रक्षाबंधन माहिती मराठी |Raksha Bandhan Information In Marathi

Date:2024-03-02
Blog Image
 
0

रक्षाबंधन हा सण महत्त्वाचा मानला जातो. रक्षाबंधन सण हिंदू समाजातील भारतात लोक साजरे करतात. दरवर्षी हा सण नेहमी आगस्ट महिन्यात येत असतो. अगस्त महिन्यात सर्वच महत्त्वाचे सण येतात. राष्ट्रीय सणासह धार्मिक सण पण ऑगस्ट महिन्यात येतात. म्हणून सर्व समाजाचे लक्ष ऑगस्ट महिन्याकडे लागलेले असते. किंवा गोष्ट महिना येतो याची वाट चातक पक्षाप्रमाणे पाहत असतात. भारतात ज्या ज्या भागांमध्ये हिंदू समाजातील लोक राहतात तेथे या सणाला महत्त्वाचा सण म्हणून बहिण भाऊ साजरी करत असतात. यावर्षी रक्षाबंधन हा सण अधिक मासामुळे लांबीवर गेला आहे. दरवर्षी लवकर साजरा होतो पण यावर्षी थोडा उशिरा साजरा होणार आहे. म्हणून सर्वांना रक्षाबंधनाची आतुरतेने अधिक मासामुळे वाट पहावी लागणार आहे. अधिक मासामुळे यावर्षी हासन श्रावण महिन्यात त शेवटी आला आहे. यावर्षी अधिक मास व श्रावण महिना एक साथ जोडून आल्यामुळे अनेक धार्मिक सण अतिशय आनंदाने मुहूर्त पर्वावर साजरे होत आहेत. अनेक लोक लोकांनी या महिन्यात यावर्षी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत.

 
 
रक्षाबंधन माहिती मराठी
रक्षाबंधन माहिती मराठी


 

भारतातील हा सण अनेक उत्सवापैकी एक महत्त्वाचा सण म्हणून बहिण भाऊ साजरे करतात. या रक्षाबंधनच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते व या राखी बांध कामामुळे बहिणीचे रक्षण करण्याचे भाऊ वचन देतो. बहिण भावाचे अतूट व प्रेमळ व भावनात्मक नाते जपण्यासाठी भाऊ बहिणी वरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी बहिणीस काही शुभ वस्तू देतात. म्हणून आपल्याला या सणाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी लेख लिहिण्यासाठी हातात घेतला आहे. जगभरातील हिंदू समाजातील लोक हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.

रक्षाबंधन मराठी माहिती

१)रक्षाबंधन मुहूर्त व तिथी बाबत माहिती.:-

यावर्षी रक्षाबंधन हा सण दिनांक 30 ऑगस्ट 1923 रोजी आलेला आहे. हिंदू पंचांग प्रमाणे यावेळी हा सण भद्राकाल या मुहूर्तावर आला आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे भद्राकाल योग्य शुभ मुहूर्त म्हणून मानल्या जात नाही. म्हणून काही पंचांग निर्मिती करणाऱ्या लोकांनी हा काळ अशुभ मानला आहे. याच दिवशी पौर्णिमा पण आहे. पोर्णिमा ची सुरुवात 30 ऑगस्ट 2023 रोजी सुरुवात होत असून दुपारपासून सुरुवात होते. असे पंचांगात व कॅलेंडर मध्ये दर्शविण्यात आले आहेत. पोर्णिमा ही दुपारी बारा वाजून 29 मिनिटांनी सुरू होत आहे. पण कालनिर्णय कॅलेंडर मध्ये असे दर्शविण्यात आले आहे की पौर्णिमा ही नीज श्रावण शुद्ध चौदा धनिष्ठा असून हा दिवस शुभ दिवस आहे ‌. कालनिर्णय कॅलेंडर प्रमाणे पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी दहा वाजून 58 मिनिट दर्शविला आहेत व शुभ दिवस म्हणून दहा वाजून 49 मिनिटांनी सुरुवात होऊन ही पौर्णिमा दिनांक 31 ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहेत. या दरम्यानचा संपूर्ण कालावधी हा शुभ मुहूर्त म्हणून मानला गेला आहेत याच दिवशी या पौर्णिमेला कोकण विभागातील लोक नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा सण बुधवारी येत असल्यामुळे या दिवशी बुध पूजन करावे व दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पौर्णिमा असल्यामुळे गुरुवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटाच्या आत बृहस्पतीचे पूजन करावे असे म्हटले आहे एकंदरीत विचार करता वेगवेगळ्या पंचांगामध्ये वेगवेगळ्या तिथी दर्शविण्यात आल्या आहेत. आपण आपल्या परीने जो काळ शुभ असेल त्या काळात रक्षाबंधन साजरी करावी किंवा काही भागातील लोकांनी नारळी पौर्णिमा म्हणून या शुभ मुहूर्तावर साजरी करण्यास काही हरकत नाही. आपापल्या दृष्टीने योग्य वेळी दोन समांतर दोन्ही सणांचे महत्त्व लक्षात घेऊन हे सण साजरे केले जातात.

