लोणार सरोवर मराठी माहिती | Lonar Sarovar Marathi Mahiti

Date:2024-03-02
Blog Image
 
0

प्रस्तावना

मित्रांनो, हा ब्लॉग लिहणारा लेखक म्हणजे ब्लॉगर खुद्द लोणार येथील मूळ रहिवासी असल्यामुळे या सरोवराची संपूर्ण माहिती ब्लोगरला आहे. तसेच लोणार येथे आठ वर्षे प्राचार्य म्हणून सेवा लोणार येथे ब्लोगर ने केली आहेत." लोणार सरोवर "बाबत संपूर्ण माहिती आपणासाठी मार्गदर्शनपर ब्लॉगच्या माध्यमातून माहिती स्पष्ट करत आहे. म्हणूनच आज आपण हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.आपल्या ब्लॉग वरून अतिशय महत्त्वपूर्ण जागतिक स्तरावरील 'लोणार सरोवर मराठी माहिती' 'Lonar Sarovar Marathi Mahiti'या विषयावर माहिती या लेखातून सविस्तर स्पष्ट करणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार या तालुक्यातील याच लोणार गावातील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर नैसर्गिक घडामोडीतून निर्माण झालेल्या घटनेतून निर्मित झालेले" लोणार सरोवर" हे एक सरोवर आहेत. याविषयी माहिती मित्रांनो, आपण या ब्लॉगमधून स्पष्टपणे नमूद करणार आहोत. "लोणार सरोवर "खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून जगप्रसिद्ध सरोवर आहेत. स्कंद पुराणाच्या आधारे या सरोवराची निर्मिती अंदाजे जवळ जवळ सुमारे 5200 ते ते 6000 वर्षांपूर्वी निर्माण झालेले एक विवर किंवा किंवा सरोवर आहेत. या सरोवराविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आपण स्पष्ट करणार आहोत.'Lonar Sarovar Marathi Mahiti'

 

Lonar Sarovar Marathi Mahiti
Lonar Sarovar Marathi Mahiti


Lonar Sarovar Marathi Mahiti

  1. प्रस्तावना
  2. लोणार सरोवर निर्मिती
  3. लोणार सरोवराचे संशोधन
  4. लोणार सरोवराचा इतिहास
  5. लोणार सरोवराचे जतन आणि संवर्धन
  6. स्थान व विस्तार
  7. लोणार सरोवर लोणार गांवचा इतिहास
  8. लोणार सरोवरातील सासू- सुनेची वीर
  9. लोणार सरोवर संक्षिप्त माहिती
  10. निर्मिती
  11. आकारमान 
  12. स्थळाबाबत माहिती  -रामसर स्थळ म्हणून सरोवर प्रसिद्ध त्याचबरोबर जगप्रसिद्ध स्थळ
  13. भौगोलिक महत्त्व -भौगोलिक दृष्टीने अति प्राचीन महत्त्व असून येथील माती आणि खडक चुंबकीय आहेत.
  14. लोणार मधील महत्वपूर्ण पाहण्यासारखे मंदिरे
  15. लोणार सरोवर अभयारण्यातील प्राणी व जंगल संपत्ती
  16. लोणार सरोवराचे वैशिष्ट्ये
  17. लोणार सरोवराचा शोध
  18. प्रदूषण बाबत माहिती
  19. प्रवास व्यवस्था
  20. राण्याहची व्यवस्था
  21. सारांश

लोणार सरोवर निर्मिती

महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याचे विवर याची निर्मिती नेमकी तंतोतंत बरोबर केव्हा झाली हे कुणीच सांगू शकत नाही. पण अनेक कथा आणि पुराणशास्त्र यामध्ये लोणार सरोवराची निर्मिती सुमारे कमी जास्त अंदाजे साडेपाच हजार वर्षांपूर्वी निर्मिती झाली आहे अशी नोंद स्कंदपुराणात आढळून येते. लोणार हे वैशिष्ट्यपूर्ण गांव आहेत. लोणार येथील एका फार मोठ्या बेसॉल्ट खडकावर प्राचीन काळी उल्कापात फार मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे त्या खडकावर आघात झाल्यामुळे लोणार विवर किंवा लोणार सरोवर नैसर्गिक निर्मिती झाली. फार मोठ्या प्रमाणात उल्कापात झाल्यामुळे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे विवर खडकाला खोल खड्डा पडून निर्माण झाले. खाऱ्या पाण्याचे सरोवर किंव्हा विवर निर्मिती झाल्यामुळे हे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर पाहण्यासाठी जगातील सर्व ठिकाणाहून लोक लोणार येथे येतात. लोणार सरोवरांचे पाणी खरे असले तरी ते पाणी अल्कधर्मी आहेत.महाराष्ट्र शासनाकडून सरोवराचे जतन आणि संवर्धन करणे आता सुरू आहे. येथे फार मोठे वन्यजीव अभयारण्य म्हणून शासनाने घोषित केले आहेत. आता ते एक पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी ठरले आहेत. लोणार सरोवर व तेथील मंदिरे पाण्यासाठी दररोज असंख्य लोक लोणार सरोवराला भेट देतात. लोणार सरोवरामध्ये पंधरा ते वीस मंदिरे साडेबारा से वर्षांपूर्वीचे असल्याचे आढळून येते. लोणार सरोवराची निर्मिती एका शोधनिबंधात दर्शविल्याप्रमाणे अंदाजे 47 हजार वर्ष ते पाच लाख 70 हजार वर्षांपूर्वी निर्मित झाल्याची नोंद केली आहे.' Lonar Sarovar Marathi Mahiti'

