प्रस्तावना.
मित्रांनो, आज आपण दसरा या सणानिमित्त सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहे.दसरा हा सण भारतीय संस्कृतीत विजयाचे प्रतीक मानला जातो. दसरा हा सण साडेतीन मुहूर्ता मधील एक शुभ मुहूर्त म्हणून मराठी कॅलेंडर प्रमाणे अश्विन महिन्यामध्ये देवीच्या नवरात्र उत्सवाप्रमाणे दहाव्या दिवशी हा सण भारतातील सर्व घटक राज्यात तसेच नेपाळ या देशांमध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो. दसरा या सणाला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते. दसरा या सणा बाबत संपूर्ण माहिती आपण या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहे.
दसरा या सणाबद्दल सविस्तर मराठी माहिती |
दसरा शुभ मुहूर्त.
दसरा हा सण यावर्षी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 24 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मराठी कॅलेंडर प्रमाणे दसरा हा सण आश्विन शके१९४५ या महिन्यात शु. पक्षात १० घनिष्ठा या शुभ दिवशी देवीच्या नवरात्र उपवासानंतर पारणे समाप्तीनंतर दहाव्या दिवशी हेमंत ऋतुच्या प्रारंभ अश्वपूजा झाल्यानंतर दसरा म्हणजे विजय दशमी या शुभ मुहूर्ताला दुपारी दोन वाजून 18 पासून ते तीन वाजून चार मिनिटापर्यंत दसऱ्याचा शुभ मुहूर्त शुभ मानला आहेत. याच दिवशी सूर्याच्या स्वाती नक्षत्र प्रवेश होत असून घोडा हे वाहन आहे. म्हणजेच स्वाती नक्षत्र प्रवेश घोड्यावर बसून नक्षत्र प्रवेश करत आहे . यावर्षी 24 ऑक्टोबरला साईबाबा पुण्यतिथी उत्सव शिर्डी येथे साजरा होत आहे. तसेच माध्वाचार्य जयंती याच दिवशी आलेली आहेत. याच वेळी मुसळी या गावात खंडोबाची यात्रा सुद्धा भरली जाते. दसरा या दिवशी सूर्योदय सहा वाजून तीस मिनिटांनी होत असून सूर्यास्त अठरा वाजून चार मिनिटांनी होणार आहेत त्यावेळेस चंद्र हा कुंभ राशीत असेल. उपरोक्त दर्शविलेल्या वेळामध्ये दसरा किंवा विजयादशमी सण भारतीय संस्कृतीने हिंदू धर्मात तसेच सर्व साजरा करण्यात येतो. अश्विन महिन्यातील या सणाला विशेष महत्त्व आहे. लोक धार्मिक मान्यतेनुसार विजय दशमी किंवा दसरा या दिवशी रावणाचे दहन सुद्धा करतात 24 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून 14 मिनिटांनी या अगोदरच तिथीनुसार साजरा करण्यात येणार आहे. म्हणून दुपारी दसऱ्यांची वेळ एक वाजून तेरा मिनिट ते तीन वाजून 28 मिनिटापर्यंत शुभकाळात शस्त्र पूजा केली पाहिजे. 24 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पाच वाजून 43 मिनिटांनी म्हणजे बरोबर अडीच तासाने रावणाचे दहन केले गेले पाहिजे. काही लोक श्रीराम प्रभू यांची विधिवत पूजाही सुद्धा करतात. श्रीराम प्रभू यांना जवाज्ञबिया चे गोळे करून नैवेद्य अर्पण करतात व प्रसाद वाटतात. कारण रावण हा महाभयंकर अहंकारी लोभी आणि रागाचे प्रतीक असल्यामुळे त्याच्या वाईट कृत्यामुळे त्याचा नाश करण्यासाठीच प्रभुरामचंद्रांनी आपला अवतार घेतला होता. दसऱ्याच्या अगोदर अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तर नऊ दिवस देवीची नवरात्र नऊ रुपये धारण करून वेगवेगळे अवतार घेऊन दृष्टवृत्तीचा नाश करतात म्हणूनच देवीने सुद्धा महिषासुर सारख्या राक्षसाचे मर्दन करून लोकांना जीवन जगण्यास चांगली परिस्थिती निर्माण केली. दुर्जन वृत्तीचा सहार करून चांगल्या वृत्ती आत्मसात करणे म्हणजेच दसरा होय म्हणजे अश्विन एक पासून तर अश्विन दहापर्यंत हा संपूर्ण काळ भारताच्या इतिहासातील संस्कृतीतील परंपरेची जोपासना करणारा आनंदमय वातावरण निर्माण करणारा व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा हा सण नवरात्र उत्सव व दसरा या निमित्ताने शहरापासून तर खेड्यापर्यंत साजरा केला जातो. व दसऱ्याच्या दिवशी नऊ दिवस बसवलेली देवीचेचे विसर्जन केले जाते. रावणाच्या वाईट कृत्याचा संहार केला जातो.
