मित्रांनो !आपण आज कर्मचारी रजा नियम शिक्षण क्षेत्रातील नियमावलीचा अभ्यास योग्य प्रकारे कर्मचाऱ्यांना माहीत असणे आवश्यक असल्यामुळे हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.
महाराष्ट्र कर्मचारीखाजगी शाळांतील रजा नियम |
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981
कोणत्याही व्यवस्थापनाची शाळा किंवा संस्था किंवा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तसेच खाजगी संस्थेतील अनुदानित, अंशतः विनाअनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना रजा नियम स्पष्ट करणे हा आपला उद्देश आहे. प्राथमिक शाळा, शाळा कनिष्ठ महाविद्यालय ,माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालय, आणि इतर शासनमान्य शाळा यांच्यातील मुख्याध्यापक ,प्राचार्य ,उपमुख्याध्यापक ,परिवेक्षक शिक्षक आणि आणि प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर जे आज अस्तित्वात आहे ते पद झाले नाहीत तेथील प्रयोग शाळा परिचर हे नियमावलीनुसार महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा नियमावली नियम 13 नुसार आपण सर्व सुट्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच जे मोठ्या सुट्टीचे हक्कदार समजले जातात. यासोबतच मुख्य लिपी वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल नाईक शिपाई या सर्वांच्या बाबत महाराष्ट्र राज्य नागरी सेवा खाजगी शाळातील कर्मचारी रजा व शर्ती नियम 1981 मध्ये नमूद केलेल्या रजेच्या संदर्भात स्पष्ट माहिती या लेखातून देण्यात आली आहेत. याबाबत माहिती खालील मुद्द्यांच्या साह्याने स्पष्ट करण्यात येत आहे.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती व नियमावली 1981
1)रजा नियम काही मुद्दे:-
मोठ्या रजेची हक्कदार हे मुख्याध्यापक प्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर हे सर्व नियमानुसार मोठ्या सुट्टीचे हक्कदार समजले जातात त्यासाठी नियमावलीतील भाग 13 स्पष्ट केला आहे.
तसेच अधीक्षक मुख्य लिपिक वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल नाईक शिपाई हे आता मोठ्या सुट्टीचे हक्कदार समजले जात नाही. दिनांक सहा जानेवारी 1976 आणि 13 डिसेंबर 1984 या शासन निर्णयाद्वारे अर्धवेळ शिक्षक अर्धवेळ ग्रंथपाल अर्धवेळ कर्मचारी यांना नैमित्तिक रजेसह रजेबाबत चे सर्व नियम लागू आहेत. शासन निर्णय दिनांक 1 सप्टेंबर 1977 एकाच संस्थेतील अशासकीय माध्यमिक शाळेतील किंवा शाळेतील बदलीमुळे शिपाई संवर्गातून लिपिक संवर्गात किंवा लिपिक संवर्गातून शिक्षक संवर्गात आले असल्यास आणि त्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नसल्यास आधीच्या संवर्गातील आपल्या शिल्लक असलेल्या रजा नियमानुसार घेता येतात. तसेच शासनाच्या दिनांक 21 जानेवारी 1987 खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदली त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळा करण्यात आली असल्यास त्या शिक्षकाला प्राथमिक शाळेत देय असलेली रजा पुढे माध्यमिक शाळा घेता येते हेही माहित असणे आवश्यक आहे. प्रार्थमिक शाळा माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय येथील अतिरिक्त असलेल्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्याला दुसऱ्या संस्थेत सामावून घेतल्यास त्या शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला याबाबतीत आधीच्या शाळेतील ध्येय शिल्लक रजा दुसऱ्या शाळेत मान्य राहील हेही नियमावलीत नमूद केले आहे. शालेय कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक शासन निर्णय रजेच्या संदर्भामध्ये निर्गमित झाल्यामुळे सर्वच शासन निर्णय येथे देणे शक्य नसल्यामुळे फक्त शासन दिनांक नमूद करण्यात येत आहे संपूर्ण नियम आपण महाराष्ट्र शासनाच्या शाळा व शिक्षण विभागात तसेच क्रीडा विभागात दिनांकानुसार शासन निर्णय पाहणे आपणास आवश्यक आहे. शासन निर्णय दिनांक 6 जून 1980 आणावे एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टीच्या कामावर बनवले तर त्याला पर्यायी सुट्टी मिळवण्याचा हक्क राहील यासाठी खाजगी शाळा नियमावली परिशिष्ट 12 मध्ये स्पष्ट नमूद केले