२) रक्षाबंधन सणाचे पुरणातील महत्त्व:-

पुराणातील एका कथेमध्ये असे सांगितले आहे की अनेक राक्षस देवासी लढाई करत असत. व लढाईत राक्षसाचा म्हणजेच दानवाचा विजय होत असे. अशाच या प्रसंगी म्हणजे या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी वृत्तासुर नांवाचा एका दानवाने म्हणजेच राक्षसाने इंद्राला लढाई करण्याचे आव्हान दिले. त्यावेळी इंद्रदेवाने राक्षसाचे आव्हान स्वीकारले व लढाई सज्ज झाला. लढायचं जाण्यास सज्ज झाला असताना त्याने आपले वज्र नावाचे हत्यार हातात घेतले व लढाईत निघाला. त्यावेळी इंद्राची पत्नीने तिच्याकडे असणारा विष्णू देवा कडून प्राप्त झालेला रंगीत दोरा इंद्राच्या उजव्या हातात बांधला व राक्षसाची लढाई करण्यास निघाला. पत्नीने आपल्या हातात रंगीत दोरा बांधल्यामुळे इंद्रदेवताचा आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासावर त्याने म्हणजे इंद्राने वृतासूर नावाच्या राक्षसाचा वद  करून लढाई जिंकली. त्यामुळे इंद्राचे गेलेले वैभव त्याला राक्षसाकडून पुन्हा परत मिळाले. त्यामुळे इंद्राला ही कल्पना झाली की आपल्या हातात बांधलेला रंगीत दोरा म्हणजे सामान्य दोरा नव्हता तर तो दोरा विष्णू देवतेने इंद्रदेवतेच्या पत्नीला दिलेला दोरा होता. तो दोरा असामान्य ठरला व राक्षसाचा पराभव झाला. त्या दिवसापासून किंवा त्या प्रसंगापासून मनगटावर राखी म्हणजे दोरा बांधण्याची पद्धत परंपरेने हिंदू समाजात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वहन व आली आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हिंदू समाजात साजरे केले जातात. बहिणीने बांधलेल्या दोऱ्याला किंमत फारशी नसते पण किमतीपेक्षा शक्ती जास्त असते म्हणून बहीण भावांचा सण म्हणून एकमेकांवर अतुट नाते दर्शक सण म्हणून साजरा केला जातो.

३) रक्षाबंधन चे महाभारतातील महत्त्व:-

महाभारत हे सर्वांना परिचित आहे.कौरव व पांडव यांच्यातील भाऊबंदकीतील वाद युद्ध रूपाने आपण सर्वजण महाभारताची माहिती मिळवतो. महाभारतामध्ये युद्ध सुरू असताना श्रीकृष्णाच्या हाताच्या उजव्या बोटाला युद्धात जखम झाली व त्यातून रक्तस्राव होऊ लागला. सायंकाळी हा रक्तस्राव द्रौपदीने पाहिला व द्रौपदीने आपल्या साडीचा पदर व या पदराची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. त्यामुळे श्रीकृष्णांच्या बोटाच्या वेदना कमी झाल्या व रक्त स्राव ही थांबला. त्यामुळे श्रीकृष्णाने एक मोठा संकल्प केला की अजीवन द्रोपतीचे रक्षण करण्याचा फार मोठा संकल्प होता. त्यामुळे वेळोवेळी द्रोपतीचे संरक्षण करणे हे काम श्रीकृष्णावर येऊन पडले. दिवशी महाभारतात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन बहिणीचे भावाने रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तो दिवस म्हणजे रक्षाबंधन होय.

४) नारळी पौर्णिमा

रक्षाबंधन याच दिवशी नारळी पौर्णिमा पण येते. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्टला आली आहेत. नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी समुद्र काठावरील किंवा कोकण विभागातील कोळी समाजाचे लोक जे समुद्रकिनारी राहतात ते नारळी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी कोळी लोक समुद्राची पूजा करतात म्हणजे वरून देवतेची पूजा करतात व सागराला नारळ शुभसूचक म्हणून अर्पण करतात म्हणून याच दिवशी नारळी पौर्णिमा ही कोळी समाजास स्थापन केली जाते. त्याची पूजा करून कोळी लोक आपला मासे पकडण्याचा धंदा या दिवसापासून सुरुवात करतात असेही म्हटले आहे.

५) रक्षाबंधन सणाची सुरुवात:-

रक्षाबंधन सणाबाबत पुराणात अनेक कथा सांगितल्या आहेत पण इतिहासामध्ये योग्य व ठोस पुरावा असा कोणताही इतिहासाकडे डोकावून पाहिले असता सापडत नाही. म्हणून रक्षाबंधनाचा इतिहास हा अतिशय जुना असून याबाबत अनेक दंतकथा लिहिल्या गेल्या आहेत. व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सन संक्रमित झालेला आहे. रक्षाबंधनाची सुरुवात कोणी व केव्हा केली याबाबत स्पष्ट उल्लेख आढळून येत नसल्यामुळे श्रद्धा म्हणून दंतकथेच्या आधारे लोक बहीण भावाचे नाते अतूट असते हे कधी न तुटणारे असते म्हणून रक्षाबंधन हे दोघांसाठी सुद्धा महत्त्वाचे असते. रक्षा म्हणजे रक्षण त्यामुळे भावाने बहिणीचे रक्षण करावे तसेच बहिणीने ही सुद्धा भावाचे रक्षण व्हावे अशी देवाजवळ प्रार्थना केली जाते. त्यातूनच रक्षाबंधन ही संकल्पना पुढे आली. हिंदूंचा महत्त्वाचा सण म्हणून बहीण भावाला राखी बांधून सण साजरा करतात.

६) रक्षाबंधन सणाबाबत ऐतिहासिक काही कथा:-

रक्षाबंधन सणाच्या ऐतिहासिक कथा पुढीलप्रमाणे सांगण्यात येतात.

अ) सिकंदर कथा:-

इतिहासातील एका कथेवरून असे सांगता येईल जेव्हा सिकंदर भारतात इसवी सन पूर्व 326 मध्ये भारतात आला व भारतात पदार्पण केले त्यावेळी असे म्हटले जाते की सिकंदर ची पत्नी रोषण हिने पौरस या या राजाला सिकंदर बरोबर एक राखी पाठवली होती. आणि राखी सोबत पाठवताना तिने राजाकडून एक वचन घेतले होते की, राजे महोदय आपणासाठी मी एक राखी पाठवत आहे त्या राखीचा स्वीकार करावा. सिकंदर ने हातात राखी बांधली.ही राखी आपण हातात बांधल्यानंतर कधीही सिकंदर चे रक्षण करण्याची जबाबदारी पोरस राजावर आली राजा वार करणार नाही. ज्या ज्या वेळेस सिकंदर लढाईवर होता त्या त्यावेळी त्याने पौरस राजा वर आली. सिकंदरच्या हि राखी बांधल्यामुळे कधी सिकंदर लढाई वर असताना राजाचे लक्ष राखी वर जात असे. त्यामुळे पौरस राजाला वार करता आला नाही. त्याचे लक्ष फक्त राखी कडे जात होते व त्यावेळी राजा सिकंदर वर कोणी हल्ला केला नाही. त्यामुळे पौरस राजाने कोणताही वैयक्तिक हमला सिकंदर वर असतानाही सुद्धा केला नाही हे त्या राखीचे महत्त्व स्पष्ट होते.

आ) रक्षाबंधन बाबत इंग्रज राजवटीतील कथा.:-

इंग्रजाची जुलमी राजवट भारतात सुरू असताना इंग्रजांनी फोडा आणि घोडा या तत्त्वाचा वापर करून संपूर्ण देशभर ब्रिटिश सत्ता स्थापन केली. मुस्लिम व हिंदू मध्ये फूट ही इंग्रजांनीच निर्माण केली. सन 1905 मध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कारकिर्दीत ब्रिटिशांनी म्हणजेच ब्रिटिश सरकारने जाती जाती वरून संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा फार मोठा प्रयत्न केला. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एकता टिकून राहावी म्हणून त्यावेळी बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एकता टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले व एकता निर्माण करण्याचे काम केले त्यामुळे बंगालमध्ये हिंदू आणि मुस्लिम एक झाले त्या दिवसापासून बंगाली या प्रांतामध्ये रक्षाबंधनाची तसेच संपूर्ण भारतामध्ये समतेचा व एकतेचा संदेश रवींद्रनाथ टागोर यांनी देऊन रक्षाबंधन ची सुरुवात केली असे इतिहासात वर्णन आहे.

इ) मुघल राजवटीतील रक्षाबंधना बाबत कथा:-

मुघलाचा राजा बाबर भारतात आला. व मुगल सत्तेचा प्रारंभ सुरू झाला. बाबरचा मुलगा हुमायून यांच्या मुगल राजवटीतील एक कथा महत्त्वाची आहे. या कथेत असे म्हटले आहे की, राणी कर्णावती आणि हिमायू यांची एक कथा प्रसिद्ध आहे. सन 1935 मध्ये त्यावेळी चित्तोड ची राणी कर्णावती हिला असे वाटू लागले. त्यांचे हे राज्य गुजरातचा सुलतान बहादूर शाह पासून वाचू शकणार नाही. केव्हाही तो राजा चित्तोडवर आक्रमण करू शकतो त्यामुळे राणी कर्णावती विमान ला राखी पाठवून बहीण या नात्याने मदत मागितली होती. आणि इतिहासात असे सांगितले जाते की राणी कर्णावती ला युद्धामध्ये हिमायून याने मदत केली होती असे सांगितले जाते. म्हणून रक्षाबंधनातील राखीला किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल. व राखी मध्ये किती सामर्थ्य आहे याचीही कल्पना येईल.

रक्षाबंधन हे दोन शब्द मिळून एकत्र बनलेले शब्द आहेत. रक्षाबंधन म्हणजे संरक्षण होय. रक्षा म्हणजे रक्षण होय तसेच बंधन म्हणजे एक प्रकारची बांधलेली गाठ होईल. आणि गाठ एकदा पक्की बांधली की बंधनात राहणे हे इतिहासातील वर्णन आहे. मग नातेसंबंध कोणतेही असो, कोणत्याही प्रकारचे असो ,रक्षाबंधन सणानिमित्त बहिण आणि भावाचे नाते अतूट बंधनात बांधले गेलेले आहेत.म्हणूनच भारतातील अनेक सणापैकी दरवर्षी रक्षाबंधन हा पौर्णिमेच्या दिवशी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्याची प्रथा पुरातन काळापासून इतिहास काळापर्यंत तसेच इतिहास काळापासून तर आज पर्यंत रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा साजरी केली जाते आणि मोठ्या आनंदाने साजरी केली जाते आणि बहिण भावांचे नाते संबंध एका दोऱ्याच्या साह्याने गाठ देऊन, हातात राखी बांधून बहिण भावाकडून रक्षा करण्याची मदत मागत असते. भाऊ या नात्याने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भावावर येऊन पडली आहे.

ई) रक्षाबंधन सणाचे आगळे वेगळे महत्त्व:-

संपूर्ण जगाला लाजवणारी धार्मिक संस्कृती अनेक सणाच्या रूपाने भारतात अस्तित्वात आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने तसेच धार्मिक इयत्तेच्या दृष्टिकोनातून कुटुंबा कुटुंबातून बहिण भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी एक सामान्य दोरा आपल्या प्रेमाने घट्ट बांधून साजरा करण्यात आलेला सण भारतातील प्रत्येक स्त्रीला, आई आणि बहिणीला एक वेगळाच दर्जा निर्माण करून देते. त्या दर्जामुळे एका कुटुंबात नातेवाईकात शेजारीपाजारी वर्गात महाविद्यालयात मित्रमंडळीमध्ये या भारतीय सणाने कौटुंबिक व सामाजिक एकता व सलोख्याचे संबंध निर्माण करणारी आगळीवेगळी आपलेपणाची भावना वाढवणारी जाणीव निर्माण करणारी जबाबदारी  ची वेगळी बहिण भावाची ही कथा आहे. आजच्या आधुनिक युगात देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि संरक्षणाची भावना निर्माण करणारी कथा आहेत. भारतातील बऱ्याच स्त्रिया ह्या आपल्या जवानाला भाऊ मानून काश्मीरच्या सीमेवर जाऊन राखी बांधतात व देशाच्या संरक्षणाची जबाबदारी व आपली स्वतःची जबाबदारी निर्माण करणारी रक्षण बंधनाची ही महान कथा पुरातन काळापासून आजपर्यंत बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभो व आपल्या बहिणीचे त्याने सदैव रक्षण करावे असे तो वचन देतो त्यानंतर भाऊ-बहीण एकमेकांना भेट वस्तू दिल्या जातात तसेच मिठाईचे सुद्धा वाटप केले जाते. आजही घराघरातून राखी पौर्णिमेचा सण जवळ आला की बहीण भावांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद निर्माण होतो व एकमेकांचे नाते या दोन शब्दाने एवढे घट्ट पवित्रमय बनते त्या गोष्टीचा विचार आचार आदर रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने जगातील प्रत्येक आपला भाऊ आनंदी निरोगी सुखी राहू त्याची भरभराट हो त्याला दीर्घायुष्य लाभो मग ते नाते रक्ताचे असो की रक्ताचे नसो परंतु राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी हातात बांधल्याबरोबर बहिण भावाचे नाते निर्माण होते. याबाबत आपण भारतात अनेक रक्षाबंधनावर आधारित चित्रपट सुद्धा पाहिलेले आहेत हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे आजही भारतात हा सण आगळे वेगळे महत्त्व निर्माण करून जातो. बहिण व भावाला एकत्रीकरणाची जाणीव करून देतो. बंधनाची जाणीव करून देतो.