 

धार मंदिर समूह ,लोणार.
धार मंदिर समूह ,लोणार.


लोणार सरोवराचे संशोधन

लोणार सरोवराचे संशोधन करण्यासाठी जागतिक स्तरावरून अनेक संघटना या सरोवराचे संशोधन करत आहेत. या संशोधनामध्ये अमेरिकेतील" स्मिथसोनिय संस्था "या सरोवराचे संशोधन करत आहे. तसेच   "युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया" ही भारतीय संस्था सुद्धा या सरोवराचे संशोधन करण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण करत आहेत. लोणार सरोवराचे संशोधन करणारी आणखी एक महत्वपूर्ण संस्था आहे. त्या संशोधन करणाऱ्या संस्थेचे नांव "फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी" हे आहेत याच तलावाच्या माहितीवर आधारित लोणारी येथील प्राचार्य प्रकाश व्यास यांनी एक संशोधन करून त्या संशोधनावर आधारित डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये सुद्धा आपणास माहिती मिळू शकते. लोणार सरोवरातील  माती आणि खडक लोहचिंबकासारखे कार्य करत असल्याचे आढळून आले आहेत. आता लोणार सरोवर हे फार मोठे पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध झाले आहेत.' Lonar Sarovar Marathi Mahiti'

लोणार सरोवराचा इतिहास

लोणार सरोवर हे जगातील तीन खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक सरोवर आहे. जागतिक स्तरावरील लोणार सरोवर हे तिसऱ्या क्रमांकाचे आहेत. महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागातील विदर्भात असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एक मोठे सरोवर आहे. या लोणार सरोवराला लागून येणारे जिल्हे परभणी जळगाव जालना अमरावती वाशिम आणि अकोला हे जिल्हे आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून उत्तरेस 26 किलोमीटर अंतरावर लोणार सरोवर आहे. ते काही लोकांना सरोवर म्हणजे हेच काय माहीत नसते. सरोवर म्हणजे गोळ्या किंवा खाऱ्या पाण्याचा साठा केलेल्या अंडाकृती तलावास सरोवर किंवा विवर असे म्हणतात. जागतिक पर्यटकांसाठी तलाव पाहण्यास येण्यासाठी औरंगाबाद विमानतळावरून लोणार सरोवराला येता येते. औरंगाबाद विमानतळा वरून औरंगाबादच्या पश्चिमेस दीडशे किलोमीटर अंतरावर लोणार विवर आहे. लोक येण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ते आता पर्यटक स्थळ झाले असून तेथे प्राचीन काळामध्य े हे सर्व कसे निर्माण झाले व तेथे पाण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत. यांचे निरीक्षण आणि संशोधन करण्यासाठी लोणार विवरला भेट देण्यासाठी येतात. अवकाशामधील काही उल्का सतत इकडून तिकडे फिरत असतात किंवा इकडून तिकडे सतत जात असतात. अवकाशातील ह्या उल्का पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये येतात आणि जोराने जमिनीवर कोसळतात तेथे असणारी माती किंवा खडक या खडकाला एक मोठे खड्डे पडतात आणि पुढे या खड्ड्यांमध्ये पाण्याची साठवणूक होते. अशा प्रकारचे तीनच तलाव जगात आहे. लोणार येथील सरोवराची निर्मिती ही बेसॉल्ट नावाच्या खडकावर उल्का चा प्रचंड प्रमाणात फार मोठा आघात झाला आणि तेथे फार मोठे खड्डे पडले आहेत आणि ते खड्डे म्हणजेच आता पाण्याने साठवलेले विवर आहेत. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की लोणार विवर हे उल्का आघातातून निर्मिती झाली आहे. येथील माती चुंबकीय असून पाणी संपूर्ण अल्कधर्मी आहे. याच तलावामध्ये किंवा सरोवरामध्ये खारे पाणी आढळून येते. परंतु अनेक लोकांना माहित नाही या खाऱ्या पाण्याबरोबरच लोणार सरोवरामध्ये देवीच्या मंदिराजवळ गोड्या पाण्याची एक विहीर पण आहे. बरोबर लोणार सरोवर मध्ये जेथून पाणी जाते तेथे फार मोठी एक गायमुख सारखी धार आहेत. जगातील कोणत्याही संशोधकाला आजपर्यंत गायमुखेतून पाणी किंवा पाण्याची धार कोठून येते ते सिद्ध करता आले पावसाळ्यात तर ही धार धबधब्यासारखी कोसळते. या धारेला च नाव "लोणारची धार" असे दिले आहेत.ती धार अखंडपणे अहोरात्र हजारो वर्षांपूर्वीपासून लोणार सरोवरात कोसळत आहेत. या धारेच्या पाण्याखाली पवित्र ठिकाण मानून नागरिक स्नान करतात. धार्मिक लोक लोणारच्या धारेचे दर्शन घेण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी" अक्षय तृतीया"च्या साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर देवदर्शन घेतात. तसेच नवरात्र उत्सवामध्ये तर येथे दर्शन घेण्यासाठी प्रचंड जनसमुदाय येताना दिसतात.ज्या दिवशी या धारेचे पाणी गोडे आहेत. पण हेच पाणी पुढे सरोवरात गेल्यानंतर खाऱ्या पाण्यामध्ये समाविष्ट होते. लोणार धारेच्या पाण्याचे वैशिष्ट्ये अनेक व्यक्तीच माहित नाही की हे पाणी गोडे असून अल्कधर्मी आहेत. मानवास पिण्यासाठी चांगले आहे. या लोणार धारेचे पाणी पिल्यामुळे व्यक्ती ऍसिडिटी होत नाही. या पाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की, या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची डाळ कितीही वेळ शिजवू घातली तरीही शिजत नाही. हे स्वतः ब्लोगर ने अनुभवले आहेत. कारण ब्लॉगर चे मूळ रहिवासी असणारे हे ठिकाण आहे. ' 'Lonar Sarovar Marathi Mahiti'

लोणार सरोवराचे जतन आणि संवर्धन

मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने या लोणार सरोवरास पर्यटकांचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. तिथे फार मोठे अभयारण्य सुद्धा केले असून या अभयारण्य वन्य प्राणी जीव आढळून येतात. आता हेच तर अभयारण्य म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित केले असून. या तलावाच्या सभोवती संपूर्ण काटेरी ताराचे जाळीयुक्त कुंपण अद्यावत तयार करण्यात आले आहे. कारण ही जागा पर्यटकाची असून वन्य प्राण्यापासून धोका होऊ नये व वन्यप्राणी बाहेर येऊ नये यासाठी हे कुंपण तयार केले केलेले आहेत. कुंपणापासून पाचशे मीटर सभोवताली कोणत्याही व्यक्तीला अतिक्रमण करता येत नाही. जगातील हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती वर आहेत. या मंदिरामध्ये सुमारे जवळजवळ बाराशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी मंदिरे उभारण्यात आले आहेत. लोणार परिसरात जवळजवळ साडेबाराशे वर्षांपूर्वी 500 मंदिरे अस्तित्वात होती आणि त्या सर्व मंदिरा ची बांधणी पद्धत काळा दगडातील हेमाडपंथी स्वरूपाची केलेली आहेत. लोणार सरोवरामध्ये आता सध्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी 15 हेमाडपंथी मंदिरे आहेत. आणखीन काही सुद्धा अनेक मंदिरे या विवरात आढळून येतात. संशोधन सुरू आहेत. तसेच तेथे एक सीता नानी नांवाची विहीर गोड्या पाण्याची आहेत. तेथील पाणी पिण्यासाठी योग्य आहेत. या सरोवराला खाली पाण्यापर्यंत उतरण्यासाठी दोन बाजूने जंगलातून खोलदरीत उतरण्यासाठी युवराज या पूर्व दिशेला रस्ता आहे. ह्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी काही पायऱ्या सुद्धा उतरण्यासाठी आढळून येतात. मंदिरात उतरण्यासाठी सरोवराच्या दक्षिणेस एक रस्ता आहे. या रस्त्यातून तलावाच्या खाली शेवटपर्यंत उतरण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतात. तीन तासानंतर खाली उतरल्यावर आपणास कमळाचा नावाच्या देवीचे हेमाडपंथी मंदिर आढळून येईल. लोक येथे देवीचे दर्शन घेतात. देवीच्या नवरात्र काळामध्ये नऊ दिवस फार मोठ्या प्रमाणावर देवीचे दर्शन घेण्यासाठी  लोक सकाळी चार वाजेपासून सुरुवात करतात. दिवसभर असंख्य पर्यटक व लोक अनेक लोक सरोवरात देवीचे दर्शन घेण्यासाठी उतरतात. या तलावाच्या सभोवती संपूर्ण एक फेरा पूर्ण करण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतात. एवढे मोठे अभयारण्य युक्त जागतिक स्तरा वरील नैसर्गिक सौंदर्याने लाभलेले अभयारण्य युक्त फार मोठे सरोवर आहे. या सरोवराचा आकार अंडाकृती असून आकाशातून उल्का पूर्व दिशेकडून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जोरदार आघात झाला. पूर्वेकडून होणारा हा आघात 35 ते 40 अंशाच्या कोनाने आढळल्या असाव्यात असे संशोधनावरून लक्षात आले. सरोवराचे अनेक संशोधकांनी संशोधन प्रक्रिया हातात घेऊन लोणार सरोवर यांचे वय काढण्याचा प्रयत्न केला व त्यावरून त्यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे थर्मोल्युमिसेन्स तंत्रज्ञानानुसार काढलेले वय सुमारे 52 हजार वर्षाचे काढण्यात आले आहे. तरीसुद्धा कोणत्याही संशोधकाला संपूर्ण परिपूर्ण सरोवराचे वय अचूक काढता आलेले नाही. त्याचबरोबर एका तंत्रज्ञानाच्या साह्याने ऑर्गन डेटिंग वापरून सरोवराचे वय 5 लाख 47 वर्ष कमी जास्त प्रमाणात काढले आहेत. आता या सरोवराची हीच पण झालेली आहेत.' Lonar Sarovar Marathi Mahiti'

स्थान व विस्तार

लोणार विवर किंवा सरोवर याबाबत स्थान व विस्तार पाहिला असता  या सरोवराचे स्थान भारतातील महाराष्ट्र या घटक राज्यात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या  ठिकाणी स्थान असून आशिया खंडातील प्रसिद्ध भारत उपखंडामध्ये स्थान आहेत. सरोवराचे भूपृष्ठाचे क्षेत्रफळ 1.13 तचौरस किलोमीटर आहे. सरोवराचा व्यास सुमारे 150 मीटर आहे.तर खोली सरासरी १३७ मीटर असून सभोवती प्रचंड अभयारण्य असून तलावाच्या पूर्वेस व सभोवती लोणार गावचा भूप्रदेश आहे. या सरोवराचे पाणी क्षारयुक्त असून या पाण्याची घनता इतर पाण्यापेक्षा जास्त पाण्याची क्षारता ph10.5 एवढी आहे. सरोवराच्या पाण्यामध्ये अतिशय सूक्ष्म जीवापासून एक पेशीय आणि बहुपेशीय माशांच्या विविध प्रजाती असल्याचे सांगण्यात येते. संपूर्ण भाग जंगली असल्यामुळे हिंसक प्राणी या तलावाच्या परिसरात आपले वास्तव्य करून राहतात. म्हणून तेथे आता अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.'Lonar Sarovar Marathi Mahiti'

