वाचन प्रेरणा दिन:-
भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणून अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असणारे शास्त्रज्ञ व सखोल अभ्यासक होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून शास्त्रज्ञ पर्यंत त्यांनी जीवनाचा खडतर प्रवास करत सामान्यातून असामान्य म्हणून नावारूपाला येऊन शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. भारताचे प्रथम दर्जाचे नागरिक म्हणूनमाजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्याबाबत चा शासन निर्णय महाराष्ट्र शासन मराठी विभाग यांनी शासन निर्णय निर्गमित केला. मुंबई दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयाचे आपण संपूर्ण स्पष्टीकरण अगदी आपल्या मातृभाषेतून मराठीतून स्पष्ट करणार आहोत. करिता शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्याबाबत चा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याबाबत सविस्तर मराठी माहिती |
शासन निर्णय
"वाचन प्रेरणा दिन"दरवर्षी भारतात स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. शालेय मुलांना तसेच सर्व वाचकांना या वाचन प्रेरणा दिनातून विशिष्ट प्रेरणा घेऊन आपणही जीवनाच्या अतिशय उच्च पदावर जाऊ शकतो. मराठीत अशी म्हण आहे," वाचाल तर वाचाल"या म्हणी मध्येच स्पष्टपणे वाचन प्रेरणा दिनाचा बराच अर्थ सामावलेला आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विभागाने त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन "संबंधित साजरा करण्यात बाबत शासकीय स्तरावरून शासन निर्णय निर्गमित करून योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याबाबतचा सविस्तर माहिती पुढील प्रमाणे शासन निर्णयाच्या संदर्भात पाहूया.
संबंधित शासन निर्णय मराठी भाषा विभागाने निर्गमित करताना तीन संदर्भ विचारात घेऊन शासन परिपत्रक योग्य कार्यवाहीस्तव निर्गमित केले. या परिपत्रकात नमूद केलेले स्पष्टीकरण आपण स्पष्ट भाषेत खालील प्रमाणे मराठी भाषेत नमूद करून स्पष्ट करणार आहे. सर्व वाचन प्रेमी जणांना हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे.
शासन परिपत्रक स्पष्टीकरण:-
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वाढवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून "वाचन प्रेरणा दिन" कार्यक्रम साजरा करण्यासाठी दरवर्षी शासन स्तरावरून आदेश व सूचना सर्व विभागांना देण्यात येतात. भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी व त्या उद्देशाने त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासकीय स्तरावरून मंत्रालयातील सर्व विभागांना व या विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयातून तसेच विद्यापीठ स्तरावरून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत स्पष्ट सूचना दरवर्षी शासन देत असते. काही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने हा शासन निर्णय दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करून सर्व स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कळवण्यात आले आहेत.
शासन निर्णयाचा उद्देश:-महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी व नागरिक मराठी भाषा विसरत असून इंग्रजी कडे वाटचाल करत आहे. मराठी विभागाने योग्य प्रकारे मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करून राबवण्यात येतात याचा मुख्य हेतू असा आहे की या धोरणाची व्यापकता केवळ शासकीय स्तरावरून पुरेशी प्रमाणात मराठीचा वापर होत नसल्यामुळे, मराठीचे जतन करून दैनंदिन जीवनात शुद्ध मराठी भाषा असा वापर करण्यासाठी व मराठी भाषेचे जतन करण्यासाठी तसेच संवर्धन करण्यासाठी शासकीय स्तरावरचे उपक्रम पाहिजे तेवढ्या प्रमाणात राबवलेल्या अनेक शासन धोरणा च्या अनुषंगाने मराठीचा वापर होत नाही. म्हणून डॉक्टर स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा उद्देश आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी म्हणजेच मातृभाषेतून अंगणवाडी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी भाषेत शिकण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्र ही सुद्धा मराठी भाषेतून सुरू करण्याचा मंत्रिमहोदयाचा प्रयत्न आहे.
शासन निर्णय अन्वये विविध कार्यक्रमाचे आयोजन:-
शासन निर्णयाच्या मध्ये नमूद केलेल्या संदर्भानुसार मराठी भाषा वापरण्याचा व विद्यमान व विस्तारित उपक्रमांना या शासन निर्णया द्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा हा शासन निर्णय ,"वाचन प्रेरणा दिन"साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.असे स्पष्टपणे शासन निर्णयात नमूद केले आहेत.
वाचन संस्कृतीजोपासण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे उदाहरण दाखल उपक्रम दर्शविले आहेत.
मराठी भाषेचा संदेश महाराष्ट्रभर पोहोचवणे.
व्याख्याने आयोजित करणे.
लिहिणाऱ्या विषयावर मराठीतून चर्चासत्र घेणे.
मराठी भाषेचे अभिवाचन होणे.
सामूहिक वाचन घेणे.
ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे.
ग्रंथ दिंडी काढणे.
मराठी भाषा विभागातील जे कोणते कार्यालय अधिनिस्त आहेत त्या कार्यालयाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना या शासन निर्णयान्वये आदेश वजा सूचना देण्यात आल्या आहेत. मराठी भाषेचा विस्तारित उपक्रम अंतर्गत शासन निर्णयानुसार संबंधित विभागातील आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे ह्या शासन निर्णयानुसार स्पष्ट केले आहेत.
तसेच या शासन निर्णयांमध्ये हेही स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व मंत्रालय विभाग आणि त्या विभागाच्या अधिपत्याखाली येणारे सर्व विभाग मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो ते शासकीय निमशासकीय कार्यालये,शासकीय संस्था, विविध कटक मंडळे आणि सार्वजनिक उपक्रम इत्यादी स्वरूपात या संबंधित शासन निर्णयानुसार वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्यवस्थित कार्यक्रमाचे अंमलबजावणी करून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार तसेच जतन करावी. आज आपण मराठी बोलताना मराठी मध्ये दररोज एका दिवसातून पाचशे शब्द इंग्रजी वापरतो. मराठी माणूस मराठी बोलत नाही.कार्यालयामध्ये मराठीचा वापर न करता हिंदी आणि इंग्रजी मधून कार्य करत आहे. म्हणूनच मराठीचा दैनंदिन जीवनात वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र मराठी विभागाने असंख्य शासन निर्णय निर्गमित केले आहेत. पण योग्य त्या प्रमाणात शुद्ध मराठीचा वापर होत नसल्यामुळे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण मराठीचे जतन करूया.
दरवर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी नेमके आपणास शासन निर्णयानुसार कोणते कार्यक्रम आयोजित करावे. याबाबतच्या स्पष्ट सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
2023 -2025 या वर्षात वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुढील कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती:-
1) मित्रांनो यावर्षी 350 व्या शिवराज्याभिषेकांचे दिनाचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी माणसाच्या मनात निर्माण व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या निमित्ताने उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा कार्यक्रम वाचन प्रेरणा दिना निमित्ताने शिवजागर म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
2) आजच्या डिजिटल युगा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने मराठी भाषेचे जतन करण्यासाठी विविध व्याख्याने, कार्यक्रम चर्चासत्र व वाचन संस्कृती वाढवणे त्याचबरोबर मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करणे स्पष्टपणे शासन निर्णयात नमूद केले आहे.
3) मराठीची "वाचन संस्कृती"जतन करण्यासाठी आपल्या कुटुंबातील आणि मित्रमंडळीतील सदस्यांना किमान एक तरी पुस्तक मराठीतून भेट देऊन मराठीचा वाचक वर्ग वाढवून त्यांना प्रोत्साहन द्यावे.
4) मराठीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे वाड:मय उपलब्ध उपलब्ध असून काळानुरू साहित्य पुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाकडे म्हणजे विज्ञान युगाकडे या संबंधातील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन तसेच आरोग्य याबाबत अनेक संकेतस्थळावर मराठीतून माहिती उपलब्ध आहेत. अशा स्वरूपाच्या अवकाश विज्ञानाकडे विषयांवर देखील समावेश कार्यक्रमात करण्यात यावा.
5) वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या उद्दिष्टानुसार तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करून तशा स्वरूपाचे कार्यक्रम शासन निर्णयातील कलम क्रमांक पाच मध्ये दर्शविलेले सर्व कार्यक्रम घेण्यात यावे.
6) आजच्या डिजिटल युगात व्हाट्सअप इंटरनेट फेसबुक ट्विटर अशा प्रकारच्या सामाजिक मिडीयम माध्यमातून मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनाचे प्रेरणा मिळेल असे संदेश मीडियाच्या माध्यमातून देण्यात यावे.
7) मराठी माणसाने जास्तीत जास्त मराठीतील साहित्याचे स्वतः स्वयंस्फूर्तीने वाचन करणे व इतर वाचकांनाही मराठी संस्कृती जपण्यासाठी आपल्याजवळ असणाऱ्या माध्यमाच्या साह्याने उपयोग करून मराठीचे जतन करावे.
8) सोशल मीडियाच्या साह्याने सर्व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन " मराठी वाचन कट्टा "निर्मिती करावी.