ई) रक्षाबंधन सणाची प्रक्रिया व प्रतिक्रिया:-

या सणाच्या दिवशी सर्वप्रथम आनंद जर कोणाला निर्माण होत असेल तर तो बहिणीला होतो त्यामुळे बहीण रक्षाबंधन सणाच्या अगोदरच बाजारात जातात व राखी खरेदी करतात तसेच नवे कपडे सुद्धा खरेदी करतात सणासाठी लागणारे महत्त्वाचे मिठाईचे पदार्थ सुद्धा विकत घेतले जातात. नवे नवे कपडेही सुद्धा खरेदी केले जातात. आपल्या भावाला ओवण्यासाठी आणि भेट देण्यासाठी अनेक वस्तू खरेदी केल्या जातात. रक्षाबंधनाच्या शुभ पर्वावर सकाळीच आपली बहीण आपल्या भावाला ओवाळते व वळण्यासाठी आवश्यक असणारे पूजेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य ताटात ठेवले जातात. प्रथम बहीण आपल्या भावाला ओवाळताना त्याच्या कपाळावर गंधाचा किंवा कुंकाचा टिळा लावते. व आपल्या भावाच्या हातात राखी बांधते. भावाला ओवल्यानंतर भाऊही सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तू दिल्याशिवाय राहत नाही आणि तो देतोच. अशा रीतीने खेड्यापासून तर शहरापर्यंत भारतातून तसेच जगातून जगभर मोठ्या आनंदाने जे भारतीय आहेत ज्यांना या सणाचे महत्त्व माहित आहे ते महत्त्व म्हणजे सामाजिक समता बंधुत्व आणि एकता वाढीस लावणारे प्रमुख लक्षणे होय आणि आपल्याला आपल्या देशात आज याचीच गरज आहे. राखी बांधण्याच्या पाठीमागील एक शास्त्रीय कारण असे आहे की शास्त्र असे सांगते की या दिवशी वातावरणात एक विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होतात आणि त्या शरीराच्या मध्ये प्रवेश करतात त्यामुळे शरीर गतिमान होते असाही समज आहे नेमके काय आहेत हे कोणीही सांगू शकत नाही. पंचांगामध्ये सुद्धा यम लहरी सूर्यनाडी नक्षत्र आणि सूर्यकिरणे तसेच चंद्र किरणे यामुळे विशिष्ट प्रकारची गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती राखीच्या निमित्ताने आकर्षित होऊन बहिण भावामध्ये अतूट नाते निर्माण होते.

उ) भारतातील अनेक घटक राज्यात अनेक वेगवेगळ्या नावाने सण साजरा

भारतातील अनेक घटक राज्यात अनेक वेगवेगळ्या नावाने सण साजरा होतो. त्यासाठी काही घटक राज्याचा उदाहरणार्थ येथे आपण विचार करणार आहोत. दक्षिण भारतामध्ये हा सण अभीथंब म्हणून साजरा होतो. भारतात सकाळी चांगल केल्यानंतर मंत्र पठण करून सण साजरा केला जातो. गुजरात राज्यात मध्ये सुद्धा लोक या दिवशी लोक शिवलिंगाची पूजा करतात व शिवलिंगाला जल अर्पण करतात .जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगाचे कापूस भिजून दोरा तयार करून बांधला जातो. गुजरात राज्यामध्ये या सणाला पवित्र पन्ना असे म्हणतात पश्चिम घाटामध्ये सुद्धा वरून देवतेला नारळ अर्पण करून राखी पौर्णिमा साजरी केली जाते तसेच उत्तर भारतात कजरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या सणाच्या दिवशी भगवती मातेची पूजा केली जाते व गहू आणि इतर पदार्थ इतरत्र पसरवली जातात त्याचे कारण असे आहे की पीक चांगले येण्यासाठी भगवती मातेला प्रसन्न करतात.