लोणार सरोवर लोणार गांवचा इतिहास

लोणार या गावचा इतिहास अति प्राचीन असा आहे.अति प्राचीन काळी लोणार येथे एक लवणा सुर नावाचा राक्षस राहत होता. या लग्नासुर राक्षस त्यांच्या पित्याकडून वारस हक्काप्रमाणे प्राप्त झालेल्या भगवान शंकराचा त्रिशूल प्राप्त झाला. देवाने त्यांना फार मोठे वरदान दिले. हा लग्नासूर नावाचा राक्षस सभोवती जंगलात राहणाऱ्या ऋषीमुनींना फार मोठा त्रास देत होता. अशा प्रकारची एक पौराणिक ऐतिहासिक कथेतून सांगण्यात येते. लवणा या राक्षसाच्या त्रासाला ऋषीमुनी यांना फार मोठी घबराट सुटत होती. ऋषीमुनींना फार त्यांनी त्रास दिल्यामुळे लवणा सुर नांवाच्या राक्षसाला किंवा दैत्याला विष्णू ने मारले त्यामुळे त्या गावाला आणि तेथील परिसराला लोणार म्हणून हा भाग इतिहासात प्रसिद्ध झाला. त्यामुळेच तेथील सरोवराला सुद्धा "लोणार सरोवर "असे म्हणू लागले. भारतावरील ब्रिटिश राजवटीच्या काळात अनेक ब्रिटिशांनी लोणार सरोवरांना भेटी दिल्या. त्यापैकी इ. स.1823 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी जे ई, अलेक्झांडर यांनी त्यांच्या लिखाणामध्ये लोणार सरोवराची नोंद घेतली आहेत. लोणार या शहराच्या बाबतीत प्राचीन कथेप्रमाणे काही कथेमध्ये आणि पुराणांमध्ये लोणार सरोवर चा पौराणिक ग्रंथाचा अभ्यास केला तर तेथेही सुद्धा नोंदी घेतलेल्या दिसून येतात. सरोवराच्या नोंदी स्कंद पुराण, पद्मपुराण आणि आईना- ये - अकबरी या ग्रंथात नोंदी घेतलेल्या स्पष्टपणे दिसून येतात. अतिशय प्राचीन काळाचा विचार करून अगदी प्राचीन काळामध्ये या सरोवराचा उल्लेख प्राचीन ग्रंथकारांनी पुढील प्रमाणे सरोवराच्या नोंदी घेतल्या आहेत. "विजयतीर्थ "म्हणून म्हणून आठवण येते. विजय तीर्थ नोंद ही विष्णू ने लवना दैत्यास मारल्यामुळे सर्वत्र विजय प्राप्त झाला. सरोवर हे ठिकाण तेथील धार्मिक मंदिरामुळे प्रसिद्ध असल्यामुळे लोणार सरोवरास व लोणार या गावात काही काळ म्हणजे अति प्राचीन काळात "विजयतीर्थ" म्हणून म्हटले आहेत'.Lonar Sarovar Marathi Mahiti'

लोणार सरोवरातील सासू- सुनेची वीर

लोणार सरोवरामध्ये अतिशय एक मोठी विहीर आजही सुद्धा आढळून येते. या विहिरीलाही एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झालेले आहेत. सरोवरातील सासु- सुनेची विहिरीचे वैशिष्ट्ये आगळे वेगळे आहेत. या विहिरीमध्ये दोन प्रकारचे पाणी आहेत. अर्ध्या बाजूला गोड पाणी तर उरलेल्या अर्ध्या जागी खारे पाणी आहे. या विहिरीतील पाणी खारे आणि गोडे आहेत. देवीच्या मंदिरा कडील भागात विहिरीतील पाणी गोड आहे तर विरुद्ध बाजूने त्याच विहिरीत खारेपाणी आढळून येते. सुद्धा तुम्ही या पाण्याची चव घेऊन खरे खोटे आजमावू शकता. सासू म्हणजे खारट आणि सून म्हणजे गोड अशी उपमा या वेळी ला देऊन या विहिरीला सासु- सुनेची विहीर असे म्हणतात. भारतीय परंपरेनुसार या विहिरीतील पाणी जल तीर्थ म्हणून पाण्याचे प्राशन करतात. भारतात जलतीर्थ प्रसिद्ध आहेत. इतिहासातील एक पारंपरिक कथेत या जलतीर्थाबाबत विशेष महत्त्व सांगितले आहेत. आपल्या भारत देशाच्या परंपरेमध्ये जलतीर्थाला महत्त्व असल्यामुळे लोक या विहिरीतील जलतीर्थ घेतल्यामुळे आणि प्राशन केल्यामुळे शरीर शुद्ध होते मोक्ष प्राप्ती होते. लोणार सरोवरास भेट देणारे लोक मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी सासू सुनेच्या विहिरीचे पाणी पितात. त्यामुळे त्या विहिरीकडे पर्यटकांचे आकर्षण युक्त स्थान प्राप्त झाले आहेत. उल्कापात होत असताना एक लहानशी मुलगा तलावापासून सातशे मीटर वर पडलेली आहेत. जेथे छोटी उल्का पडली तेथे आज एक धार्मिक मंदिर दिसून येते. लोणार सरोवर पासून सातशे मीटर वर हनुमानाचे मंदिर प्राचीन काळापासून आढळून येते. आजही तेथे आपणास आपण हनुमानाच्या मंदिराला भेट देऊ शकता. येथील हनुमानाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये हनुमान झोपलेल्या स्थितीत पडलेला हनुमान दिसतो. व तेथे हनुमान मूर्तीला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी फार मोठी गर्दी येथे हनुमान दर्शनासाठी दिसून येते. विशेष म्हणजे येथील मंदिरातील प्रत्येक भागात चुंबकीय आकर्षण आढळून येत आहेत. येथे चुंबकीय आकर्षण काढून येत आहे याचाही सुद्धा अभ्यास संशोधक करीत आहे. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सातव्या क्रमांकाचे आश्चर्यचकित करणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील सात प्रेक्षणीय स्थळा ंपैकी लोणार एक महत्त्वाचे स्थान महाराष्ट्राने जून 2013 रोजी घोषणा करून लोणार सरोवराला विशेष दर्जा पण दिला आहे. महाराष्ट्रात असणारे सात आश्चर्यकारक स्थळ शासनाने घोषित केलेले पुढील प्रमाणे आहेत. ग्लोबल पॅगोडा, मुंबईतील सीएसटी स्टेशन, दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार ठिकाण, रायगड किल्ला, लोणार सरोवर, आणि अजिंठा लेण्या. हे सर्व स्थळ महाराष्ट्रातील आचार्य मय ठिकाणी होय. जगभरात याबाबत सर्वेक्षण करून जगभरातील लोकांच्या संशोधनावर आधारित माहितीचे वर्गीकरण करून 22 लाख लोकांच्या मते हे उत्कृष्ट स्थळ आहेत'.Lonar Sarovar Marathi Mahiti'

