्यामुळे कळसा ची पूजा नऊ दिवस करावी. सर्व प्रकारे दळवी शक्तीला आव्हान केल्यामुळे माणसातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व व्यक्ती सकारात्मक वृत्तीने व धार्मिक वृत्तीने वागण्यास सुरुवात करतात हा एक महत्त्वाचा फायदाच आहे.
शेतकऱ्याच्या दृष्टीने घटस्थापने ला अनन्य साधारण महत्व
शेतकऱ्याच्या दृष्टीने घटस्थापने ला अनन्य साधारण महत्व आहे. कारण शेतकरी आपल्या शेतीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे धान्य पेरत असतो व आपणास चांगले पीक प्राप्त व्हावे म्हणून शेतकरी आपल्या घरातून घटस्थापना करतात व घटस्थापना केल्यानंतर धर्मशास्त्राप्रमाणे सर्व विधी पूर्ण करतात व देवीकडे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचे पिकाचे उत्पादन व्हावे यासाठी देवी जवळ आशीर्वाद मागतात. शेतकऱ्याच्या नवसाला देवी पावते असे म्हटले जाते. हवामान रोगराई आणि इतर पिकाला पोषक असे वातावरण जर कोणी निर्माण करत असेल तर ते घटा च्या रूपात देवी शेतकऱ्याला आशीर्वाद देत असते. म्हणून चैतन्यमय व आनंदी वातावरणाने शेतकरी आपल्या घरात दरवर्षी नियमानुसार घट स्थापना करतात.
पौराणिक महत्त्व
पुराणा मध्ये एक अशी आख्यायिका आहे की, महिषासुर नावाचा फार मोठा राक्षस होता. देवापासून तर सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत या महिषासुर राक्षसाने लोकांना त्रस्त केले होते. महिषासुर यांना एक वर प्राप्त झाला होता की त्याने ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो व्यक्ती जळून भस्म होत होता. म्हणून लोक त्याला भस्मासुर असे सुद्धा म्हणत होते. याच राक्षसाचा एक भाऊ बाणासुर आई सुद्धा राक्षस गण असल्यामुळे लोकांना त्रास देत असे. त्यामुळे देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. म्हणून कोणी या देवीला महिषासुरमर्दिनी असेही सुद्धा म्हणतात. या कारणास्तव हे नऊ दिवस मोठ्या भाव भक्तीने देवीची व गटाची पूजा करून लोक हा सण साजरा करतात. डाव्या दिवशी या देवीचे विसर्जन केले जाते. या सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात त्यामुळे एकमेकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊन जवळीक निर्माण होते.
सारांश
घरात घट स्थापन केल्यानंतर देवीची आरती "दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी"ही आरती नियमित दररोज पूजा करताना म्हणावी. शास्त्रीय भाषेत घटस्थापना म्हणजे बियाची परीक्षा करणे होय. शेतकरी घटामार्फतच ठरवत असतो की कोणते पीक यावर्षी चांगले येणार आहे. घट म्हणजे बीज परीक्षण होय. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात यावर्षी दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रविवारी घटस्थापना करावी. शेतकऱ्याच्या दृष्टीने पिकाची उगवण क्षमता व पुरेसा पाणी याबाबत घटस्थापना करताना योग्य प्रकारचे नऊ धान्य आता भोवती पेरावी. गणेश विसर्जनानंतर पितृपक्ष संपल्यानंतर अश्विन महिना सुरू होतो. यावर्षी 14 ऑक्टोबर 2023 ला शेमी अमावस्या आली असून दुसऱ्या दिवशी अश्विन महिना सुरू होतो. भाद्रपद हा महिना संपलेला असतो. व नवरात्राला प्रारंभ झालेला असतो. म्हणून सर्व भारतभर घटस्थापना व देवीची स्थापना नऊ दिवस पर्यंत मोठ्या भाव भक्तीने साजरी केली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साडेतीन मुहूर्तातील एक चांगला मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी लोक सोने नाणे खरेदी करत असतात. खेड्यापाड्यांमध्ये विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने आणि सोने म्हणून आणि जिवारीचे पाने चांदी म्हणून एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन घेतात व चांदी सोन्याचे देवाण-घेवाण करून या सणाची समाप्ती मोठ्या आनंदाने होते. या सणामुळे लोक एकमेकाचे दर्शन घेण्यासाठी घरोघरी गेल्यामुळे या सणाच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे हे एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. उपरोक्त पद्धतीने साध्या शब्दांमध्ये या लेखात घटस्थापना याबाबत सविस्तर माहिती देण्याचे प्रयोजन पूर्ण केले आहे.
FAQ
1) भाद्रपद महिना केव्हा समाप्त होतो?
14 ऑक्टोबर 1923 रोजी
2) घटस्थापना कोणत्या महिन्यात करण्यात येते?
घटस्थापना आश्विन महिन्यात करण्यात येते
3) 2023 मध्ये घटस्थापना कोणत्या दिवशी होणार आहे?
15 ऑक्टोबर 2023 रोज रविवार.
4) घटस्थापनेचा नेमका शास्त्रीय अर्थ काय आहे?
घटस्थापनेचा शास्त्रीय अर्थ बीज परीक्षण आहेत.
5) घटस्थापनेच्या नऊ दिवसानंतर दहाव्या दिवशी कोणता सण साजरा केला जातो?
विजयादशमी किंवा दसरा.
इतर माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
01ऑक्टोबर पासून आधार कार्ड बाबत नवीन नियम
पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती 2023
महाराष्ट्रातील आरक्षण सविस्तर माहिती
गंगापूर धरणाची मराठी माहिती
शाळा मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन