सेवा जेष्ठता यादीसाठी सेवा जेष्ठता कशाप्रकारे तयार करावी यासाठी निर्गमित.
Introduction
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमाद्वारे तयार केलेले नियम1981 व आदेश सुधारित पद्धतीत सेवा जेष्ठता यादी व पदव्या समकक्षता याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट करत आहे.
सुधारित अधिनियम फक्त शालेय कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांनी अद्यावत अधिसूचना दिनांक 24 मार्च 2023 रोजी निर्गमित केली आहे. मूळ नियमावली सुधारणा करण्याचा हेतू असल्यामुळे 1969 च्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब अन्वये आधी सूचना क्रमांक 99 नुसार प्राधिकृत प्रकाशानाद्वारे या राजपत्राच्या द्वारे भाग एक ,एक अ यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त काही नियम व आदेश ह्या राजपत्राद्वारे स्पष्ट केले आहेत. संदर्भाने सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे स्पष्ट करणार आहोत.
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम 1977
अधिसूचना
महाराष्ट्र राज्य खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीच्या संदर्भात अधिनियम 1977 हा महत्त्वाचा अधिनियम व या अधिनियम सुधारणा पाहणे गरजेचे आहे. या परिपत्राचा क्रमांक संकीर्ण टीएनटी एक नुसार सेवा सेवाशर्तीचे अधिनियम 1977 व 1978 चा महाराष्ट्र नियम तीन यांच्या कलम नियमाची पोट करणे एक व दोन निर्गमित करून याद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा याबाबतीत समर्थन करणाऱ्या सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने याद्वारे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी हा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. ते नियम आपण स्पष्ट करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने आपल्या राजपत्रात 24 मार्च 2023 रोजी सुधारित अधिनियम लागू केले त्यासंदर्भात संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहेत. यासाठी प्रत्येक कलमाचा अर्थ स्पष्ट करणे गरजेचे आहेत.
महाराष्ट्र राजपत्र भाग क्रमांक एक:-
खालील प्रमाणे कलमे एक ते आठ दर्शविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्राचा भाग एक मध्ये ही बाब येते.
1) कलम कलम क्रमांक एक मध्ये महाराष्ट्र नागरिक कर्मचारी सेवा शर्तीच्या सुधारणा आता नवीन नावाने म्हणावे लागतील आणि ते नवीन नाव महाराष्ट्र राज्य खाजगी कर्मचारी सेवा शर्ती सुधारणा नियम 2023 असे नामकरण झाले आहेत.
2) कलम क्रमांक दोन नुसार राजपत्राप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवा करताना सेवाशर्तीची नियमावली 19 81 नुसार परिशिष्ट दोन मध्ये ज्याचा उल्लेख केला आहे तो भाग म्हणजे सुधारणा विभाग होय आणि ही सुधारणा 1981 मधील अनुसूचित फ म्हणून नमूद केली आहे. अनुसूची फ च्या संदर्भात ही बाब सेवाजेष्ठतेच्या संदर्भात महत्त्वाची आहेत. कलम क्रमांक दोन मधील उप मुद्दे म्हणजे बाबी पुढील प्रमाणे स्पष्ट करत आहोत.
महाराष्ट्र राज्य पत्र भाग क्रमांक दोन मधील उपक्रम व मुद्दे:-
अ) या पोटनियोमात प्रवर्ग "की"या नांवा आयोजित पुढील प्रमाणे प्रवर्ग क मध्ये कर्मचाऱ्यांच्या अर्हता धारण करण्याची बाब नमूद केली आहेत. आता क प्रवर्गामध्ये पुढील बाबी नमूद केल्या आहेत त्याचा संपूर्ण विचार येथे करण्याचे गरज असल्यामुळे खालील प्रमाणे शैक्षणिक अर्थानुसार काही गट दर्शविले आहेत ते गट समजावून घेऊ.
१) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद द्वारे वेळोवेळी केलेल्या बदलानुसार स्पष्टपणे असे नमूद केले आहे समाजशास्त्र/ मानवशास्त्र /विज्ञान /गणित/ भाषा याबाबत कर्मचाऱ्यांनी 50% गुणासह वर दर्शविलेल्या विषयात नमूद केली आहे म्हणजे पदवी परीक्षेसाठी पन्नास टक्के गुणाची आवश्यकता आहे. त्याशिवाय वरील पदवी विषयात कोणत्याही एका विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाय एम.एड. 50% गुणासह उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा याबाबत शिक्षण शास्त्र हा एक नवीन विषय सुरु झाला असून या हा विषय एम. ए .शिक्षण शास्त्र म्हणून 50% गुणासह उत्तीर्ण होण्याची अट आवश्यक आहे. शिक्षण शास्त्र एम .ए. हा विषय आता एम.एड. समकक्ष आहेत.
२) किंवा प्रवर्ग "क"खालील शैक्षणिक पात्रता
एम.ए./एम. एस .सी./एम. कॉम./बी.टी.(बॅचलर ऑफ टीचर) किंवा त्यासारखी तत्सम पदवी समक्ष मान्यता आली आहे म्हणजे वरील एक मध्ये जो भाग दर्शविला आहे त्या भागा बाबत भाग क्रमांक दोन प्रवर्ग क समक्ष मान्य आला आहे आणखी या विभागाला खालील विभाग पण समक्ष मानण्यात आला आहे. म्हणून म्हणून आपण किंवा हा शब्द वापरत आहे.
३) किंवा खालील शैक्षणिक पात्रता
उपरोक्त दोन मध्ये दर्शविलेल्या शैक्षणिक पात्रते साठी समक्ष पुढील पदवी ग्राह्य धरण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता:-बी.ए./ बी.एस. सी. /बी.कॉम./ बी.टी./ बी.एड किंवा तत्सम स्वरूपाची इतर पदवी समकक्ष मानली जाईल. प्रवर्ग क मध्ये या पदवीला किंवा शैक्षणिक पात्रतेला खाली दर्शवलेली शैक्षणिक पात्रता ला मान्यता देण्यात आली आहे.
३) किंवा सम कक्ष खालील पदवी विचारात घेतली जाईल.
त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की जुन्या अभ्यासक्रमानुसार ज्यांनी खालील पदवी धारण केली असेल तेही विचारात घेण्यात येईल व ते उपरोक्त शैक्षणिक पात्रतेसाठी समक्ष मानले जाईल.
शैक्षणिक पात्रता:-बी.ए. / बी.एस.सी./डीप.टी.
अनेक लोकांना याबाबत माहिती नसल्यामुळे डीप.टी. डीप.टी चा अर्थ स्पष्ट करणे आवश्यक आहे. डिप्लोमा टीचर म्हणजे डीप.टी. हा अभ्यासक्रम डी.एड. सुरू होण्याच्या अगोदर शासनाने सुरू केला होता हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा होता शिक्षक म्हणून लागण्यासाठी त्यावेळेस ही पदविका गृहीत धरली जात होती कारण डीएड अस्तित्वात नव्हते. डीएड सुरू होण्याच्या अगोदरचा हा अभ्यासक्रम म्हणजे जुना अभ्यासक्रम. शिक्षक पदासाठी ही पात्रता ग्राह्य धरण्यात आली. जे शिक्षक सेवेत रुजू झाले त्यासाठी हा अभ्यासक्रम आता जुना अभ्यासक्रम असे म्हटले आहे. 1960 ला हा अभ्यासक्रम सुरू झाला तर डीएड दोन वर्षाचे ज्या दिवशी सुरू झाले त्या दिवशी जुना अभ्यासक्रम बंद झाला. 1975 ला नवीन अभ्यासक्रम सुरू झाला. तसेच डी.एड. दोन वर्षाचा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम व्यावसायिक पात्रता म्हणून पदविका म्हणून समजण्यात येतो.
उदाहरणार्थ
Dp.T. is equal to D.Ed. ही पदविका दोन वर्षाची सम कक्ष मानली आहेत. या राजपत्रात या शैक्षणिक पात्रतेबाबत लोक गोंधळलेल्या स्थितीत होते कारण जुना अभ्यासक्रम डीप.टी. सर्वांना फक्त डी.एड. माहित आहे.