लोणार सरोवर संक्षिप्त माहिती

निर्मिती

सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी ओळखापाताच्या आघातामुळे सरोवर निर्मिती झाली.

आकारमान 

सरोवरचा व्यास 1.8 असून सरोवराची खोली 150 मीटर आहे.

सरोवराच्या पाण्याबाबत माहिती-खारट क्षारयुक्त अनेक रसायने असणारे पिण्यास अयोग्य पाणी आहे. ऋतुमानानुसार पाण्याच्या रंगात बदल दिसतो. कधी निळे पाणी तर कधी लाल पाणी अशाप्रकारे आपणास दिसून येतात.

स्थळाबाबत माहिती  -रामसर स्थळ म्हणून सरोवर प्रसिद्ध त्याचबरोबर जगप्रसिद्ध स्थळ

भौगोलिक महत्त्व -भौगोलिक दृष्टीने अति प्राचीन महत्त्व असून येथील माती आणि खडक चुंबकीय आहेत.

सरोवरातील मंदिरे-सरोरामध्ये असणारे मंदिर सुमारे बाराशे वर्षे पुराने असून सर्व मंदिरे हेमाडपंथी असून मध्ययुगीन काळातील कला शैलीवर आधारित असणारे मंदिरे. सरोवरात 15 प्राचीन मंदिरे आहेत. सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे कमळाचा देवीचे मंदिर होय.

लोणार मधील महत्वपूर्ण पाहण्यासारखे मंदिरे

दैत्य सुदान मंदिर,मच्छिंद्र टेकडी, गोमुख मंदिर, बांबूस टेकडी, हनुमान मंदिर आणि अति प्राचीन बारव. तसेच दुर्गा टेकडी सुद्धा पाण्यासारखे ठिकाण लोणार येथे आहेत जवळजवळ हे ठिकाण पाचशे एकर एरियाची असावे.

अति प्राचीन काळात स्थान वैशिष्ट्य असणारे लोणार शहरातील लोणार सरोवर जगातील सर्वांना आकर्षित करणारे ठिकाण असून त्यातील प्रत्येक देशातील लोक लोणार सरोवर पाहण्यासाठी येतात.

लोणार सरोवर अभयारण्यातील प्राणी व जंगल संपत्ती

लोणार सरोवर अभयारण्यात अनेक जातीचे प्राणी वन खात्याला आढळून आले आहेत. या अभयारण्यासाठी वन विभागातील प्रमुख सेवा करणारे वन खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी सतत पाहरा देऊन असतात. सरोवरात असणाऱ्या प्राण्याची जतन करून त्यांना संरक्षण देण्याचे प्रयत्न केले जातात. वन्य प्राणी अभयारण्यात असल्यामुळे सहसा लोक मोठ्या अभयारण्यात जात नाही कारण या अभयारण्यात बिबट्या, तडस, लांडगे, वाघ, कोल्हे, रान गाई, रानडुक्कर, ससे, हरणे, रानटी कुत्रे, निरनिराळ्या जातीचे आणि प्रवर्गाचे विषारी व बिनविषारी साप, रोही तसेच निरनिराळ्या प्रकारचे दुर्मिळ पक्षी आपणास रात्रीच्या वेळी अभयारण्यात दिसून येतात. या सर्व प्राण्यांचे जतन करण्याचे काम अभयारण्य विभागातील वन खात्यास संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहेत. त्यामुळे या तलावात रात्रीच्या वेळी जाणे फार धोकेदायक आहे. अशा प्रकारच्या विविध ठिकाणी पाट्या लावून ठेवल्या आहेत. वन्य प्राण्यापासून सावध रहा. त्यांचे जतन आणि संवर्धन करा. तलावाच्या सभोवती अनेक जातींचे झाडे झुडपे तसेच वेली विशेष करून गावरान सीताफळांचे असंख्य झाडे या सरोवरा भोवती घनदाट अरुण्य आपणास दिसून येईल. वन विभागातील खात्यांनी येथे अनेक जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करून संवर्धन केले आहे. याच जंगलात चंदन आणि सागाचे वृक्ष ही सुद्धा आणि मोठ मोठाले आंब्याचे वृक्ष आणि वन औषधी झाडे आढळून येतात. 'Lonar Sarovar Marathi Mahiti'