आहे. शासन निर्णय दिनांक 20 सप्टेंबर 1977 ,23 सप्टेंबर 1983, 07नोव्हेंबर1984 आणि 23 जुलै 1986 या नियमानुसार नियमावली अन्वये माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विद्यापीठाची विधी सभा संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या सभा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यासाठी आले असेल तर संबंधित शिक्षक व कर्मचारी संस्थेत गैरहजर राहिल्यास त्यांना गैरहजरचा कालावधी कर्तव्यार्थ समजण्यात यावा. शासन निर्णय 19 जानेवारी 1988 अन्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तसेच सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांच्या उद्भवूदनाच्या प्रशिक्षणासाठी या कार्यक्रमाला मोठ्या सुट्टीत जे शिक्षक उपस्थित राहतील त्यांना खाजगी शाळा नियमावली 1981 अन्वय रजा नियम 16 (18अ) या नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्याला रजा मंजूर करता येईल यासाठी या रजेच्या संदर्भात आणखी दोन शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत दिनांक 20 मे 2006 आणि दिनांक 31 मे 2006 या दिवशी शासन निर्णय प्रशिक्षण कालावधीसाठी निर्गमित करण्यात आले आहे.
2) रजा नियम भाग दोन:-
खाजगी शाळा महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली 1981 यातील रजा नियम 16 आणि त्यातील उपनियम 18 हे वगळण्यात आले असून बाकी सर्व तरतुदी खाजगी प्रार्थमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी यांना लागू आहेत. माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय येथील प्रधान अध्यापक म्हणजेच मुख्याध्यापक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांना प्रत्येकी एका वर्षासाठी म्हणजे एका वर्षात पंधरा दिवस अर्जित रजा मान्य करण्यात आल्या असून एका वर्षात दोन सत्रात 15दरवर्षी सेवा पुस्तिकेत नमूद करणे आवश्यक आहे. आता प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकालाही अर्जित रजा मान्य करण्यात आल्या आहेत शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रधान अध्यापक यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत कामकाज करावे लागत असल्यामुळे त्यांना अर्जित रजेचे रोखीकरण करता येते कर्मचाऱ्याच्या रजा घेतलेल्या वजा करून बाकीच्या शिल्लक रजेचे रजा रोखीकरण होते मुख्याध्यापकाचे संपूर्ण सेवा काळा त तीनशे दिवस रजा रोखीकरणास मान्यता प्रदान करण्यात येते 300 च्या वर सुट्या ह्या शिल्लक असला तरीही अमान्य करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विनाअनुदानित शाळातील शिक्षक व कर्मचारी यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवाशर्तीच्या अधिनियम 1977 अन्वये कलम 3(1) यांनाही हा रजा मान्य करण्यात आल्या आहेत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना दरवर्षाला दहा दिवस अर्जित रजा दोन सत्रात घेता येते व त्या सुट्ट्यांचा संपूर्ण हिशोब सेवा पुस्तिकेत नोंदवण्यात आला पाहिजे परंतु ह्या संपूर्ण रजा शिक्षक व कर्मचारी यांना रजा रोखीकरण करता येणार नाही फक्त सेवा पुस्तके रजेची नोंद ठेवली जाते. शासन निर्णय दिनांक 6 डिसेंबर 1996 अन्वये शासकीय तसेच जिल्हा परिषद शाळातील दीर्घ सुट्टी विभागातील व्यक्तींना दिनांक एक जानेवारी 97 पासून अर्ध पगारी रजे ऐवजी मंजूर झाली आहे.
3) रजा नियम भाग 3:-
खाजगी शाळा नियमावली महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 अन्वये शालेय शैक्षणिक क्षेत्रातील राजपत्राच्या अधिसूचनेद्वारे जाहीर केलेले सण व इतर सुट्ट्या वगळून प्रतिवर्षी रजा नियम 1981 नुसार विभागातील खाते प्रमुख याकडे अर्ज देऊन रजा मंजूर करून घेऊ शकतो रजा मिळाल्यावर त्याने ज्या कारणासाठी रजा घेतली आहेत त्याच कारणासाठी उपभोगलेली असावी हाही महत्त्वाचा एक मुद्दा आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टी नागरी सेवा खाजगी नियमावली 19 81 नुसार प्रकरण दोन नियम 9(23) अन्यवे सुट्ट्या निर्धारित केलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना राजपत्रात दर्शविल्याप्रमाणे सार्वजनिक सुट्ट्या घेता येईल आणि त्या देण्यात येतात.
4) भाग चार रजा नियम:-
महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांसाठी कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1981 आणि संबंधित अद्यावत सुधारणेसह रजा नियम देण्यात आलेले आहेत.हक्क म्हणून रजा मागता येणार नाही.किरकोळ किंवा नैमित्तिक रजे व्यतिरिक्त रजा मंजूर करणे किंवा ती रजा नाकारणे किंवा रद्द करणे याबाबत संपूर्ण विवेकाधिकार आहे
अ) मुख्याध्यापक वगळून अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांच्या बाबतीत रजा मंजूर करण्याचा अधिकार शाळा समिती आहे. शाळा समितीचा मुख्याध्यापक हा सचिव असल्यामुळे मुख्याध्यापकाला किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार आहे.
आ) शाळेच्या मुख्याध्यापकांच्या रजा खाजगी संस्थेत व्यवस्थापक मंडळास मंजूर करण्याचा अधिकार संस्था कार्यकारी मंडळांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे.
5) भाग क्रमांक पाच रजा नियम रजेसाठी अर्ज:-
किरकोळ रजेच्या किंवा नैतिक रजे व्यतिरिक्त इतर रजेसाठी कर्मचाऱ्यांना रजा वाढवण्यासाठी किंवा मोठ्या सुट्टीनंतर रजेवर जाण्यासाठी करावयाचा अर्ज सामान्य रजा अर्ज किंवा रजा वाढ ज्या तारखेपासून असली पाहिजे त्या तारखेपूर्वी अगोदरच पुरेसा वेळ उपलब्ध करून अर्ज आधीच करावा कर्मचाऱ्यांच्या आटोक्याबाहेरील परिस्थितीमुळे आगाऊ रजा अर्ज करणे शक्य होत नसेल अशा अपवादात्मक परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनुपस्थितीच्या तारखेपासून सात दिवसाच्या आत अर्ज द्यावा लागतो किंवा द्यावा लागेल. हेच स्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उपरोक्त नियम भाग क्रमांक पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज देण्याची पद्धत स्पष्ट केली आहे . अस्थायी कर्मचाऱ्यांनी त्याच्या अनुपस्थितीच्या तारखेपासून सात दिवसाच्या आत अर्ज न केल्यास त्याने सेवा सोडली असल्याचे मानण्यात येईल हे चांगले लक्षात राहू द्या.
6) भाग क्रमांक सहा अर्ध्या दिवसाच्या रजा बाबत माहिती:-
खाजगी शाळा नियमावलीनुसार ज्या कर्मचाऱ्याला अनुपस्थिती च्या तारखेपासून सात दिवसाच्या आत अर्ज न करण्यामागचे पुरेसे कारण नसेल स्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या संबंधाने ही गोष्ट म्हणजे सात दिवसाच्या आत अर्ज न देणे शिस्तभंग म्हणून समजण्यात येईल आणि त्याबाबत योग्य चौकशी केल्यानंतर योग्य प्रकारे शासन निर्णयानुसार शिस्तबंगाच्या कारवाईस तो कर्मचारी पात्र ठरतो हेही चांगले लक्षात असू द्या. एखादा कर्मचारी रजेवर गेला आणि तो कर्मचारी तीन वर्षापेक्षा अधिक काळ रजा न मागता रजेचा अर्ज न देता अनुपस्थित राहिल्यास अशाच ताई कर्मचाऱ्यांनी स्वतःची सेवा सोयीचे ने सोडली असे नियमानुसार मानण्यात येईल व संबंधित पद रिक्त होईल आणि रिक्त झालेल्या पदावर बिंदू नामावली आणि इतर नियमाचा वापर करून शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने जाहिरात काढून ते पद भरता येते. मुख्याध्यापकाशिवाय शिक्षक व शिक्षक उत्तरकर्मचारीवर्गासमुख्याध्यापकाकडून रजा मंजूर करून घ्यावी व मुख्याध्यापकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून किंवा कार्यकारी मंडळाकडून रजा मंजूर करून घेणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक हा स्वतःच मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर व्यवस्थापक मंडळ कडून किरकोळ रजा मंजूर करता येईल. खाजगी शाळा नियमावली पाच व सहा ला दुरुस्ती करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 1982 या नुसार आता किरकोळ रजेच्या मागे आणि किरकोळ रजेच्या पुढे कितीही रविवार आणि किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून तसेच किरकोळ रजेच्या येणाऱ्या एक किंवा अधिक सुट्ट्या किरकोळ रजे ला जोडून घेता येईल . थोडक्यात याचा अर्थ जेवढ्या किरकोळ रजा कर्मचाऱ्यांनी उपभोगल्या तेवढ्याच रजा नवीन नियमानुसार मोजता येतील.
7) भाग क्रमांक सात: किरकोळ किंवा नैमित्तिक रजा:-
माध्यमिक शाळा संहिता व खाजगी शाळा नियमावली नागरी सेवा 1981 अन्वये शासन निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त प्रशासकीय प्राथमिक ,माध्यमिक उच्च माध्यमिक ,कनिष्ठ महाविद्यालय, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना आठ किरकोळ रजा किंवा नैमंतीक रजा मंजूर करण्यात आल्या आहेत. परंतु या नियमांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय दिनांक 19 मे 2004 नुसार आता किरकोळ रजा एका वर्षात आठ ऐवजी 12 किरकोळ रजा अनुज्ञेय करण्यासाठीचा आदेशान्वये शासनाची मंजुरी देण्यात आली आहेत. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आता नवीन नियमानुसार आठ दिवस आयोजित बारा दिवस किरकोळ रजा किंवा नैतिक रजा घेता येईल. संबंधित 12 रजा ह्या सत्र 2004 ते 2005 पासून आतापर्यंत लागू आहेत. किरकोळ रजा 12 मंजूर आहेत.तसेच शाळेतील प्राचार्य, उप प्राचार्य ,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर या वर्गातील सर्व व्यक्तींना जून 2004 पासून बारा दिवसांची किरकोळ रजा किंवा नैमंतीक रजा आणू नये शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आली आहेत.तसेच शाळेतील अधीक्षक मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई नाईक व ग्रंथपाल या वर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 22 नोव्हेंबर 2000 पासून आठ दिवसाची किरकोळ रजा किंवा नैतिक रजा आणून तयार होईल तसेच सन दोन हजार पाच ते सहा या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण सेवकास बारा दिवस इतकी किरकोळ रजा किंवा नैतिक रजा अनुज्ञ राहील. शिक्षण सेवकाने त्यापेक्षा जास्त रजा म्हणजे 12 राजे पेक्षा जास्त रजा घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानधनातून पगार कपात करण्यात येईल अशी अट नमूद केली आहे.मुख्याध्यापकाच्या परवानगीशिवाय किरकोळ रजा सामान्यतः मोठ्या सुट्टीला मागे किंवा पुढे जोडून घेता येणार नाही जर जोडून घ्यायची असेल तर मुख्याध्यापकाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता कर्मचाऱ्याला अनुपस्थितीचा कालावधी कमी असल्यास म्हणजे अर्धा दिवस असल्यास किंवा निम्म्यापेक्षा कमी असल्यास अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा घेता येईल. जर कामाचा दिवस हा अर्धवेळ दिवस असेल म्हणजे शनिवार हा अर्धा दिवस शाळा असेल त्या दिवशी होणारी किंवा ती शाळा जो कामाचा अर्धा दिवस मानत असेल अशा इतर कोणत्याही दिवशी होणारी अनुपस्थिती ही अर्ध्या दिवसाची नैतिक रजा किंवा किरकोळ रजा न मानता ती पूर्ण दिवसाची किरकोळ रजा समजण्यात येईल याची नोंद घेणे आवश्यक आहे
सारांश:-
आपण आज फक्त किरकोळ रजा व रजा नियम या संबंधात संपूर्ण माहितीचा अभ्यास केलेला आहे संबंधित लेख हा फक्त किरकोळ रजेच्या संदर्भात वर्णन करणारा असून संपूर्ण सुट्ट्यांचे वर्णन करण्यासाठी आणखी काही लेख लिहिणे आवश्यक आहे पुढे ते लिहिणारच आहे.
