गोपनीय अहवालाबाबत सविस्तर मराठी माहिती |All information of Confidential Report In Marathi

Date:2024-03-02
Blog Image
 
0

प्रस्तावना

मित्रांनो, गोपनीय अहवाल म्हणजे काय ? गोपनीय अहवाल लिहिण्याची काय गरज आहे?  या संदर्भामध्ये खाजगी माध्यमिक शाळेमध्ये गोपनीय अहवाल बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा  लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे .शालेय स्तरावर कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाबाबत सविस्तर माहिती आज या लेखातून लिहीत आहोत.कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये शालेय घटकांची माहिती अभ्यासताना शालेय स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी गोपनीय अहवाल इतिवृत्तांन्त सह सर्व माहिती दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रमुखांना गोपनीय अहवाल नोंदी दरवर्षी ठेवण्यात येतात. म्हणून आपण शालेय विभागाशी संबंधित शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचारी यांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्याची किंवा कामांची नोंद शासनाने ठराविक नमुन्यात ठरवून दिल्याप्रमाणे गोपनीय अहवाल लेखन कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी केले जाते. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वर्षभरात चांगल्या वाईट तसेच शाबासकी प्राप्त नोंदी ह्या गोपनीय अहवालात माध्यमिक शाळा संहिता 1981 नुसार ठेवण्याची पद्धत स्पष्टपणे नमूद केली आहे. मित्रांनो आज आपण गोपनीय अहवाल बाबत सविस्तर माहिती मराठी भाषेतून लिहिण्यासाठी हा लेख हाती घेतला आहे.

 

गोपनीय अहवालाबाबत सविस्तर मराठी माहिती
गोपनीय अहवालाबाबत सविस्तर मराठी माहिती


 

शालेय स्तरावर कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल

महाराष्ट्रातील शाळा कोणत्याही प्रकारची असो किंवा कोणत्याही माध्यमाची असो किंवा अनुदानित अथवा विनाअनुदानित तसेच स्वयं अर्थशास्तित तत्त्वावर चालणारी शाळा मग ती कोणत्याही प्रकारची असो त्या शाळेत कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल हे अत्यंत महत्त्वाचे शालेय विविध घटका पैकी गोपनीय अहवाल दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरवर्षी संपणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत शालेय स्तरावर व शासन स्तरावर विभागप्रमुखांना गोपनीय अहवाल आपल्या आस्थापनेवर आधारित कर्मचाऱ्यांचे मुख्य दस्तऐवज म्हणजे गोपनीय अहवाल संपूर्ण वर्षभराच्या नोंदी घेऊन शासकीय नियमाप्रमाणे अहवाल ठेवणे विभाग प्रमुखाला आवश्यक बाब आहेत. कर्मचाऱ्यांच्या शालेय स्तरावर शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चांगल्या वाईट गुणांच्या नोंदी दर्शक हे गोपनीय अहवाल लिहिणे महत्त्वपूर्ण बाब असल्यामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गोपनीय अहवाल हे शासनाने ठरवून दिलेल्या विविध नमुन्यात असलेले अभिलेख विभाग प्रमुख आला गोपनीय अभिलेख लिहिणे आवश्यक आहे. संबंधित गोपनीय अहवालाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन करण्यात येते. संबंधित गोपनीय अहवालामध्ये विभागप्रमुख कर्मचाऱ्यांनी दर्शविलेल्या मताशी सहमत आहे किंवा नाही याबाबत स्पष्ट नोंदी असतात. शाळेमध्ये दरवर्षी मुख्याध्यापक किंवा शाळेचा विभाग प्रमुख अथवा शाळेला असलेला प्राचार्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गोपनीय अहवाल हे लिहिण्याचे काम करतात. गोपनीय अहवाल लिहिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांचे पुनर्विलोकन केले जातात. सर्व कर्मचाऱ्यांचे लिहिलेले गोपनीय अहवाल हे कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत पर्सनल फाईल मध्ये ठेवण्यात येतात. शासकीय नियमाप्रमाणे वर्ग चार क्रमांकाच्या म्हणजेच प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल हे त्यांच्या वैयक्तिक पर्सनल फाईल ला अभिप्राया सह ठेवण्यात येतात.

गोपनीय अहवाल का ठेवण्याची गरज आहे?