लोणार सरोवराचे वैशिष्ट्ये

लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे विशेष असे वैशिष्ट्ये आहेत. ऋतुमानानुसार सरोवरातील पाण्याचा रंग बदलतो. कारण शास्त्रज्ञांनी अभ्यासांती पाण्याचे रंग का बदलतात याचे कारण स्पष्ट केले. पाण्याची क्षारता जास्त असल्यामुळे ऋतू नुसार हवामानात बदल झाल्यास पाण्याच्या रंगात बदल होऊन  कधी गुलाबी रंगाची दिसते. केव्हा केव्हा निळ्या रंगाचे सरोवराचे पाणी दिसून येते. उल्का आघाताने निर्माण झालेले विवर असून या विवरात बाहेरून गोड्या पाण्याचा झरा खाऱ्या पाण्यात जाऊन मिळतो. त्याची मुख्य रहस्य असे आहे की जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पाण्याचे रंग बदलणारे सरोवर आहेत. काही तज्ञांचे मत आहे की या तलावात लहान लहान मासे आहेत तर काही तज्ञांचे मत आहे पाण्याची क्षारता जास्त असल्यामुळे या पाण्यामध्ये फक्त एकपेशीय प्राणी आढळून येतात. उदाहरणार्थ अमिबा सारखे एकपेशीय प्राणी सरोवराच्या पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त करत आहे. या सरोवराचे पाणी कधी कधी शेवाळ्यामुळे हिरवे सुद्धा दिसू लागतात. मुख्य म्हणजे या तलावाचा शोध कोणी लावला हेही आपणास माहीत असणे आवश्यक आहे. ' Lonar Sarovar Marathi Mahiti '

लोणार सरोवराचा शोध

लोणार सरोवराचा शोध ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1823 मध्ये लावला. हा शोध सीजेई या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला असे म्हणतात परंतु त्यांनी प्रथम हा तलाव किंवा सरोवर पाहून गोंधळ निर्माण करून योग्य ती माहिती प्राप्त न झाल्यामुळे खरा शोध दख्खनच्या पठारात वसलेल्या लोणार सरोवराचा शोध अलेक्झांडर यांनी लावला. त्यांनी त्यांच्या लिखाणात अशी नोंद घेतली आहे की, 65 दस लक्षात पूर्वी एका मोठ्या उद्रेकापासून या सरोवराची निर्मिती झाली अशी नोंद आढळून येते. परंतु या सरोवराचा नक्की शोध कोणी लावला हे कोणीच सांगू शकत नाही. ' Lonar Sarovar Marathi Mahiti '

प्रदूषण बाबत माहिती

आजच्या सध्याच्या परिस्थितीत लोणार येथील प्रदूषण फार वाढले असून त्या प्रदूषणाचा परिणाम लोणार सरोवरावर होत आहेत. कारण लोणारच्या काठावर अनेक लोक वस्ती करून राहत आहेत त्यामुळे त्यांची सांडपाण्याची व्यवस्था न झाल्यामुळे प्रदूषण युक्त सांडपाणी सरोवरात जात आहे. आता अलीकडेच लोणार सरोवराची पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. तेथील पाण्याचे होणारे प्रदूषण वाढल्यामुळे पाण्यातील जैविक जीव जंतूंना धोका निर्माण झाला आहे '.Lonar Sarovar Marathi Mahiti'