9) सर्व संस्थांनी आपापल्या स्तरावर मराठी डिजिटल साहित्य तयार करून संमेलन आयोजित करावे.
10) मराठीचे जास्तीत जास्त लिखाण व्हावे यासाठी विकिपीडिया सारख्या माध्यमातून लिखाण करून माहिती मराठी माणसापर्यंत पोहोचवून मराठी संस्कृतीचे जतन करणे.
11) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा प्रचार प्रसार व वाचन विकासासंबंधी व भाषेचा आणि संस्कृतीचा विकास होईल या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे.
12) मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करून देऊन सर्व कार्यालयांमध्ये मराठीचे कार्यक्रम आयोजन करावे.
13) राज्य मराठी विकास संस्था व भाषा संचालनालय याद्वारे राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी वर्षभरात मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी व वाचन करण्यासाठी एक प्रकारचे वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम राबवणे.
14) मराठीचा प्रसार आणि प्रचार प्रभावीपणे करता येईल या विषयावर तज्ञांची कार्यशाळा आयोजित करावी.
15) सामूहिक वाचन व ग्रंथदिंडी काढावी.
16) मराठी भाषे ची संस्कृती जोपासण्यासाठी मीडियाचा आणि दृकश्राव्य साधनांचा वापर करावा. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे.
17) मराठीचे विचार मंथन करणारे कार्यक्रम आयोजित करून मातृभाषेतून मानसशास्त्रीय व शिक्षण शास्त्र दृष्टीने मराठी भाषेतीचे समाजातील स्थान स्पष्ट करावे.
18) महाराष्ट्र राज्यभर वाचकापर्यंत आधुनिक युगातील सकस साहित्य विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील साहित्य मराठीतील लेखन काम केलेले साहित्य व या साहित्याद्वारे वाचनाचे काम करणे.
19) शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे आधुनिक माध्यमाचा वापर करून शासन निर्णयात नमूद केलेले सर्व कार्यक्रम परिसंवाद व चर्चासत्र आयोजन करावे.
20) तज्ञ व विचारवंत साहित्यिकांची मुलाखत आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावर घेण्यात यावी व मान्यवरांना परिसंवाद आयोजन करण्यात यावा.
21) विश्वकोश निर्मिती व ऑनलाइन चर्चासत्र तज्ञ आणि विचारवंत यांच्यामार्फत आयोजन करून पूर्ण करावे.
22) मराठी विषयाबाबत नवनवीन अभिनव कल्पना व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
23) वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध स्वयंप्रेने काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांनी मराठी विषय राबवलेले उपक्रम विचारात घेऊन चांगल्या साहित्यिकांना देऊन गौरव व सत्कार करावा.
24) महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम 1964 नुसार शासकीय कामकाज 100% मराठीतून करणे आवश्यक आहे तर ती भाषा सूत्रानुसार केंद्र शासनाच्या विभागातील सर्व कार्यालयात मराठीचा सुद्धा वापर करणे आवश्यक असल्यामुळे शासनाने त्या संबंधात सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना वेळोवेळी मराठी भाषा विभागाकडून निर्गमित केलेले आदेश संबंधितांच्या दृष्टीस आणून द्यावे व निदर्शनास आणून द्यावे व येथेही सुद्धा मराठी मध्ये कामकाज झाले पाहिजे असेच उपक्रम राबवणे.
25) मराठी भाषा संचालनालयाने विश्वकोश निर्मिती करून मोबाईल ॲप च्या साह्याने मराठी भागा त जिथे भाषा बोलली जाते त्या अंतर्गत कार्यालयाच्या संकेतस्थळाची माहिती मोबाईल ॲप च्या साह्याने शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करण्याची जबाबदारी सर्व क्षेत्रांमधील विभागात होणे आवश्यक आहे.
26) निर्गमित झालेल्या शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे कलम एक ते 25 पर्यंतचे सर्व कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था त्याचबरोबर भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ यांना मदत देऊन त्या संबंधित त्या संबंधाने साहित्य संस्था समोर दर्शविलेल्या शासन निर्णयानुसार संस्थांना जिल्ह्यात कार्यक्रम आयोजन करण्यासाठी मदत करावी. यासंदर्भामध्ये सहा विभागाअंतर्गत सहा संस्थांना आवश्यक ती मदत करून मराठी भाषा प्रचार व प्रसार करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य प्रकारची माहिती देऊन संबंधित संस्थेला साहित्य संस्थांची मदत घेता येईल या हिशोबाने आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
27) राज्यातील सर्व ग्रंथालय, महाविद्यालय ,तंत्र महाविद्यालय आणि पदविका संस्था तसेच त्यांच्या अंतर्गत अन्य संस्थांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने संबंधितांना देणे.