ऊ) रक्षाबंधन सणाचे विशिष्ट वैशिष्ट्ये:-

  • हा सण श्रावण महिन्यात येतो.
  • सणाच्या दिवशी पौर्णिमा असते
  • या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा असेही म्हणतात
  • या सणाला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात.
  • नारळी पौर्णिमेपासून होड्या समुद्रात सोडल्या जातात.
  • कोळी लोक मासे पकडण्यास सुरुवात करतात.
  • बहिण व भावामध्ये प्रेमळ भावना निर्माण होते.
  • आनंदमय व मंगलमय, प्रसन्न मय वातावरण असते.
  • हा एकमेव असा सण आहे की जाती धर्माचे बंधन नाही.
  • संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
  • संपूर्ण जगभर साजरा केला जातो.
  • धार्मिक सलोखा निर्माण होतो.
  • संपूर्ण घराची सजावट केली जाते.
  • सर्वप्रथम देवाची पूजा केली जाते.
  • देवाला वाहण्यासाठी नैवेद्य तयार केली जाते.
  • घराघरातून गोडधोड पदार्थ तयार केले जातात.
  • भावाला पोळण्यासाठी ताट सजवली जाते.
  • भावाला बसण्यासाठी पाठा भवती माडून रांगोळी काढल्या जातात.
  • बहिण आपल्या भावाला पाटावर बसवते.
  • भावाला ओवाळून मिठाई देते.
  • भाऊ भेट वस्तू म्हणून बहिणी स काहीतरी देतो.
  • लहान मंडळी थोरांचे दर्शन घेतात

सारांश:-

रक्षाबंधन सण सुरू होण्याच्या अगोदर जवळजवळ पंधरा दिवस अगोदर संपूर्ण बाजार हा राख्याने गजबजलेला दिसतो. व राख्या खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांची झुंबड उडालेली असते व एकच गर्दी होते व राखी खरेदी करण्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. अनेक दुकानातून, अनेक व्यक्ती ,अनेक राख्या ,विकत घेतात. अतिशय आकर्षक रंगबाजी दर्शक राख्या तयार केल्या जातात. कपडा बाजारामध्ये सुद्धा ग्राहक फार मोठ्या प्रमाणात जातात आणि नवे नवे कपडे भेटवस्तू देण्यासाठी व परिधान करण्यासाठी खरेदी केले जाते जणू काही असे वाटते की एक लोकांचे संमेलन भरलेले आहेत व लोक अतिशय आनंदात बाजारात लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करतात. याबाबत अनेक दुकानावर अनेक ठिकाणी चर्चा करून खरेदी केला जातो. ज्या बहिणीचे भाऊ बाहेरगावी आहेत ते सणाला येऊ शकत नाही अशा क्षणात बहीण आपल्या भावाला पोस्टाने किंवा कुरिअरने पंधरा दिवस अगोदर एका पाकिटातून राख्या पार्सल केल्या जातात. रक्षाबंधनाच्या दिवशी त्या त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही अतिशय आनंदाने ते रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने पाठवलेल्या राख्या बांधतात.

FAQ 

1) रक्षाबंधन हा सण यावर्षी कोणत्या दिवशी येतो,?

   30 ऑगस्ट 2023.

2) नारळी पौर्णिमा म्हणून कोणते लोक सण साजरा करतात?

कोळी समाजातील लोक नारळी पौर्णिमा साजरी करतात.

3) रक्षाबंधन हा सण इंग्रजी महिन्यात कोणत्या महिन्यात येतो?

ऑगस्ट महिन्यामध्ये.

4) रक्षाबंधन मराठी महिन्याप्रमाणे कोणत्या महिन्यात येतो?

श्रावण महिन्यामध्ये येतो.

5) रक्षाबंधन हा सण यावर्षी श्रावणाच्या शेवटी का आला आहे?

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शेवटी येण्याचे कारण म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदर अधिक मास हा महिना आला आहे. त्यामुळे हा उशिरा म्हणजे आजच्या शेवटी आला आहे. दरवर्षी मध्यभागी येतो.

अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील लेख अवश्य वाचा.

 १) नागपंचमी सणाची मराठी माहिती.

 २) ऑगस्ट क्रांती दिन मराठी माहिती.