दसरा या सणाबद्दल सविस्तर मराठी माहिती |
दसरा सण सविस्तर माहिती
"दसरा सण आहे मोठा नाही आनंदाला तोटा"अशी मराठीत एक म्हण आहे. या म्हणी प्रमाणे मोठ्या आनंदाने दसरा सण साजरा करण्यात येतो. दसरा सण साजरा करण्याच्या पाठीमागे बरेच विजयाचे प्रतीक असणारे कारणे दडून बसले आहेत. विजय दशमी किंवा दसरा नेपाळ या देशात नवरात्र उत्सवाच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन शु. दहा १० या रोजी साजरा होणारा हिंदूचा प्रमुख सण आहे. विजयादशमी किंवा दसरा वेगवेगळ्या कारणांसाठी भारतीय उपखंडात साजरा करण्यात येतो. दसरा हा सण विजय दशमी म्हणून भारतातील दक्षिणेकडील, पूर्वेकडील, आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये दुर्गा देवीची पूजा समाप्ती करून विजय दशमी म्हणून साजरा केला जातो. याचे मुख्य कारण असे आहे की. या दिवशी दुर्गादेवीने महिषासुर या राक्षसाला नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी म्हशीच्या राक्षसावर म्हणजेच महिषासुरावर युद्धात विजय मिळवून महिषासुर या राक्षसाचा वध केला आणि हिंदू धर्माचे रक्षण केले म्हणून विजय अधिक दशमी म्हणजे दहा म्हणजेच विजयादशमी हा सण भारतातील सर्व घटक राज्यात मोठ्या आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून साजरी करण्याची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत सातत्याने सुरू आहेत. विजयादशमी या सणाला दसरा सण म्हणून भारतातील उत्तरेकडील, मध्य विभागातील आणि पश्चिम राज्यांमध्ये दसरा या नांवाने साजरा करण्यात येतो. दसरा या सणाला "दशहरा "अशी देखील म्हणतात. याच दिवशी प्रभू रामचंद्राने रावण या राक्षसाला युद्ध मैदानावर मारून मानव जातीचे व देवांचे रक्षण केले. असे म्हटले जाते की लंका मध्ये रावणाचे राज्य होते. संपूर्ण लंका सोन्याची होती. येथे रावण राज्य करत होता. त्याने महादेवाची उपासना करून वर संपादन करून घेतले होते. त्यानंतर तेहतीस कोटी देव बंदी शाळेत कैदी म्हणून ठेवले होते. याच रावणाचा वध करण्याचे काम श्रीरामचंद्र प्रभू ने रामावतारात केल्यामुळे रावणावर मिळवलेला हा विजय म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून दसरा हा दिवस रावणाचे दहन करून भारतात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी दुर्गा पुजा सरस्वती पूजा देवी पूजा नदी पूजा महासागर पूजा गणेश पूजा कार्तिक पूजा अशा अनेक प्रकारच्या पूजा लोक करतात. दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये नेऊन करतात. देवीचे विसर्जन सुद्धा केले जाते. दहा तोंड्या रावणाचा वध करणे व विजय मिळवणे म्हणजेच वाईटाचा नाश करून चांगले काही प्रस्थापित करणे हे महत्त्वाचे असल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी रावणाचे दहन करून फटाके फोडून विजय दशमी साजरी केली जाते. मी नंतर बरोबर वीस दिवसांनी आणखी एक हिंदूचा महत्त्वाचा सण शुभ मुहूर्त म्हणून दिवाळी असंख्य दिव्यांच्या ज्योती उजळून फटाके फोडून साजरी केली जाते.