सर्वसामान्यपणे रजेबाबत एका दृष्टीक्षेपात रजा आपणास थोडक्यात खालील प्रमाणे स्पष्ट करत आहेत.
A) किरकोळ रजा 12 दिवस. 16(1-9)
(पूर्ण पगारी).
B) विशेष किरकोळ
रजा (पूर्ण पगारी).
1) नसबंदी शस्त्रक्रिया. 06 दिवस. 16(अ)
2) निर्बीजीकरण
शस्त्रक्रिया. 14 दिवस. 16(10अ,2)
3) लूप बसून घेण्यासाठी. 01 दिवस. 16(10अ,3)
4) प्रसुती कालाव्यतिरिक्त
निर्बीजीकरण केलेल्या
पत्नीच्या देखभालीसाठी
रजा. 07 दिवस. 16(10अ,4)
5) पत्नीच्या
देखभालीसाठी
प्रसूती कालीन
निर्बीजीकरण
शस्त्रक्रियेनंतर
विशेष राजा. 04 दिवस. 16(10अ,4)
6) कुत्रा चावल्यावर
उपचारार्थ रजा. 21 दिवस. 16(10 )
ब,1)
7) राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत
सहभाग रजा. 30 दिवस. (10ब,2)
8) गिर्यारोहण. 30 दिवस. (10ब,3)
9) मोफत रक्तदान. 01 दिवस. (10ब,4)
10) क्रीडा पंच 30 दिवस. (10 ब)
C) परिवर्तित पूर्ण
पगारी रजा. देय. 16(12)
D) प्रसूती रजा
पूर्ण पगारी विशेष. 180 दिवस. 16(13)
E) अर्जित रजा. 30 दिवस. 16(18)
F) मुख्याध्यापक
अर्जित रजा. 15 दिवस. 16(18)
G) सरेंडर रजा. 30 दिवस. 16(21)
H) अर्ध पगारी रजा. 20 दिवस. 16(23)
I) सेवानिवृत्ती पूर्व रजा. 240 दिवस. 16(29)
J) असाधारण रजा
(बिन पगारी).
1) अस्थाई कर्मचाऱ्यास. 90 दिवस.
2) तीन वर्षे सेवा. …
J) असाधारण रजा
(बिन पगारी).
1) अस्थाई कर्मचाऱ्यास. 90 दिवस.
2) तीन वर्षे सेवा. 180 दिवस.
वैद्यकीय रजा
3) पाच वर्षे सेवा. 365 दिवस
वैद्यकीय रजा
4) एक वर्षे सेवा
कर्करोग/ मानसिक
आजार. 365 दिवस
5) एक वर्षे सेवा
क्षय उपचारार्थ 540 दिवस
6) तीन वर्षे सेवा
मान्यताप्राप्त
अभ्यासक्रम 730 दिवस
K) अध्ययन रजा
पूर्ण पगारी. 365 दिवस
L) नियमित
राजीनामा
दिल्यानंतर
अर्जित रजा. 120 दिवस
M) क्षयरोग
कर्करोग
कुष्ठरोग
पक्षघात
उपचारार्थ रजा 365 दिवस
टीप:- J जे ते एम M = या स्तंबामधील रजा महाराष्ट्र नागरी सेवा नियम 63, 81 ,67 ,69 अनुक्रमे या नियमानुसार दिल्या जातात.
सर्वसामान्यपणे वरील प्रमाणे रजा देण्याची शासकीय स्तरावरून दिलेली नियमावली स्पष्ट केली आहे.
FAQ
1) नैमन्तिक रजेला पर्यायी शब्द कोणता वापरल्या जातो?
किरकोळ रजा .
2) शिक्षकाला किती किरकोळ रजा वर्षभरात मान्य आहे?
फक्त12 दिवस.
3) रक्तदान करण्यासाठी पगारी रजा किती दिवसाची दिली जाते?
फक्त एक दिवस.
4) मुख्याध्यापकाला जास्तीत जास्त किती दिवसाची अर्जित रजा रोखीकरण करता येते?
फक्त तीनशे दिवस
5) सेवक वर्गाला किती दिवस किरकोळ रजा मिळते?
फक्त आठ दिवस
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.