४) किंवा
खालील शैक्षणिक पात्रता उपरोक्त पात्रतेच्या सम कक्ष आहे. म्हणून ज्यांनी खालील पात्रता पूर्ण केली असल्यास ते उपरोक्त पात्रतेसाठी समक्ष आहे.
बी. ए ./बी. एस. सी ./बी .कॉम./डिप.एड. म्हणजे डिप्लोमा ऑफ एज्युकेशन. डिप्लोमा ऑफ एज्युकेशन हा जुन्या काळातील अभ्यासक्रम असून हा फक्त एक वर्षाचा अभ्यासक्रम होता. डिप्लोमा ऑफ एज्युकेशन शैक्षणिक पदविका पूर्ण केल्यास व त्यानंतर दहा वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर उपरोक्त सेवा ही सम कक्ष मांडण्यात आली आहेत. तसेच डिप्लोमा ऑफ टीचर म्हणजे डिप .टी. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुद्धा समक्ष मानण्यात आला आहे हा फार जुन्या काळातील अभ्यासक्रम असून अकरावी मॅट्रिक नंतर एक वर्षाचा हा अभ्यासक्रम डिप्लोमा ऑफ टीचर पूर्ण केल्यास त्याला डीएड सम कक्ष मांडण्यात आले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.
५) किंवा
उपरोक्त चार कलमांमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेला समक्ष पात्रता पुढील प्रमाणे दर्शवली आहे.
बी.ए ./बीएस्सी /बी कॉम /एस टी सी /बी एड/ डीप टी.(एक वर्षाचा अभ्यासक्रम) आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सेवेत लागल्यानंतर दहा वर्षानंतर सेवा जेष्ठतेत विचार केला जाईल. शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहितीचे आकलन होणे आवश्यक असल्यामुळे मुद्दे स्पष्ट करणे सुरू आहे.
६) किंवा
उपरोक्त कलम क्रमांक पाच मध्ये दर्शविलेले मुद्दे कलम क्रमांक सहा मध्ये समक्ष मानली आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
बी.ए. किंवा बीए सारखा दुसरा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून सेवेत काढत असताना बीए च्या शैक्षणिक पात्रतेवर पाच वर्ष अनुभव पूर्ण झाल्यानंतर आपण जर हिंदी विषयातील हिंदी विशारद किंवा वरिष्ठ हिंदी शिक्षक पदवी पूर्ण केल्यास किंवा ज्याने हिंदी विशारद किंवा वरिष्ठ हिंदी सनद पूर्ण केली नसल्यास त्याऐवजी संबंधित सेवेतील कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ हिंदी शिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून सेवेत दहा वर्षे झाल्यानंतर समकक्ष म्हणून समजण्यात येईल.
७) किंवा
शिक्षण क्षेत्रामध्ये शारीरिक पदवी किंवा पदविका प्राप्त केल्या असल्यास उपरोक्त सहा मध्ये दर्शविल्याप्रमाणे सात मधील कलमात कोर्स पूर्ण केल्यास समकक्ष समजण्यात येतात.
उदाहरणार्थ
शाळेत क्रीडा शिक्षकांची आवश्यकता असते. शासन नियमानुसार ज्या शाळेमध्ये 250 विद्यार्थी शिक्षण घेत असेल त्या शाळेत एक क्रीडा शिक्षक नेमण्यात येतो. क्रीडा शिक्षकांच्या पात्रतेच्या बाबतीत खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
बी.ए./ बी.एस् .सी./ बी. कॉम. एच . /बी.पी.एड. किंवा शारीरिक शिक्षण मध्ये बी.ए. केले असल्यास क्रीडा क्षेत्रात काम करणारा शिक्षक व त्यांनी धारण केलेली क्रीडा क्षेत्रातील दर्शविलेल्या पदव्या पूर्ण केल्यास समकक्ष मानण्यात येईल.
७) शारीरिक शिक्षकाप्रमाणेच शालेय स्तरावर कलाविषयक शिक्षक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून कला क्षेत्रामध्ये म्हणजेच चित्रकला बाबत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारा शिक्षक उपरोक्त कलम क्रमांक सहा मध्ये म्हणजेच कलम एक ते सात मध्ये दर्शविलेल्या पदाची सम कक्ष मांडण्यात येतो मग कला शिक्षकाची पात्रता काय हवी ते पहा.
कला शिक्षकांसाठी पात्रता:-
बी.ए/ .बी.एस सी /. बी. एफ .एक./ जी.टी. आर्ट पदविका/तसेच एम. ए. प्रमाणपत्रासह/ए .एम .डिप्लोमा/डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन ह्या संपूर्ण पदव्या चित्रकला किंवा कला या विषयासाठी पूर्ण करणारा शिक्षक सम कक्ष समजण्यात येईल.
८) किंवा
कलम क्रमांक एक ते आठ या कलमास समकक्ष कलम नंबर आठ मध्ये म्हणजे या कलमात जी शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आहे ते सर्व एकमेकासम कक्ष आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.
शैक्षणिक पात्रता:-बी.ए ./बीएस्सी /बीकॉम/जी. डी
आर्ट पदविका तसेच डी. टी .सी/डी.एम./ए.टी.डी या प्रकारच्या शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्या नंतर सेवेत असताना दहा वर्ष पूर्ण सेवा झाल्यानंतर त्याला एक ते सात कलमात दर्शविलेल्या पात्रतेस समक्ष मानण्यात येईल याची नोंद व्हावी.
2) महाराष्ट्र राज्य पत्र भाग 2:-
महाराष्ट्र राजपत्र भाग दोन मध्ये काही टीप दिलेल्या आहेत त्या टीप राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याचे स्पष्टीकरण आपण खालील प्रमाणे करूया
अ) ऐवजी पुढील प्रमाणे दखल करण्यात येते किंवा दखल घेण्यात येते.
१) टिप क्रमांक एक (अ) मध्ये पुढील गोष्टी विचारात घेतात. कर्मचाऱ्यांनी ठराविक नमुन्यात आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता जर धारण केली आणि सेवेत कार्यात झाल्यानंतर म्हणजेच शिक्षकांच्या नियुक्ती झाल्यानंतर अशा शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी प्रवर्गानुसार ठरवण्यात यावी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्मचारी कोणत्या प्रवर्गात आहे हे पाहणे आवश्यक आहे.
टीप क्रमांक एक ब:-सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना प्रवर्गानुसार प्रवर्ग क,ड आणि ई प्रवर्गात समाविष्ट असणारे नियुक्तीच्या संदर्भाने संबंधित शिक्षकाने ज्या त्या प्रवर्गाकरिता त्याच्या प्रकरणांनुसार उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता जर त्याने धारण केली असेल तर त्याला त्या प्रवर्गातील त्याची ज्येष्ठता संबंधित प्रवर्गात समाविष्ट झाल्याच्या तारखेपासून विचारात घेण्यात यावी असेही नमूद केले आहेत.
टिक क्रमांक एक क या प्रवर्गात समाविष्ट असणारे शिक्षक प्रवर्ग फ,ग किंवा ह मध्ये समाविष्ट असणाऱ्या एखाद्या शिक्षकाने सेवेत काढत असताना त्या प्रकरणापूर्वी प्रवर्ग क,ड, किंवा ई वर्गाच्या अंतर्गत प्रशिक्षित शिक्षकाने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केल्यानंतर किंवा त्याने सेवा अंतर्गत संबंधित शैक्षणिक पात्रता प्रवर्गासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण केली असेल तर त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थानुसार संबंधित शिक्षकाला प्रशिक्षित शिक्षकांसाठी असलेल्या संबंधित प्रवर्गामध्ये सेवा जेष्ठता यादीत समाविष्ट करता येते तथापि त्या शिक्षकांची संबंधित प्रवर्गातील सेवाजेष्ठता ही त्याच्या नियुक्ती दिनांक चा विचार न करता त्याने आवश्यक धारण केलेल्या दिनांक पासून म्हणजेच उच्च शिक्षण घेऊन पात्रता धारण केली असल्यास ज्या दिवशी त्याने ती पात्रता धारण केली त्या दिवसापासून संबंधित प्रवर्गात पूर्वीपासून करत असलेल्या शिक्षकानंतर त्याचा सेवा जेष्ठता क्रम निश्चित करण्यात येईल. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाने सुरुवातीलाच सेवेत समाविष्ट होताना पात्रता पूर्ण केलेली आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व त्याच वेळेस एखादा शिक्षक अप्रशिक्षित असेल तर त्याने आवश्यक असणारी पात्रता पूर्ण केली त्यादिवशी त्याचे नाव सेवा जेष्ठता यादीत समाविष्ट करण्यात यावे.