प्रवास व्यवस्था

लोणार सरोवर पाहण्यासाठी औरंगाबाद ते लोणार एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. प्रायव्हेट किंवा खाजगी बसेसची सुद्धा व्यवस्था आहेत. अकोल्या कडून येणाऱ्या लोकांना एसटी बसेस उपलब्ध आहेत. मराठवाड्यातून येणाऱ्या लोकांसाठी मंठा लोणार बसेस व्यवस्था सुरू आहेत. बुलढाणा वरून येणाऱ्या लोकांना बुलढाणा लोणार एसटी मंडळाची प्रवास वाहतूक सुरू आहेत तसेच खाजगी वाहन सुद्धा सुरू आहेत. यवतमाळ वाशिम कडून येणाऱ्या साठी सुद्धा एसटी मंडळ आणि प्रायव्हेट बसेस उपलब्ध आहेत. परक्यांना येण्यासाठी औरंगाबाद येथे विमानतळ आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे औरंगाबादचे विमानतळ असून तिथपर्यंत विमानाने येऊन दीडशे किलोमीटर अंतरावर एसटी बसेस व प्रायव्हेट बसेस सुरू आहेत. आता लोणार येथे लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्यांना अतिशय उत्कृष्ट दर्जाची वाहतूक व्यवस्था आणि रोड व्यवस्था शासनाने उपलब्ध करून दिली आहेत. 

राण्याहची व्यवस्था

लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र शासनाने लोणार च्या दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी रेस्ट हाऊस बांधले आहेत. त्याचबरोबर लोणार येथे स्थानिक प्रायव्हेट लॉजिंग ची सुद्धा व्यवस्था उत्कृष्ट दर्जाची आहेत. त्याचबरोबर अनेक रेस्टॉरंट आणि प्रायव्हेट हॉटेल सुद्धा लोणार येथे आपणास भोजनासाठी उपलब्ध आहे.

सारांश

लोणार सरोवराची उपरोक्त दर्शविलेली माहिती समजून घेताना अगदी मनोरंजक पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला असून महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर म्हणजे एक नाविन्यपूर्ण सरोवर आहेत. या सरोवरामुळे लोणार या गावाला आता फार महत्त्व प्राप्त झाले आहे. सहसा लोक या तलावाला भेट देण्यासाठी हिवाळा ऋतूमध्ये येतात. येथूनच जवळ मेहकर येथे प्रसिद्ध बालाजी चे ठिकाण सुद्धा पाहण्यासारखे आहेत. लोणारच्या उत्तरेस 26 किलो मीटर अंतरावर मेहकर हे शहर वसलेले आहेत. लोणार सरोवराच्या पश्चिमेस प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ सिंदखेडराजा हे स्थळ सुद्धा पाहण्यासारखे आहेत. राष्ट्रमाता जिजामाता माहेर जन्मगाव आहेत. तिथूनच जवळ थंड हवेचे ठिकाण म्हणून इंग्रज काळापासून बुलढाणा जिल्हा फक्त 75 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक इंग्रज अधिकारी इंग्रज राजवटीत बुलढाणा येथे येऊन राहत असत. लोणारच्या उत्तरे स अतिशय महत्त्वाचे धार्मिक स्थळ फक्त दीडशे किलोमीटर अंतरावर शेगाव हे गाव आहेत. शेगांव मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. श्री संत सद्गुरु गजानन महाराज यांचे फार मोठे मंदिर आणि शेगाव येथील आनंद सागर हे स्थळ सुद्धा या भागात आल्यास पाहण्यास विसरू नका. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक शालेय सहली लोणार पाहण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोणार सरोवर हे होय. या स्थळातील माहिती जाणून घेण्यासाठी जगभरातील अनेक लोक, विद्यार्थी, संशोधक लोणार विवर पाहण्यासाठी येतात. पर्यटकांसाठी हे साठी लोणार सरोवर हे आकर्षणाचे अपूर्ण ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. मित्रांनो तुम्ही हा लेख वाचल्यानंतर नक्की या लोणार सरोवराला अवश्य भेट द्या आणिसरोवराचे नाविन्य समजावून घ्या. म्हणूनच आपण हा लोणार सरोवरावर ब्लॉक साठी लिहिलेला लेख आहे. यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असल्यास लेखकास जरूर कळवा योग्य सूचनाची नोंद सुधारित आवृत्तीत घेण्यात येईल. लेख लिहिण्यास येथे आपण पूर्णविराम देत आहे.

FAQ

1) लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

बुलढाणा जिल्ह्यात आहे.

2) लोणार सरोवराचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत?

जगातील खाऱ्या पाण्याचे सरोवर .

3) लोणार सरोवर ची निर्मिती कशी झाली?

बेसॉल्ट खडकावर प्रचंड उल्काघातामुळे निर्मिती झाली.

4) लोणार सरोवर मध्ये किती धार्मिक मंदिरे आहेत?

15 धार्मिक मंदिरे आहे.

5) लोणार सरोवर मधील मंदिरे कोणत्या शैलीचे आहेत.

मध्ययुगीन काळातील हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहेत.

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख अवश्य वाचा.

 कृती संशोधन मराठी माहिती

अधिक माहितीसाठी आपण आमचा खालील व्हिडिओ अवश्य पहा.