भारतात दसरा सण साजरा करणारे राज्य
उत्तर भारत.
गुजरात.
छत्तीसगड.
महाराष्ट्र.
दक्षिण भारत.
आंध्र प्रदेश.
तसेच इतर काही राज्यांच्या प्रांतात सुद्धा साजरा होतो.
दसरा सणाच्या आख्यायिका किंवा पौराणिक महत्त्व
दसरा सण साजरा करण्याच्या परंपरेनुसार निरनिराळ्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथा बाबत काही महत्त्वाच्या कथा स्पष्ट करणे आवश्यक असल्यामुळे त्या कथेचे वर्णन करणे आवश्यक आहे.
गुरु आणि शिष्य यांची कथा
फार पुरातन काळापासून पूर्वीपासूनच गुरु आणि शिष्यांची परंपरा ज्ञानार्जन करण्यात महत्त्व प्राप्त करणारी आहेत. गुरु गुरु आश्रमात शिष्यांना शिक्षण देत असे. शिष्य गुरु आश्रमात राहून गुरुच्या आज्ञांचे पालन करून ज्ञान प्राप्त करत असे. असेच एका कथेत म्हटले जाते. गुरु आश्रमामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणजे विद्या अर्जित करण्यासाठी कौत्स नावांचा शिष्य विद्या अर्जित करण्यासाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी गुरुकडेच आश्रमात राहत होता. गुरुकडे राहणाऱ्या शिष्याचे संपूर्ण विद्या अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्याने आपल्या गुरु विचारले आपणास काय गुरुदक्षिणा हवी? हे मला सांगा. गुरु म्हणाले शिष्य मला कोणत्याही प्रकारची गुरु दक्षिणा नको. गुरुदक्षिणासाठी मी आपणास ज्ञानप्राप्ती दिली नाहीत. पण शिष्य म्हणाला की मला आपणास गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे. आपणास काय गुरुदक्षिणा हवी आहेस हे मला सांगा? असे शिष्य म्हणाला.
कौत्स हा शिष्य गुरुचे ऐकण्यास तयार नव्हता. मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. अरे शिष्या मी तुला 14 विद्याचे दान दिले म्हणून मी तुझ्याकडून काय दक्षिणा घ्यावी. तुला दक्षिणा देण्याची इच्छाच असेल तर. 14 विद्याचे दान मी तुला दिले. त्या बदल्यात मला त्या बदल्यात 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून हव्या आहे. हे आपल्या गुरुजीचे म्हणजे गुरुचे ऐकून शिष्य सोन्याच्या 14 कोटी मुद्रा प्राप्त करण्यासाठी निघाला. पण 14 कोटी सुवर्णमुद्रा जमवणे किंवा कमावणे हे अतिशय अवघड कार्य आहेत. हे कार्य सोपे नव्हते हे शिष्याच्या लक्षात आले. गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा प्राप्तीसाठी कौत्स हा शिष्य रघु राजाकडे गेला. रघु राजाला म्हटलं की, मला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा पाहिजे. राजेसाहेब आपण त्या द्याव्या त ही माझी आपणास नम्र विनंती आहे. त्यावेळी रघुराजाने त्या शिष्याकडे पाहिले आणि म्हणाला आपली संपूर्ण संपत्ती मी ब्राह्मणांना दान दिली आहेत काही वेळेपूर्वीच. यावेळी देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही. त्यामुळे