28) फिल्म सिटी गोरेगाव आणि महानाट्य मंडळ यासारख्या संस्थांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करून संबंधितांना सूचना देऊन सांस्कृतिक व पर्यटन विभागाने संबंधितांना वाचन प्रेरणा दिनाची माहिती देऊन कार्यक्रमाचे आयोजन करणे.
29) शालेय शिक्षण विभागाअंतर्गत शाळा ह्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी संस्कृतीची जोपासना करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम असल्यामुळे या माध्यमाचा विचार करून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या विभागातील अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
30) अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांनी सर्व साहित्य निर्माण करणाऱ्या संस्थांना सूचना देऊन वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम पूर्ण करणे.
31) सदर शासन निर्णयानुसार मंत्रालयीन विभाग व त्या अंतर्गत विभागीय आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या विभागातील आणि कार्यक्षेत्रातील संबंधित संस्थांना वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम सोहळा पार पाडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग घेऊन सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने योग्य प्रकारचा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे.
32) कलम क्रमांक 32 मध्ये दर्शविल्याप्रमाणे मराठी भाषेला आणि ग्रंथरचनेला तसेच मूलभूत ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी स्वस्त किमतीत उपलब्ध करून देणे महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे उद्दिष्ट आहे त्यांनी ललित साहित्य बरोबरच ज्ञान व संस्कृतीच्या साधना बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे असणाऱ्या नवनवीन विषयावर आधारित मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध करणे.
33) मराठी राज्य मराठी विकास संस्थेने योग्य प्रकारचा प्रस्ताव तयार करून वेळापत्रकानुसार मराठी भाषेचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वर्षभराचे नियोजन करणे.
34) निरंतर शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विश्वकोश निर्मिती मंडळांनी विश्वकोशाच्या नोंदी अद्यावत करण्याचे काम व नोंदीची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक असा निश्चित कार्यक्रम व अहवाल तयार करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनास सादर करावा.
35) शासन निर्णयातील संदर्भाच्या संदर्भा त संदर्भ विषयानुसार दिनांक 24 जून 2022 च्या शासन निर्णयाच्या सूचना आयोजित करताना सर्व मंत्रालयीन विभाग तथा मंत्रालय विभागाअंतर्गत येणारे सर्व विभाग व अन्य संस्था तसेच मंडळे महामंडळे सार्वजनिक संस्था बँका यांना विचारात घेऊन मराठी भाषेची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करणे व वाचन प्रेरणा दिन साजरा करावा.
सारांश:-
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित झालेला महत्त्वाचा असून माझी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याच्या संदर्भातील शासन निर्णयाचे स्पष्टीकरण उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे करण्यात आले आहेत. अगदी शासकीय निर्णयाचे सोप्या मराठी भाषेमध्ये थोडक्यात स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न या लेखामार्फत करण्यात आला असून संबंधित लेखा वाचन प्रेरणा दिन या दिवशी शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणारे वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे. आणि मराठी साहित्याची जपणूक करण्यासाठी ,जोपासना करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी वेबसाईटवर तशा प्रकारचे विविध साहित्य नेहमी पोस्ट करण्यात येईल.
"वाचन प्रेरणा दिन शासन" निर्णय सविस्तर पाहण्यासाठी आपण खाली दिलेल्या शासन निर्णयाच्या लिंक ला क्लिक करा आपणास शासन निर्णय संपूर्ण पीडीएफ स्वरूपात आपण उपलब्ध करून घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी शासन निर्णयाची लिंक
FAQ
1)"वाचन प्रेरणा दिन"केव्हा साजरा करण्यात येतो?
15 ऑक्टोबर रोजी
2) "वाचन प्रेरणा दिन "कोणत्या व्यक्तीचा जन्म दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम
3) "वाचन प्रेरणा दिन"साजरा करण्याबाबत कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे?
महाराष्ट्र शासन ,मराठी भाषा विभाग, मुंबई ,32.
4) मराठी भाषा विभागाने यावर्षी कोणत्या दिनांक शासन निर्णय निर्गमित केला आहे?
दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला.
5) "वाचन प्रेरणा दिन "साजरा करण्याच्या बाबत शासन निर्णयातील तिसऱ्या विभागात किती उप मुद्दे दर्शविण्यात आली आहेत?
"मराठी वाचन प्रेरणा दिन "साजरा करण्यासाठी 35 कलमे तिसऱ्या विभागामध्ये नमूद करण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.