विद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला भरती देण्याची गरज आहे किंवा वार्षिक वेतन वाढ देण्याची गरज आहे किंवा वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी देण्याची गरज आहे त्यासाठी गोपनीय अहवाल असणे आवश्यक आहे. गोपनीय अहवाल कसे लिहिले जाते याचा अभ्यास प्रथम मुख्याध्यापकाने करणे गरजेचे आहे. गोपनीय अहवाल लिहिण्याचा संपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय गोपनीय अहवाल लिहिणे हे नियमबाह्य आहेत. कारण गोपनीय अहवाल लिहिण्या मध्ये चूक होण्याची दाट शक्यता असते. व त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर बढती किंवा पदोन्नती तसेच निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्रास होतो. मुख्याध्यापक यांनी अभ्यासपूर्वक गोपनीय अहवाल येणे गरजेचे आहे. गोपनीय अहवाल लिहिण्याबाबत शासन स्तरावर अनेक पत्र व शासन निर्णय किंवा परिपत्रके निर्गमित करण्यात आली आहे. काही शाळेमध्ये तर असे लक्षात आले आहे की गोपनीय अहवाल लिहिल्यास गेले नाही. म्हणून आपण या लेखातून गोपनीय अहवालाबाबत लिहिणे गरजेचे आहे .याचे स्पष्टीकरण करत आहोत. मुंबई प्राथमिक कायदा 1960 तसेच माध्यमिक शाळा संहिता व सेवाशर्ती नियम 19 81 नुसार शिक्षण विभागाकडून गोपनीय अहवालाबाबत सविस्तर माहिती व परिपत्रके निर्गमित करून प्रत्येक शाळेला गोपनीय अहवालाबाबत लिखाण काम करण्याचे सांगण्यात आले आहेत.

गोपनीय अहवाल म्हणजे काय?

शालेय स्तरावरील कार्यरत कर्मचारी सेवा करत असताना वर्षभराच्या त्यांच्या कामाचे मोजमापण करण्यासाठी किंवा मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्यातील चांगल्या वाईट गुणांची नोंद दर्शविणारे दस्तावेज म्हणजे गोपनीय होय. गोपनीय अहवालामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांची पारदर्शक पद्धतीने स्पष्टपणे नोंद करणे गरजेचे असते. शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी आपले कर्तव्य बजवताना त्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर न करता कार्य करण्याचे काम कर्मचाऱ्यांचे असते व या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण नोंदी गोपनीय अहवालाच्या दस्तऐवज मध्ये मुख्याध्यापक मार्फत नोंदवल्या जातात आणि गोपनीय अहवालात नोंदवलेल्या नोंदी चे पुनर्विलोकन जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाधिकारी करत असतो. मुख्याध्यापकाने लिहिलेले गोपनीय अहवाल आपल्या काय असता पाण्याच्या प्रमुख कडे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले पाहिजे असे स्पष्टपणे नियमात नमूद केले आहेत.

गोपनीय अहवालाबाबत महत्त्वाचे मुद्दे

1) कर्मचाऱ्यांचा किंवा कार्यालय प्रमुख चा कार्यकाल हा तीन महिन्यापेक्षा कमी सेवा काळ असेल तर अशा कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याची गरज नाही. जर अशा कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिले तर त्याकडे दुर्लक्ष केले जाईल अशी स्पष्टपणे माहिती नमूद केली आहे.

2) सर्वसामान्यपणे एप्रिल महिन्यामध्ये गोपनीय अहवाल येणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर शालेय शिक्षण वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत महिन्याच्या शेवटी म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी लिहिणे आवश्यक आहे. विभागप्रमुखांनी किंवा मुख्याध्यापकाने गोपनीय अहवाल लिहिल्यानंतर त्या अहवाला बाबत संबंधित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने लिहिलेले गोपनीय अहवाल हे तीन महिन्याच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांना निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. जर गोपनीय अहवाल संबंधित कर्मचाऱ्याला तीन महिन्याच्या आत निदर्शनास आणून दिले नाही किंवा दिले नाही तर विभागप्रमुखांना किंवा मुख्याध्यापकांना याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाला उत्तर देणे आवश्यक असते.

3) गोपनीय अहवाला संबंधी मुख्याध्यापकाने कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रतिकूल अभिप्राय योग्य वेळी किंवा तीन महिन्याच्या आत म्हणजे 31 ऑगस्ट च्या जर कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली नसेल किंवा काहीही कळवले नसेल तर मुख्याध्यापकाने दिलेले प्रतिकूल अभिप्राय हे ग्राह्य धरण्यात येत नाही. मुख्याध्यापकाने लिहिलेले प्रतिकूल अभिप्राय हे ऑटोमॅटिक किंवा आपोआपच अनुकूल ठरवण्यात येतात. कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देणे हे मुख्याध्यापकाचे आवश्यक कर्तव्य आहे.

4) कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रतिकूल अभिप्राय विरुद्ध कर्मचाऱ्याला सक्षम अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते. समजा मुख्याध्यापकाने उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचे प्रतिकूल अभिप्राय लिहिले असेल तर संबंधित कर्मचाऱ्याला प्रतिकूल अभिप्राय विरुद्ध शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येते. तसेच इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा हीच पद्धत राबवण्यात येते.

5) एखाद्या कर्मचाऱ्यास कोणत्याही कारणास्तव जर शिक्षा झाली तर त्याबाबत सर्व प्रकारचा सखोल विचार करून गोपनीय अभिलेख मध्ये त्याचा उल्लेख करता येईल. गोपनीय अहवालात लेखी स्वरूपात नोंद नमूद करण्यात आली पाहिजे. जर तोंडी किंवा मोघम स्वरूपात एखाद्या कर्मचाऱ्याला ताकीद किंवा खरडपट्टी केली असल्यास फक्त तोंडी स्वरूपात दिलेली माहिती योग्य धरण्यात येत नाही किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसते. शिक्षाही ठराविक पद्धतीने लेखी नियमानुसार गोपनीय अहवालात नमूद केली असल्यास त्याबाबतचा उल्लेख गोपनीय अहवालात करणे मुख्याध्यापकांना गरजेचे आहे. म्हणून मुख्याध्यापकाने मोघम किंवा तोंडी स्वरूपात वारंवार तक्रार केली वर्तन उद्दिष्ट हे नमूद करताना काही प्रसंगानुसार नमूद करणे व्यवहार्य असेल तर योग्य ज्ञापन ने समज दिली असेल किंवा वारंवार रजेवर जाण्याची सवय लक्षात घेऊन रजा नामंजूर केली असेल तर  तुम्ही त्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी त्याबाबत थोडक्यात गोपनीय अहवालात नोंद वस्तुनिष्ठपणे व निप:क्षपातीपणे असावी. जर ही माहिती गोपनीय अहवाला देण्यात आली नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यावर दोषारोपण करता येत नाही. याची मुख्याध्यापकाला जाणीव असावी.

6) गोपनीय अहवाल लिहिताना कोणत्याही सबल पुरावा नसेल तर केवळ ऐकीव माहितीच्या आधारे वैयक्तिक चारित्र्य विषयी अभिप्राय नोंदवणे असमर्थनीय बाबा असून ती बाब पूर्णतः गैर आहे. म्हणून योग्य पुरावा जवळ असणे गरजेचे आहेत. खरोखर त्याने गैरप्रकार केला असेल तर आपल्याकडे सबल पाठपुरावा असेल तर गोपनीय अहवालात नोंद करून संबंधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणून देणे अतिशय गरजेचे काम आहेत. गोपनीय अहवाल लिहिताना चांगल्या कामाबाबत महत्त्वाचे काही प्रसंग किंवा विशेष माहिती विभागप्रमुख कडे प्राप्त झाल्याबरोबर त्याच्या गोपनीय अहवालामध्ये त्वरित नोंद करण्यात यावी. एखाद्या कर्मचार्‍याने असाधारण काम केले असेल तर नोंदवणे हेही गरजेचे आहे तसेच सहकारी किंवा जनता यांच्या प्रति संबंधित कर्मचाऱ्यांची वागणूक कामाची ओळख आणि या बाबी विषयी विशेष महत्त्व असल्यामुळे त्याचीही नोंद होणे गरजेचे आहे. एखादा कर्मचारी जर शाळेतून कार्यमुक्त होऊन ठराविक दिवसा करता शासनाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यास हजर झाल्यास त्या प्रशिक्षण ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण काळातील त्याची एकूण गुणवत्ता समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत असल्यास त्याची नोंद गोपनीय अहवालात करणे गरजेचे आहे. म्हणजे चांगले आणि वाईट याबाबत पारदर्शक पद्धतीने गोपनीय अहवाल येणे अत्यंत आवश्यक आहे.

7) शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शालेय स्तरावर विद्यालय मध्ये अतिशय उत्तम, उत्कृष्ट, असाधारण व चांगल्या कर्तव्याविषयी स्पष्टपणे अभिप्राय गोपनीय अहवालात नमूद करून संबंधित बाबी संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित कळवण्यात याव्या. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा झाली असेल तर झालेल्या शिक्षेबाबत नोंद अभिलेखात घेतली असेल तर तो कर्मचारी जेव्हा संबंधित शिक्षेच्या नोंदीतून निर्दोष मुक्त झाला असेल अशी बाब कार्यालय प्रमुखास म्हणजे मुख्याध्यापकास ही गोष्ट माहित झाल्यास नोंद घेणे गरजेचे आहे. व संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत स्पष्ट लेखी स्वरुपात अहवाल कळवणे ही गरजेचे आहे.

8) एखाद्या शाळेतील कर्मचारी आपल्या आस्थापनेवर कार्यरत असताना त्याची प्रतिनियुक्ती ही प्रभारी म्हणून दुसऱ्या आस्थापना वर झाली असता त्याला कार्यमुक्त केल्यानंतर प्रतिनियुक्ती च्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर जोपर्यंत संबंधित कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे तोपर्यंत त्याचे गोपनीय अहवाल ज्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्य करत असेल त्या ठिकाणा वरून लिहिणे आवश्यक आहे. शिवाय प्रतिनियुक्तीवरून त्याला त्याच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले असेल तर त्याचे गोपनीय अहवाल संबंधित मूळ विभागाकडे सादर करणे प्रतिनिधी असता पाण्याचे कार्य आहेत.

9) शासकीय नियमानुसार अशी तरतूद केली आहे की, गोपनीय अहवाल हे मुख्याध्यापकाने मराठी भाषेत सुस्पष्ट लिहिलेले असावेत आणि स्वतःच्या हस्तक्षेमध्येच लिहिलेले असावे. त्या गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन किंवा प्रतिवेदन अधिकाऱ्याने आपल्या योग्य कार्यवाहीस्तव पुनर्विलोकन केल्यानंतर त्या गोपनीय अहवालावर पुनर्विलोकन अधिकाऱ्याने सही करताना सही च्या खाली आपले नाव तसेच पद किंवा पदनाम दिनांक सह सुस्पष्ट अक्षरात लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. दिलेला समाधानकारक शेरा चांगला समजण्यात येईल. तसेच साधारण किंवा सर्वसाधारण बरा ठी तसेच वाईट शेरे प्रतिकूल समजण्यात येतील हे संबंधितांना गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्याने कळवणे गरजेचे आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा शेरा किंवा अभिप्राय हा प्रतिकूल दिला असेल तर 30 जून पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांचा प्रतिकूल अहवाल लिहिला आहेत त्या संबंधित कर्मचाऱ्यास कळवण्यात आला पाहिजे. नियम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे तर माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी कळवणे गरजेचे आहेत.

10) गोपनीय अहवाल गट ब मधील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल दोन प्रतीत ठेवण्यात यावे असा नियम शासन स्तरावर नमूद करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा होतो की कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल द्विप्रतीत लेखन काम होणे गरजेचे आहे.गोपनीय अहवाल लिहिणे अत्यंत आवश्यक असल्या मुळे मुख्याध्यापकाने आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल नियमित दरवर्षी लिहिणे कारण या गोपनीय अहवालाचा उपयोग कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती तसेच कर्मचाऱ्यांची बडतर्फी किंवा एखादा कर्मचारी अचानक मृत्यू झाल्यास किंवा अन्य कारणाने त्याची सेवा समाप्ती पासून सर्वसाधारणपणे मुख्याध्यापक कार्यालयामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे कमीत कमी पाच वर्षाचे गोपनीय अहवाल जतन करून ठेवणे आवश्यक आहे. सेवेत सेवेतील शेवटचे पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिशय काळजीपूर्वक जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रतिकूल अभिप्रायाविरुद्ध दोन महिन्याच्या आत अभिवेदन करता येईल असे स्पष्टपणे नियमात नमूद करण्यात आले असून समाधानकारक कारणास्तव सहा महिन्यापर्यंत विलंब क्षमा मापित करण्याचा अधिकार संबंधित नेमणुका व शर्ती अपील करणाऱ्या अधिकाऱ्यासह असेल अशा प्रकारे स्पष्टपणे नमूद केले आहेत.

गोपनीय अहवाल प्रपत्र व विभाग.

महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 नुसार (दिनांक 30 सप्टेंबर 1987 पर्यंत सुधारित) अनुसूचित गट ब नियम 14 (2) आणि नियम 15 (1) यानुसार शिक्षकांना किंवा शिक्षक वर्गाकरिता गोपनीय अहवालाचा नमुना भाग एक व भाग दोन याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाग एक या विभागात कर्मचाऱ्यांनी स्वयं मूल्यमापनाचा नमुना यात शेवटी गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्याने अभिप्राय लिहिण्याचा नियम आहे तसेच भाग क्रमांक दोन मध्ये शाळेचा मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्या गोपनीय नमुना अहवाल या त अभिप्राय लिहीत असताना किंवा गोपनीय अहवाल लिहीत असताना वर्गातील काम किंवा वर्गातील जादा कार्य किंवा सर्वसाधारणपणे अभिप्राय याची नोंद गोपनीय अहवाल  लिखाण करणाऱ्या अधिकाऱ्याने करण्याची गरज आहे. म्हणून असे स्पष्टपणे नमूद केले आहेत. गोपनीय अहवालाच्या भाग क्रमांक तीन मध्ये महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली1981 मधील नियम क्रमांक 14 व नियम क्रमांक 15 यामध्ये गोपनीय अहवाल लिहिण्याची स्पष्टपणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहेत म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी माध्यमिक शाळा संहिता मधील महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावलीचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे काम आहेत. या नियमांमध्ये स्पष्टपणे असे नमूद केले आहे की शेडयूल "जी"मध्ये त्यासंबंधी एक प्रपत्र देण्यात आले आहेत. गोपनीय अहवाल लेखन करताना या नियमावलीला अधीन राहून गोपनीय अहवालाचे लिखाण काम मुख्याध्यापकाने नियोजनानुसार ठरवून दिलेल्या वेळात पूर्ण करणे आवश्यक आहे.

सारांश

मुख्याध्यापकाने शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून परीक्षण करून घेणे आवश्यक आहे आणि मुख्याध्यापकाचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा संस्थाप्रमु्खाने करून व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाकडून पुनर्विलोकन करून घेणे तसेच शिक्षक अथवा मुख्याध्यापक चिटणीस असेल तर अध्यक्षांनी गोपनीय अहवाल लिहिणे व व्यवस्थापन समितीने पुनर्विलोकन करणे हे स्पष्टपणे नमूद केले आहेत. आजच्या या लेखांमध्ये आपण गोपनीय अहवाल कोणी लिहिण्याची गरज आहे तसेच कसे लिहावेत आणि कोणत्या कारणासाठी गोपनीय अहवाल लिहिणे आवश्यक असून या गोपनी अहवालाचे पुनर्विलोकन कोणी करावे तसेच गोपनीय अहवालाबाबत सविस्तर माहिती व सादर करण्याची पद्धती आणि मूल्यांकन तसेच मुख्याध्यापकाची जबाबदारी याबाबत गोपनीय अहवालाबाबत उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती नमूद केली आहे. गोपनीय अहवालाबाबत अधिकारी व कर्मचारी निष्काळजीपणा करून दुर्लक्ष करतात .त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि बढती वर तसेच निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी आणि वेतन वाढ या सर्व प्रस्तावा साठी गोपनीयअहवालाचे महत्व स्पष्ट करण्यात आले आहे.

  गोपनीय अहवालाबाबत सविस्तर मराठी माहिती    pdf 

FAQ

1) गोपनीय अहवालाबाबत माहिती कोणत्या नियमात देण्यात आली आहे?

माध्यमिक शाळा संहिता सेवा शर्ती नियम 1981 मध्ये.

2) शिक्षकांचे गोपनीय अहवाल कोण लिहितो?

मुख्याध्यापक.

3) मुख्याध्यापकाने लिहिलेल्या शिक्षकाच्या गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन कोण करतो?

शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष किंवा शिक्षणाधिकारी.

4) गोपनीय अहवाल बाबतची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना किती दिवसात कळवणे आवश्यक आहे?

तीन महिने.

5) सहसा गोपनीय अहवाल कोणत्या भाषेतून लिहिणे आवश्यक आहे?

मराठी भाषेत.

अधिक माहितीसाठी आमचे इतर खालील लेख आवश्यक वाचा.

ऑक्टोबर पासून आधार कार्ड बाबत नवीन नियम 

पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती 2023

 महाराष्ट्रातील आरक्षण सविस्तर माहिती

रक्षाबंधन माहिती मराठी

गंगापूर धरणाची मराठी माहिती