कौत्स या शिष्यास देण्यास देण्यासाठी काहीच नव्हते. तरीदेखील राजाला शिष्यास विन्मुख जाऊ द्यायचे नव्हते. म्हणून रघु राजा यांनी शिष्यास तीन दिवस थांबण्याचे सांगितले आणि त्याला रघु राजाने स्वतःजवळ ठेवून घेतले. रघु राजा हा फार मोठा राजा होता. त्याने इंद्र देवाला माझी उर्वरित रक्कम परत देण्यास सांगितले जर आपण माझी उर्वरित रक्कम परत करण्यास तयार नसेल तर युद्धात तयार हो म्हणून रघु राजाने इंद्रदेवतेची युद्ध तयार झाले. त्यामुळे इंद्रदेवाने त्वरित रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेरा करवी आपट्याच्या आणि शमीच्या झाडांच्या सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. त्यानंतर रघुराजांनी दान मागणाऱ्या शिष्याचं हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा घेऊन जाण्यास सांगितले परंतु शिष्याने 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि त्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा ऋषींना घेण्याची विनंती केली. 14 कोटी घेतल्यानंतर इतर मुद्रा उरलेल्या मुद्रा कौत्स ने आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ढीग रचला. आणि सर्वसामान्य नागरिकांना पाहिजे तेवढ्या मुद्रा घेऊन जाण्यास विनंती केली. सामान्य लोकांनी त्या मुद्रा घेतलेला दिवस म्हणजे विजय दशमी होय. लोकांना अचानकपणे श्रीमंत होण्याची संधी त्या शिष्यामार्फत प्राप्त झाली तेव्हापासून सुवर्णमुद्रे आयोजित आत्याच्या पानांची देवाण-घेवाण सुरू झाली म्हणून दसऱ्याच्या दिवशी नागरिक एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून दान देतात. आत्याच्या झाडाला वनराज देखील असे म्हणतात व या झाडांचा मुख्य परिणाम असा आहे की कप व पित्त दोषावर हे पान गुणकारी समजले जाते. त्याचप्रमाणे शमीचया झाडांचे सुद्धा महत्त्व आहेत. मित्रांनो सेमी च्या झाडाला एवढे महत्त्व आहे की महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासात निघून जात असताना पांडवांनी आपल्या जवळचे सर्व शस्त्र आणि आसरे शमीच्या झाडाखाली लपवली होती. त्यामुळे विजय दशमीच्या दिवशी लोकशाही झाडाची सुद्धा देखील पूजा करतात. एकमेकांचे एकमेकांवर असणारे प्रेम व्यक्त करणारा शुभ दिवस आणि सुंदर सण म्हणजे दसरा आहे. या दिवशी आवर्जून लोक एकमेकाची भेट घेत असतात. आता तर सोशल मीडिया वरून एकमेकांना शुभेच्छा व सद्भावना व्यक्त केली जात आहे. संत तुकाराम महाराज असे म्हणतात की ,"साधुसंत येती घरी तोच दिवाळी दसरा"या सणाचे महत्त्व त्यांनी त्यांच्या या अभंगातून व्यक्त केले आहेत. म्हणूनदसऱ्याच्या दिवशी लोक आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण करतात आणि शस्त्र आणि अश्र यांची पूजाही सुद्धा करतात.