टिक क्रमांक एक ड:-एखादा शिक्षक इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी प्राथमिक शिक्षक गटात सेवेत रुजू झाला व त्याने सेवा अंतर्गत उच्च शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व आहारता धारण केली किंवा त्याने शैक्षणिक दर्जामध्ये वाढ केला आहे तथापि माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक गटासाठी आवश्यक असणारी पात्रता त्याने पूर्ण केली असल्यास त्याची नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा संबंधित शिक्षक प्राथमिक स्तरावर कार्यरत असताना त्याने उच्च शैक्षणिक पात्रता धारण केली तर त्याच्या पातेनुसार त्या शिक्षकाला सेवाजेष्ठतेनुसार शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवा जेष्ठता सूची मध्ये जेष्ठतेचा दावा करू शकणार नाही हेही लक्षात असणे आवश्यक आहे त्याचा उच्च शैक्षणिक पात्रतेचा केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाईल याचाच अर्थ असा होतो की शिक्षक वर्ग एक ते पाच साठी प्राथमिक शिक्षक आहे उच्च प्रशिक्षण किंवा शिक्षण किंवा व्यावसायिक पात्रता किंवा शैक्षणिक पात्रता पूर्ण केली तर त्याला सेवा जेष्ठता यादी मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणूनच सेवाजेष्ठते त्याचा विचार करण्यात येईल त्याचा विचार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेवा जेष्ठता शिक्षकांच्या सूचीमध्ये विचार करण्यात येणार नाही. त्याने धारण केलेली पात्रता ही त्याच्या कामाचा अनुभव मानला जाईल.
सारांश:-
महाराष्ट्र राज्य पत्र सेवा जेष्ठता यादीसाठी सेवा जेष्ठता कशाप्रकारे तयार करावी यासाठी निर्गमित केले आहेत यामध्ये दोन भाग घेतले असून या दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या भागामध्ये सम कक्ष शिक्षक म्हणजे काय समकक्षता देण्यात आली आहेत तर दुसऱ्या भागामध्ये राजपत्रांमध्ये सेवा जेष्ठता यादी तयार करताना कोणत्या प्रकारच्या प्रवर्गात तो येत असून त्यासाठी टीप एक अ ते ड वर्गीकरण करण्यात आले आहेत. आज आपण संपूर्ण सेवा जेष्ठता यादी तयार करण्याच्या बाबत असणारे राजपत्र महत्त्वाचे असल्यामुळे महाराष्ट्र राजपत्र 24मार्च 2023 च
े संपूर्ण विवेचन केलेले आहे.
FAQ
1) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी सेवा जेष्ठता यादी करिता कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्य राजपत्र निर्गमित केले.
24 मार्च 2023.
2) महाराष्ट्र राजपत्रात किती भागात विभागले
दोन विभागात विभागणी.
3) महाराष्ट्र राजपत्रात पहिल्या भागामध्ये कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे
समकक्ष शैक्षणिक पात्रता.
4) महाराष्ट्र राज्य पत्रात दुसऱ्या भागामध्ये कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे.
प्रवर्गानुसार सेवा जेष्ठता यादी
5) राजपत्रात अधिनियम 1977 मध्ये केव्हा सुधारणा केली
1981 महाराष्ट्र नागरी सेवा मध्ये सुधारणा.
अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख अवश्य वाचा. निळ्या विषयावर क्लिक करा व माहिती मिळवा.
अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी खालील पीडीएफ स्वरूपात दिलेल्या लिंक ला क्लिक करा व माहिती मिळवा.
अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख अवश्य वाचा. निळ्या विषयावर क्लिक करा व माहिती मिळवा.