दसऱ्याच्या दिवशी भगवान निळकंठाचे दर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे सुद्धा मानले जाते म्हणून दसऱ्याला महत्त्व आहे. बरेच लोक निळकंठ पक्षांचे दर्शनासाठी हा पक्षी पाहण्यासाठी उत्सुक असतात. समाजात अशा प्रकारची एक रूढी निर्माण झाली आहे की निळकंठ हा पक्षी पाहिल्यास सर्व वाईट करणे दूर होतात असा लोकांचा विश्वास आहे. निळकंठ पक्षी हा देवाचा प्रतिनिधी म्हणून त्या पक्षाचे दर्शन घेतल्याने धनसंपत्ती वाढवून घरात समृद्धी येते आणि जे आपण काम हाती घेतले त्या कामात येतही प्राप्त होते अशा प्रकारचा ही सुद्धा समज लोकांच्या मनात आहे. श्रीराम प्रभूच्या धनुष्यबाणालाही सुद्धा महत्त्वाचे स्थान आहेत तसेच रोज सायंकाळी सदैव लक्ष्मीची पूजा करावी असाही सुद्धा मनात निश्चय करून दसऱ्याच्या दिवसापासून सुरुवात करतात. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर जे काही उद्देश केले ते उद्देश नेमके वाईट कृतीचा नाश करणे या संबंधानेच येत असल्यामुळे. महाभारतातही दसऱ्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते.
दसरा सणाचे वैशिष्ट्ये
वाईट कृत्यावर विजय मिळवणे
वाईटाचा नाश करणे
देवीची पूजा करणे
घरातील शस्त्रे यांची पूजा करणे
दसऱ्याच्या दिवशी वस्तूची नवीन खरेदी करणे्
दुर्गा माता ची पूजा करणे.
शिलंगण करणे म्हणजे आपट्याची पाने लुटणे सोने म्हणून
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त
दसरा विजयाचे प्रतीक असणारा सण
वृद्धी आणि रवी योग साजरा करणे.
वाईट कृती नष्ट करणे
शारदीय नवरात्र उत्सव साजरा करणे
रात्री उशिरा एकमेकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेणे
समानतेचा संदेश देणे
वैरभाव दूर करणे
देवीची हत्ती घोडे किंवा उंट यावर मिरवणूक काढणे
रावणाबाबत माहिती
पौराणिक कथेमध्ये असे म्हटले जाते की, रावणाला दहा डोकी व दहा तोंड होते. प्रश्न असा निर्माण होतो की खरंच नेमकी दहा डोके होती का? प्रत्यक्ष त्याला दहा डोकी नसून त्याला दहा डोके इतकी शक्ती प्राप्त झालेली होती. शंकर महादेवाला प्रसन्न करून त्यांनी फार विद्या संपादन केली होती.. रावणाची दहा डोके म्हणजे त्यांचे ते दहा गुणांचे वर्णन करणारे गुण दर्शक तत्वे म्हणजे दहा डोके होय. अर्थ स्पष्ट होतो की रावण हा एक शक्तिमान विद्या धारण करणारा असून त्यांच्यामध्ये जे दहा वाईट गुण होते. ते दहा वाईट गुण म्हणजे त्याची दहातोंडे होय.
दहा वाईट गुण
त्याचे दहा वाईट गुण हे त्याच्या दहा गुणाचे प्रतिनिधित्व करणारे गुणसंपन्न असे वैशिष्ट्ये होय.
1)काम म्हणजे वासना.
2)क्रोध म्हणजे राग.
3)मोह .
4)भ्रम.
5)लोभ.
6)मादा म्हणजे अभिमान.
7)हेवा.
8)बुद्धी.
9)वाईट इच्छा.
10)अहंकार आणि गर्व.
उपरोक्त दर्शविलेले दहा वाईट गुण दर्शक लक्षणे म्हणजे दहा तोंड्या रावण होय. म्हणून लोक त्यांना दहातोंड्या किंवा दहा डोके असणारा रावण असे म्हणत होते. फार शक्तिमान असणारा हा श्रीलंकेचा राजा होय पुरातन काळातील राजा होय.म्हणून प्रभू रामचंद्राने आपल्या अवतारात दसऱ्याच्या दिवशी या दहातोंड्या रावणाचा वध केला. म्हणून आपण दसरा हा सण साजरा ही करतो.दसरा सण कसा साजरा करावा?
सारांश
भारतीय उपखंडातील साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त म्हणून संपूर्ण भारतात सर्व घटक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या रूढी प्रथेनुसार आणि परंपरेनुसार दुर्गा देवी रावण बळी रामलीला याबाबत आपणास माहिती हवी म्हणून विजय दशमी म्हणजे दहा दिवसाचा हा समूह म्हणजे दहा दिवस प्रत्येक दिवशी पूजाअर्चा करून साजरा करण्यात येणारा महत्त्वपूर्ण उत्सव हिंदू धर्मात परंपरेनुसार साजरा करण्यात येतो. या साजरा करण्यामध्ये इतिहासातील आणि पौराणिक कथेतील अनुभव व्यक्त करून वाईट कृती नष्ट करण्यासाठी व समाजामध्ये एकमेकातील वैरभाव संपुष्टात आणण्यासाठी
दसरा सण साजरा करून देशात बंधुभाव निर्माण करणे ही आज काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने दसऱ्याच्या दिवशी एक निश्चित संकल्प करून चांगले कृत्य करावेत अशी आशा बाळगून हा सण साजरा करण्यात आला पाहिजे आणि बहुतांश त्याच पद्धतीने साजरा होतो आहे. ग्रामीण भागात ग्रामीण पद्धतीने साजरा केला जातो . तर शहरी भागामध्ये शहराप्रमाणे साजरा होतो कारण येथे घाई गर्दी आणि वर्दळीचे वातावरण असते. दसरा सणा नंतर बरोबर वीस दिवसांनी अमावस्येच्या दिवशी एक नवीन सणाला किंवा सण परवाला सुरुवात होते ती म्हणजे दिवाळी. दिवाळी या सणाबाबत आपण यानंतर एक स्पष्ट लेख लिहिणार आहोत. आज आपण संपूर्ण लेखातून दसरा किंवा विजयादशमी बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नाने लेख लिखाण काम पूर्ण केले आहे. शेवटी जाता जाता आपणास एक संदेश देऊन हा लेख आपण समाप्त करत आहोत. "एकमेकास साह्य करू अवघे धरू सुपंथ"
या मराठी म्हणी प्रमाणे दसरा या सणानिमित्त श्रीमंत आणि गरिबाला मदत केली पाहिजे तसेच गरिबाने सुद्धा आपल्या परीने एकमेकास साह्य केले पाहिजे यातून एक चांगला मार्ग निर्माण होऊन भारतामध्ये शंभर टक्के राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. राष्ट्रीय एकता निर्माण करण्यासाठी व लोकांना एकात्मतेची जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने दसरा सर्वांना निमित्त सुस्पष्ट शब्दात लिहिलेला हा लेख आता या लेखात पूर्णविराम देतो.
FAQ
1) विजयादशमी मराठी कॅलेंडर प्रमाणे कोणत्या महिन्यात साजरी केली जाते?
विजय दशमी अश्विन महिन्यात साजरी केली जाते.
2) यावर्षी दसरा कोणत्या दिवशी साजरा होणार आहे?
24 ऑक्टोबर 2023 रोजी.
3) दसरा सणाचे एक वैशिष्ट्ये सांगा?
अहंकारी वृत्ती नाश करणे.
4) दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन का केले जाते?
प्रभू रामचंद्राने रावणास दसऱ्याच्या दिवशी युद्धात मारले
5) सर्वसामान्यपणे दसऱ्याच्या दिवशी कोणत्या दोन वृक्षांना महत्त्व आहे?
आत्ता व त्यांची पाने
शेमी वृक्ष
6)दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून एकमेकास कोणत्या गोष्टीची देवाण-घेवाण करतात?
आपट्यांची पाने सोन्याची पाने म्हणून एकमेकास देवाण-घेवाण करून समतेचा संदेश देतात.
???? आमचे इतरही खालील लेख अवश्य वाचा.